आपला देश अन्न धान्याच्या बाबतीच स्वयंपूर्ण देश आहे, फक्त शेतकरी त्रासात आहे. त्याला त्याच्या खर्चाचे पैसेही वसूल होत नाहीत. यामुळे तो आत्महत्या करत आहे. हा पण भारताचा दबदबा त्याने कायम ठेवला आहे. तांदळाच्या उत्पादनात भारत देश पहिला आहे, एवढे उत्पादन होते की अमेरिका, चीनही मिळून आपल्याला मागे टाकू शकत नाहीत.
भारत हा जगाचा पोशिंदा आहे. कारण तांदळाचे सर्वाधिक उत्पादन आणि पुरवठा हा भारताकडून केला जातो. थायलंड, व्हिएतनाम पाकिस्तान आणि अमेरिकाचीन यांचा नंतर नंबर लागत आहे. २०२२ मध्ये भारत हा सर्वाधिक तांदूळ निर्यात करणारा देश ठरला आहे. भारताने तेव्हा २.२० कोटी टन तांदूळ परदेशात पाठविला.
थायलंड हा देश त्यांच्या उच्च प्रतीचे जॅस्मिन तांदळासाठी प्रसिद्ध आहे. व्हिएतनामही मोठा उत्पादक आहे. पाकिस्तान बासमती राईस निर्यात करतो. अमेरिकाही तांदूळ निर्यात करतो. या देशांची आणि आपली आकडेवारी पाहिली तर दुसऱ्या क्रमांकापासून सातव्या क्रमांकापर्यंतचे जे देश आहे, ते मिळून जेवढा तांदूळ निर्यात करत नाहीत तेवढा तांदूळ एकटा भारत देश निर्यात करत आहे.
भारताने तांदळाच्या निर्यातीवर निर्बंध लादले होते. यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात दर चढे होते. नुकतीच भारताने हे निर्बंध हटविले आहेत. यामुळे तांदळाचे दर धाडकन खाली आले आहेत. जानेवारी २०२४ मध्ये थायलंडच्या तांदळाचे दर हे $६६९ प्रति टन होते. ते आता ४०५ डॉलर्सपर्यंत आले आहेत. भारताच्या १.४ अब्ज लोकसंख्येपैकी ४२% पेक्षा जास्त लोक शेतीवर अवलंबून आहेत. ही निर्यातबंदी उठविल्याने त्याचा फायदा शेतकऱ्यांना होण्याची शक्यता आहे.
देश प्रमाण टनमध्ये किंमत अमेरिकन डॉलरमध्ये१ भारत २,२०७३,७४७ १,०७,६६,६२३२ थायलंड ७,६८४,७३२ ३,९५५,२३२३ व्हिएतनाम ५४,३७,९११ २२,८५,४७९४ पाकिस्तान ४५,६८,६४६ २३,२२,२७८५ चीन २३,४९,३०४ ११,२५,१७६६ अमेरिका २१,२४,६८१ १७,०२,०६५७ म्यानमार २०,७०,८५५ ७,८६,८३९८ ब्राझील १,४०९,१३४ ६,५७,४८६९ उरुग्वे ९,७९,८३४ ४,९८,०३०१० इटली ७,२१,२६१ ८,०४,४९३