अंतराळ क्षेत्रत भारताची नवी भरारी
By Admin | Updated: July 1, 2014 02:44 IST2014-07-01T02:44:45+5:302014-07-01T02:44:45+5:30
पाच विदेशी उपग्रहांचे यशस्वी प्रक्षेपण केल्याने अंतराळ क्षेत्रत भारतीय शास्त्रज्ञांनी आणखी एक मोठी ङोप घेतली.

अंतराळ क्षेत्रत भारताची नवी भरारी
श्रीहरिकोटा (आंध्र) : पीएसएलव्ही-सी 23 या स्वदेशी प्रक्षेपण यानाने (रॉकेट) पाच विदेशी उपग्रहांचे यशस्वी प्रक्षेपण केल्याने अंतराळ क्षेत्रत भारतीय शास्त्रज्ञांनी आणखी एक मोठी ङोप घेतली. या यशस्वी उड्डाणानंतर श्रीहरिकोटा प्रक्षेपण केंद्रात उपस्थित असलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शास्त्रज्ञांचे अभिनंदन केल़े, तर राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी हा देशासाठी गौरवपूर्ण क्षण असल्याचे म्हटले आहे.
आपण एक सार्क उपग्रह विकसित करावा. हा
उपग्रह सार्क देशांना गरिबी व निरक्षरतेच्या जोखडातून बाहेर काढेल. त्यांच्या वैज्ञानिक प्रगतीसाठी त्यांना मदत करेल. असा उपग्रह बनविण्याचे आव्हान इस्नेने स्वीकारावे.
- नरेंद्र मोदी
च्पाच विदेशी उपग्रहांचे उड्डाण हे एका व्यावसायिक कराराद्वारे करण्यात आले होत़े विदेशी देशांच्या वजनदार उपग्रहांच्या यशस्वी प्रक्षेपणानंतर भारताच्या विदेशी गंगाजळीत कोटय़वधी रुपयांची भर
पडणार आह़े