शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-रशिया-चीन एकत्र बघून NATOचं टेन्शन वाढलं? युक्रेन युद्धासंदर्भात 'या' नेत्याचं मोठं विधान!
2
आता रशिया-युक्रेन युद्ध थांबणार? पंतप्रधान मोदींची फ्रान्सच्या अध्यक्षांसोबत चर्चा; मॅक्रॉन म्हणाले...!
3
ओबीसींचा महामोर्चा काढणार, दोन पातळ्यांवर लढणार; काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा निर्धार
4
विसर्जनासाठी गेलेला 'गणेश' गिरणा पात्रात वाहून गेला, आई-वडिलांच्या डोळ्यासमोरच तरुण मुलगा बुडाला... 
5
गुजरातमधील पंचमहल यथे मोठा अपघात; पावागडमध्ये रोपवे कोसळला, 6 जणांचा मृत्यू
6
“PM मोदींच्या नेतृत्वाखालील सक्षम, नवीन भारत आपले परराष्ट्र धोरण स्वतः ठरवतो”: CM फडणवीस
7
एकनाथ शिंदे यांनी घेतली शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांची भेट; म्हणाले, “अभिमानास्पद...”
8
गोपाळ शेट्टींसह मेहता, गुप्ता, मिश्रा अन् शर्मा यांच्यावर मुंबई भाजपानं दिली मोठी जबाबदारी
9
फक्त ३ वर्षांत दिला ५३२% परतावा, आता कंपनीला मिळाली ₹३,००,००,००० ची ऑरडर; ₹१०० पेक्षाही स्वस्त आहे शेअर!
10
Asia Cup Record : सचिन तेंडुलकर भारताचा 'नंबर वन ऑलराउंडर'; जयसूर्याची तर गोष्टच न्यारी
11
अमेरिका निघाली होती रशियाला पंगू बनवायला, आता स्वतःवरच आली अंडी खरेदीची वेळ! ३२ वर्षांत पहिल्यांदाच...
12
CM फडणवीसांकडून ग्रीन सिग्नल मिळताच अजित पवार गटाला बसणार झटका?; भाजपा आमदार लागले कामाला
13
राज ठाकरेंना मिळणार खास मान...यंदाचा शिवसेनेचा 'दसरा मेळावा' ठाकरे बंधू गाजवणार?
14
जीएसटी कमी झाल्यानंतर, किती रुपयांवर येईल Maruti Baleno? किती रुपयांचा होईल फायदा? जाणून घ्या
15
जगातील सगळ्यात महागडी शाळा; वर्षाची फी तब्बल १,१३,७३,७८० रुपये! आहे तरी कुठे नक्की?
16
चंद्रग्रहण २०२५: तुमच्या राशीनुसार करा ‘हे’ दान, धनवान बनाल; कल्याण होईल, सुख-सुबत्ता लाभेल
17
"गणित जुळलं की...", अभिनेत्री ऋतुजा बागवे लग्नाबद्दल स्पष्टच बोलली
18
DCM अजित पवार अन् पोलीस अधिकारी अंजना कृष्णा यांच्यात नेमका काय झाला संवाद? वाचा शब्द न् शब्द
19
भारत, पाकिस्तान, अमेरिका अन् जपानमध्ये आपत्ती येणार; बाबा वेंगाची 'ती' भविष्यवाणी खरी होणार?
20
“...तोपर्यंत मराठा समाजाला कायमस्वरूपी टिकणारे आरक्षण मिळणार नाही”: बाळासाहेब थोरात

भारताची नवीन 'रेड लाईन', पाकिस्तानात 300 KM घुसून हल्ले, CDS चौहान यांची मोठी माहिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 1, 2025 12:53 IST

CDS Anil Chauhan on India-Pakistan Relation : 'आम्ही गेल्या दोन दशकांहून अधिक काळ दहशतवादाच्या या प्रॉक्सी युद्धाचा सामना करत आहोत, आता हे युद्ध संपवायचे आहे.'

CDS Anil Chauhan on India-Pakistan Relation : भारताचे संरक्षण प्रमुख (सीडीएस) जनरल अनिल चौहान यांनी शनिवारी(1 जून) ऑपरेशन सिंदूर आणि पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादाविरुद्ध भारताच्या धोरणावर अतिशय स्पष्टपणे भाष्य केले. सिंगापूरमध्ये झालेल्या शांगरी-ला संवाद सुरक्षा शिखर परिषदेदरम्यान दिलेल्या मुलाखतीत त्यांनी सांगितले की, भारताच्या ऑपरेशन सिंदूरने दहशतवादाविरुद्ध एक नवीन 'लाल रेषा' आखली आहे. पाकिस्तान भारताच्या लष्करी कारवाईतून नक्कीच काही धडे घेईल, अशी आशा त्यांनी व्यक्त केली.

भारत-पाक युद्धाच्या उंबरठ्यावरसीडीएस अनिल चौहान पुढे म्हणाले की, ऑपरेशन सिंदूर 7 मे रोजी सुरू करण्यात आले, ज्याचा उद्देश 22 एप्रिल रोजी पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून पाकिस्तान आणि पीओकेमधील नऊ दहशतवादी तळ नष्ट करणे होता. त्यानंतर, या ऑपरेशन अंतर्गत पाकिस्तानी हल्ल्यांनाही प्रत्युत्तर देण्यात आले. भारत आणि पाकिस्तानमधील चार दिवसांच्या लष्करी संघर्षामुळे दोन्ही अण्वस्त्रधारी देश युद्धाच्या उंबरठ्यावर आले होते, पण 10 मे रोजी लष्करी कारवाई थांबवण्यासाठी युद्धविराम जाहीर करण्यात आला. 

पाकिस्तानच्या आत 300 किमी घुसून हल्ले केलेऑपरेशन सिंदूर दरम्यान, भारताने स्वदेशी शस्त्रे आणि मित्र देशांकडून मिळालेल्या शस्त्रांचा वापर करून पाकिस्तानमध्ये 300 किमी आत घुसून हल्ले केले.  हे आमच्या मजबूत हवाई संरक्षण क्षमतेचे प्रतीक आहे. दहशतवाद्यांमुळे जगात अस्थिरता वाढत आहे आणि पाकिस्तान संघर्षांना प्रोत्साहन देण्यात महत्त्वाची भूमिका बजावतात. मला आशा आहे की या विशेष ऑपरेशनमधून आपल्या शत्रूंनाही काही धडे मिळतील आणि ते यापुढे भारताच्या सहनशीलतेचा फायदा घेणार नाहीत, अशी आशाही अनिल चौहान यांनी व्यक्त केली.

यापुढे प्रॉक्सी युद्ध सहन करणार नाहीअनिल चौहान पुढे म्हणतात, आम्ही दोन दशकांहून अधिक काळ दहशतवादाच्या या प्रॉक्सी युद्धाचा सामना करत आहोत, यामुळे अनेक लोक गमावले आहेत. आता आम्हाला ते संपवायचे आहे. ऑपरेशननंतर भारताला धोरणात्मक स्थिरता वाटते का असे विचारले असता, सीडीएस म्हणाले की, धोरणात्मक स्थिरता आणण्यासाठी दोन्ही हातांनी टाळ्या वाजवाव्या लागतात, असे सूचक विधान त्यांनी केले. 

भारतीय सैन्याचे किती नुकसान?या संभाषणादरम्यान, जनरल चौहान यांनी कबूल केले की, सुरुवातीच्या दिवशी भारताला हवाई नुकसान सहन करावे लागले. पण, त्यांनी कोणताही अचूक आकडा दिला नाही. ऑपरेशन सिंदूरमध्ये भारताला झालेल्या नुकसानीशी संबंधित प्रश्नावर अनिल चौहान म्हणाले की, म्हणजे किती नुकसान झाले हे महत्वाचे नाही, तर कोणत्या चुका झाल्या? हे महत्वाचे आहे. आकडेवारी महत्त्वाची नाही, त्यानंतर आपण काय केले हे महत्त्वाचे आहे. आपण युद्धाच्या वातावरणात आहोत आणि नुकसान त्याचाच एक भाग आहे. प्रश्न असा आहे की, आपण आपले उद्दिष्ट साध्य केले आहे का? हो. अद्याप संघर्ष शमलेला नाही, त्यामुळे मी त्यावर भाष्य करू इच्छित नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.

टॅग्स :Operation Sindoorऑपरेशन सिंदूरPahalgam Terror Attackपहलगाम दहशतवादी हल्लाIndiaभारतPakistanपाकिस्तान