शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
2
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
3
कल्याण लोकसभा मतदारसंघात एकनाथ शिंदेंकडून काँग्रेसला धक्का, बड्या नेत्यासह माजी नगसेवक शिंदे गटात 
4
पिकअप व्हॅन आणि कारचा भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, २३ जण जखमी   
5
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
6
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
7
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
8
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
9
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
10
एक-एक वर्षासाठी पंतप्रधानपदाचे वाटप ; ‘इंडिया’चे हेच समीकरण : पंतप्रधान मोदी
11
भाजप अन् बीजेडीची ओडिशात मिलीभगत; निवडक लोकांसाठी काम : राहुल गांधी
12
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेहमीच आरक्षणाचा समर्थक राहिला : मोहन भागवत
13
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
14
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
15
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
16
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
17
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
18
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
19
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
20
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय

मोदींच्या मनमानीमुळे देश आर्थिक संकटात, डॉ. मनमोहन सिंग यांची सडेतोड टीका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 08, 2018 5:59 AM

शहाणपणाची मक्तेदारी फक्त आपल्याकडेच आहे, असा समज करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मनमानी धोरणे राबवून अर्थव्यवस्थेचे गैरव्यवस्थापन केल्याने देशावर आर्थिक संकट ओढवले आहे, अशी टीका माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी सोमवारी येथे केली.

बंगळुरु - शहाणपणाची मक्तेदारी फक्त आपल्याकडेच आहे, असा समज करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मनमानी धोरणे राबवून अर्थव्यवस्थेचे गैरव्यवस्थापन केल्याने देशावर आर्थिक संकट ओढवले आहे, अशी टीका माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी सोमवारी येथे केली.कर्नाटक निवडणुकीच्या निमित्ताने डॉ़ सिंग यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत मोदी सरकारच्या कारभाराचा समाचार घेतला. ते म्हणाले की, आमचे इरादे साफ असल्याचे मोदी सरकार सांगते, पण त्यांच्या निर्णयांना व धोरणांना तर्कसंगती नाही़ नेमके काय घडते, याचे विश्लेषण करण्याची तयारी नसल्याने देशाचे मोठे नुकसान होत आहे.डॉ. सिंग म्हणाले की, देश सध्या बिकट कालखंडातून जात आहे. शेतकरी संकटात आहेत, तरुण पिढीला नोकऱ्यांच्या संधी नाहीत आणि अर्थव्यवस्थेचा विकास क्षमतेहून कमी दराने होत आहे. हे टाळता येण्यासारखे होते तरी टाळले गेले नाही. सर्व आव्हानांना खंबीरपणे सामोरे जाण्याऐवजी चुका व त्रुटी दाखविणाºयांची तोंडे बंद करण्याची सरकारची वृत्ती आहे. सरकारच्या आर्थिक धोरणांचा जनतेच्या जीवनावर मोठा परिणाम होत असतो. त्यामुळे सरकारने लहर व मर्जीनुसार काम न करता काळजीपूर्वक धोरणे राबविणे गरजेचे असते, अशी टीकाही डॉ़ सिंग यांनी केली़हे सरकार अर्थव्यवस्था जोमात असल्याचे फसवे चित्र रंगविते. ‘संपुआ’ सरकारच्या काळात जगभरात प्रतिकूल परिस्थिती असूनही विकासदर सरासरी ७ टक्के राहिला होता व एकदा तर तो ८ टक्क्यांपर्यंत पोहोचला होता. (वृत्तसंस्था)मोदींनी पातळी सोडलीमोदींनी पातळी सोडून प्रचार केल्याने पंतप्रधानपदाच्या प्रतिष्ठेस कमीपणा आल्याची टीकाही डॉ. मनमोहन सिंग यांनी केली. ते म्हणाले की, प्रचारात मोदी ज्या प्रकारची विधाने करीत आहेत, तशी आजवर कोणाही पंतप्रधानाने केलेली नाहीत. ते समाजाचे जाणीवपूर्वक ध्रुवीकरण करू पाहात आहेत, पण याने कर्नाटकचे किंवा देशाचे भले होणार नाही. मोदी यावरून काही धडा घेतील, अशी अपेक्षा आहे.शहाणपणाची मक्तेदारी तुमच्याकडेच नाही!सर्व शहाणपणाची मक्तेदारी एकट्या माझ्याकडे आहे, असे कोणी म्हणू शकत नाही. देशाचा घात करणाºया कोणत्याही धोरणाचा सरकारला जाब विचारल्यास उलट जाब विचारणाºयाचा हेतूच विखारी असल्याचे उत्तर मिळते.जनमत चाचणी : काँग्रेसला सर्वाधिक जागाजनता दल (सेक्युलर) ठरणार किंगमेकरकर्नाटक विधानसभा निवडणुकांमध्ये काँग्रेस सर्वाधिक जागा जिंकेल, पण त्रिशंकू विधानसभा अस्तित्वात येईल, असा निष्कर्ष लोकनीती-सीएसडीएस आणि एबीपी न्यूजने केलेल्या जनमत चाचणीत निघाला आहे. जनता दल (सेक्युलर)च्या मदतीशिवाय कोणालाही सरकार बनविता येणार नाही, असेही या चाचणीत म्हटले आहे.२२५ पैकी किती जागाकाँग्रेस 97भाजपा 84जेडीएस 37 

टॅग्स :Karnataka Assembly Elections 2018कर्नाटक विधानसभा निवडणूक २०१८Manmohan Singhमनमोहन सिंगNarendra Modiनरेंद्र मोदी