शहरं
Join us  
Trending Stories
1
काल युद्धाचा इशारा, आज राजधानी सोडून पळून गेले... सिरियाचे राष्ट्राध्यक्ष अल-शारांचा अजब कारभार
2
"कुणाचा बाप आला... बापाचा बाप आला... आजोबा आला तरी मुंबई...", CM देवेंद्र फडणवीसांनी ठणकावलं
3
भीषण अपघातात ट्रकखाली चौघे शंभर फूट फरफटत गेले, पित्यासह दोन चिमुकल्यांचा मृत्यू
4
बौद्ध भिक्षूंचे 80 हजारहून अधिक अश्लील फोटो-व्हिडिओ; ब्लॅकमेल करून थायलंडमधील महिलेनं कमावले 102 कोटी
5
कॅनडामध्ये विमान हायजॅक! अधिकाऱ्यांमध्ये घबराट; मागून पाठवले F-35 लढाऊ विमान पण...
6
"CM फडणवीसांनी ४० फोन केले पण..."; ठाकरेंनी मतांची माती केली म्हणत एकनाथ शिंदेंनी सगळचं काढलं
7
गोपिचंद पडळकर यांच्या मागणीला मोठं यश, रायगडाजवळील निजामपूर ग्रामपंचायतीचं नाव बदललं
8
"इन्स्टावर ४ लाख फॉलोअर्स पण गावात ४ लोकांनाही..."; गावकऱ्यांनी केली 'त्या' दोघींची पोलखोल
9
'मै हूँ ना'मध्ये होती 'ही' मराठी अभिनेत्री, तिचं नृत्य पाहून शाहरुख खानही झालेला अवाक
10
नितेश राणे यांना मुस्लीम संघटनेने पाठवला कुरानचा मराठी अनुवाद; मुफ्ती फाजिल म्हणाले, 'आपकी क्या औकात है...!'
11
'तो डान्सबार योगेश कदमांच्या आईच्या नावावर'; अनिल परबांचा सभागृहात गंभीर आरोप
12
जयंत पाटील भाजपमध्ये प्रवेश करणार?; CM फडणवीस विधानसभेतच बोलले, म्हणाले, 'हे कठीणच झालंय'
13
इंडिया आघाडीला मोठा धक्का, बड्या पक्षाने सोडली साथ, विरोधी पक्षांचं ऐक्य कमकुवत होणार?  
14
इशान किशनला टीम इंडियापाठोपाठ आणखी एका संघातूनही डच्चू मिळण्याची शक्यता
15
बाजार गडगडला! एकाच दिवसात गुंतवणूकदारांचे २.५७ लाख कोटी बुडाले, फक्त 'हे' ५ शेअर्स वाढले
16
चीनकडून कोण चोरतंय रेअर अर्थ मेटल? का उडालीये ड्रॅगनची झोप, काय आहे प्रकरण?
17
आरोग्याशी नको खेळ! मीठापासून साखरेपर्यंत... 'या' पांढऱ्या गोष्टी तुमच्यासाठी ठरू शकतात विष
18
"पटोलेंनी उल्लेख केलेली व्यक्ती काँग्रेसचीच"; हनी ट्रॅपची कुठलीही तक्रार नसल्याचे CM फडणवीसांचे स्पष्टीकरण
19
"ये लातों के भूत हैं, बातों से मानेंगे नहीं...!"; मोहरम आणि श्रावणाचा उल्लेख करत मुख्यमंत्री योगींचं मोठं विधान
20
"विधानसभेतील राडा हा जाणीवपूर्वक दहशत निर्माण करण्याचा प्रकार’’, बाळासाहेब थोरात यांची टीका 

भारताची आरोग्य सेवा बिघडलेलीच

By admin | Updated: April 16, 2016 03:23 IST

मुंबईसारख्या महानगरात अनेक मोठी रुग्णालये आहेत. जगभरातील रुग्ण उपचारासाठी मुंबईत येतात. दिल्ली आणि इतर महानगरांमध्ये एम्ससारख्या अद्ययावत रुग्णालयाची

- सुरेश भटेवरा,  नवी दिल्लीमुंबईसारख्या महानगरात अनेक मोठी रुग्णालये आहेत. जगभरातील रुग्ण उपचारासाठी मुंबईत येतात. दिल्ली आणि इतर महानगरांमध्ये एम्ससारख्या अद्ययावत रुग्णालयाची सोय आहे तरीही भारतात आरोग्य सेवेची स्थिती अत्यंत दयनीय आहे. नॅशनल सँपल सर्व्हेने देशाच्या आरोग्य सेवांबाबत नुक त्याच जारी केलेल्या अहवालातून हे वास्तव सामोरे आले आहे. सर्व्हेच्या अहवालानुसार देशात आरोग्य विम्याची तरतूद अवघ्या १६ टक्के लोकांकडे आहे. म्हणजेच उपचारांसाठी ८४ टक्के लोकसंख्येकडे कोणताही खासगी अथवा सरकारी विमा नाही.या अहवालातील निष्कर्ष चिंताजनक आहेत. आजारपणासाठी ग्रामीण भारतातल्या ८६ टक्के लोकसंख्येला आरोग्य विमा अथवा अन्य कोणत्याही योजनेचा आंशिक लाभ देखील मिळत नाही. शहरांमध्ये ८२ टक्के लोकसंख्येकडे आरोग्य विमा नाही. जागोजागच्या सरकारी रुग्णालयांची अवस्था दयनीय आहे. खाजगी रुग्णालयांच्या उपचारांचा खर्च महागडा आहे. त्यामुळे ग्रामीण भागात आरोग्य विमा नसलेल्या ६८ टक्के कुटुंबांनी आणि शहरांत ७५ टक्के कुटुंबांनी आपल्या आयुष्यभराच्या संचित रकमेतून उपचारांचा खर्च केला. ग्रामीण भागांत २५ टक्के आणि शहरांत १८ टक्के कुटुंबांना औषधोपचार व रुग्णालयांच्या खर्चासाठी अक्षरश: कर्ज काढावे लागले.नव्या आरोग्य विमा योजनेचा विचार?या अहवालानुसार मेडिक्लेमसाठी शहरांतील ३.५ टक्के लोकांनी आणि ग्रामीण भागांतील 0.३ टक्के लोकांनी विविध विमा कंपन्यांकडून आपला व कुटुंबियांचा आरोग्य सेवा विमा काढला आहे. शहरांत २.४ टक्के चाकरमान्यांचा आरोग्य विमा संबंधित खासगी कंपन्या अथवा कार्यालयांमार्फत काढला आहे. ग्रामीण भागात मात्र याची टक्केवारी अवघी 0.६ टक्के आहे. केंद्र सरकारने काही वर्षांपूर्वी राष्ट्रीय आरोग्य विमा योजना (आरएसबीवाय) सुरू केली. मात्र आतापर्यंत केवळ १३ टक्के ग्रामीण व १२ टक्के शहरी कुटुंबांना त्याचा लाभ मिळाला. या योजनेत संपूर्ण कुटुंबाच्या उपचारासाठी अवघ्या ३0 हजारांची मदत मिळत होती. तरीही आरोग्य सेवेत ही एकमात्र सरकारी योजना अशी होती की देशातल्या जनतेला काही अंशी तरी त्याचा लाभ झाला. त्यामुळे केंद्र सरकारने या योजनेऐवजी आता व्यापक आरोग्य विमा योजना सुरू करण्याचे ठरवले आहे, असे समजते.