शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटेंचा राजीनामा घेणार?, अजित पवारांच्या निर्णयाकडे लक्ष; ३० मिनिटे बैठकीत चर्चा
2
'डोनाल्ड ट्रम्प यांची मध्यस्थी नाहीच; पाकिस्तानच्या विनंतीवरुन युद्धविराम,' जयशंकर यांची स्पष्टोक्ती
3
'ऑपरेशन सिंदूर हा फक्त एक तमाशा होता', प्रणिती शिंदेंच्या वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटले
4
"मी जे काही केलं ते इतिहास जमा झालं,..." गंभीर असं का म्हणाला? जाणून घ्या त्यामागची गोष्ट
5
Operation Sindoor: पाकिस्तानच्या हल्ल्यात आईवडील गमावले! राहुल गांधींनी २२ मुलांना घेतलं दत्तक
6
Eknath Khadse : 'पोलिस आधीपासूनच प्रांजल खेवलकर यांच्यावर पाळत ठेवत होते'; एकनाथ खडसेंनी पुरावेच दिले
7
ED Raid: काल निरोप, आज...! माजी आयुक्त अनिलकुमार पवार यांच्यावर घरावर ईडीची धाड
8
खांदा फ्रॅक्चर झाला तरी आजोबांची 'ती' इच्छा केली पूर्ण; ५१ लीटर गंगाजल आणणाऱ्या नातवाचा मृत्यू
9
लाडकी बहीण योजनेत ४,८०० कोटींचा मोठा घोटाळा; सुप्रिया सुळेंचा महायुती सरकारवर गंभीर आरोप
10
'नवीन लोक येतात आणि चुकीचा इतिहास सांगतात'; अंधभक्त म्हणत सुप्रिया सुळे भाजप खासदारावर भडकल्या
11
'तुम्ही २० वर्षे विरोधी बाकावरच बसणार...', ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेदरम्यान अमित शाह संतापले
12
उद्धव ठाकरेंची मातोश्रीवर भेट, राज ठाकरेंचे ट्वीट; महायुतीला इशारा की समीकरणाचे सूचक संकेत?
13
४ वर्षात ७५० इंजेक्शन्स! दारूमुळे अंथरुणाला खिळला अभिनेता; किडनी फेल, आयुष्य झालं उद्ध्वस्त
14
Mahadevi Elephant: अखेर 'महादेवी' हत्तीणीला निरोप देताना गावकऱ्यांना अश्रू अनावर; नांदणीत लोटला जनसागर
15
आणखी स्वस्त होणार कर्ज; ऑगस्टमध्ये पुन्हा एकदा रेपो दरात RBI कपात करण्याची शक्यता
16
माती खाऊन २४ कॅरेट सोने बाहेर टाकणारा बॅक्टेरिया सापडला; वैज्ञानिकांची तर लॉटरीच लागली...
17
Nag Panchami 2025: नागपंचमी का साजरी केली जाते, यामागील पौराणिक कथा वाचलीत का?
18
"पहलगाम दहशतवाद्यांचा खात्मा करणाऱ्या सैन्याला सॅल्यूट, हल्ला करणारे १०० वेळा विचार करतील"
19
चीनचा भारताला मोठा 'धक्का'! 'रेअर अर्थ' बंदीमुळे 'या' ५ क्षेत्रांवर थेट परिणाम, SBI चा गंभीर इशारा!
20
"TCS मधील कपात तर सुरुवात आहे, अजून अनेक कंपन्यांमध्ये AI चा फटका बसणारे"

मोदींच्या संकल्पासाठी तरूणांनी पुढं यावं, देशाच्या निर्णय प्रक्रियेत सहभागी व्हावं - गंभीर

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 31, 2024 17:04 IST

भाजपा खासदार गौतम गंभीरने देशातील तरूणाईला एक आवाहन केले आहे.

नवी दिल्ली: भारतीय क्रिकेट संघाचा माजी खेळाडू आणि विद्यमान भाजपा खासदार गौतम गंभीरने देशातील तरूणाईला एक आवाहन केले आहे. २०४७ पर्यंत भारताला विकसित राष्ट्र बनवण्याचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा संकल्प पूर्ण करण्यासाठी तरूणांनी पुढाकार घ्यायला हवा, असे गंभीरने आवाहन केले. तो त्याच्या दिल्ली पूर्व या लोकसभा मतदारसंघात 'नमो न्यू व्होटर्स कॉन्फरन्स'ला संबोधित करताना बोलत होता. युवा मतदार हा देशाच्या चांगल्या भविष्याचा पाया रचेल, असा विश्वास त्याने व्यक्त केला. 

तसेच संपूर्ण जगात सर्वाधिक युवा मतदार हा भारतात आहे. भारत ७ लाख कोटी रुपयांच्या अर्थव्यवस्थेचा आकार गाठेल कारण लोक आता विकासाबद्दल भाष्य करत असून पूर्वी झालेल्या घोटाळ्यांच्या चर्चा होत आहेत, ते उघडकीस येत आहेत. भारतातील तरुण देशाचे आणि जगाच्या मोठ्या भागाचे भविष्य ठरवतील यात शंका नाही. देशाच्या निर्णय प्रक्रियेत तरुणांनी सक्रिय सहभाग घेतला पाहिजे. समस्या आपल्याच असतील तर त्यावर तोडगा देखील आपणच काढायला हवा, असे गंभीरने नमूद केले. 

यावेळी गौतम गंभीरने पहिल्यांदाच मतदान करणार असलेल्या युवा मतदारांना पदक देऊन सन्मानित केले. दरम्यान, भारताचा माजी खेळाडू त्याच्या विधानांमुळे नेहमी चर्चेत असतो. क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यापासून तो समालोचनाकडे वळला आहे. आगामी आयपीएल हंगामासाठी त्याची कोलकाता नाईट रायडर्सच्या संघात घरवापसी झाली आहे. गंभीर आयपीएल २०२४ मध्ये केकेआरच्या संघाला मार्गदर्शन करताना दिसेल.

'आप'वर गंभीरची टीकागौतम गंभीरने पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सौर ऊर्जा प्रकल्पाचा दाखला देत दिल्लीतील सत्ताधारी आम आदमी पार्टीला लक्ष्य केले. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल केवळ मतांसाठी राजकारण करतात, अशी टीका त्यांनी केली. दिल्ली सरकारच्या सोलर पॉलिसीबद्दल गंभीर म्हणाला की, अरविंद केजरीवाल फक्त मतांचे राजकारण करतात. वीज आणि पाण्यानंतर आता ते सोलरवर बोलत आहेत, हे सर्व फक्त मतांसाठी सुरू आहे. जोपर्यंत व्होट बँकेचे राजकारण आहे, तोपर्यंत दिल्लीतील जनता प्रदूषणाशी अशीच झुंज देत राहणार आहे. व्होट बँकेचे राजकारण असेल तर दिल्ली आणि देशाचा विकास होणार नाही. 

टॅग्स :Gautam Gambhirगौतम गंभीरBJPभाजपाAam Admi partyआम आदमी पार्टीdelhiदिल्लीTeam Indiaभारतीय क्रिकेट संघ