शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

काबूल हल्ल्यानंतर भारताचं मोठं पाऊल; 100 हून अधिक शिख-हिंदूंना दिला ई-व्हिसा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 19, 2022 18:03 IST

गृह मंत्रालयाने अफगाणिस्तानातील 100 हून अधिक शीख आणि हिंदूंसाठी प्राधान्याने ई-व्हिसा मंजूर केला आहे.

अफगाणिस्तानची राजधानी काबूल येथे गुरुद्वाऱ्यावर झालेल्या हल्ल्यानंतर भारताने मोठे पाऊल उचलले आहे. गृह मंत्रालयाने अफगाणिस्तानातील 100 हून अधिक शीख आणि हिंदूंना प्राधान्याने ई-व्हिसा मंजूर करून दिला आहे. हा व्हिसा ऑनलाइनही मिळवता येऊ शकतो.

एएनआय या वृत्तसंस्थेने सूत्रांच्या हवाल्याने म्हटले आहे, की काबुल हल्ल्यानंतर, गृह मंत्रालयाने अफगाणिस्तानातील 100 हून अधिक शीख आणि हिंदूंसाठी प्राधान्याने ई-व्हिसा मंजूर केला आहे. भारत सरकारने जारी केलेला हा ई-व्हिसा ऑनलाइन पद्धतीने अर्ज करूनही मिळवता येऊ शकतो. तर दुसरीकडे, गुरुद्वारावर हल्ला झाल्यापासून भारताचे परराष्ट्र मंत्रालय याकडे बारकाईने लक्ष ठेवून आहे.

यापूर्वी, तालिबानच्या अफगाणिस्तानवरील कब्जा दरम्यान, गेल्या वर्षी 15 ऑगस्टला गृह मंत्रालयाकडून ई-व्हिसा जारी करण्यात आला होता. शनिवारी झालेल्या या हल्ल्यात एका शीख व्यक्तीसह दोन जणांचा मृत्यू झाला, तर इतर सात जण गंभीर जखमी झाले आहेत. या हल्ल्यादरम्यान एका बंदुकधाऱ्याने एक हँडग्रेनेड फेकले होते. यामुळे गुरुद्वाऱ्याच्या गेटजवळ आग लागली. यावेळी अफगाणिस्तानच्या एका सुरक्षा रक्षकाने स्फोटकांनी भरलेली गाडी गुरुद्वाऱ्यात जाण्यापासून रोखल्याने, आणखी एक मोठी दुर्घटना टळली.

घटनाक्रमावर भारताची बारीक नजर - या हल्ल्यानंतर, भारतीय परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ता अरिंदम बागची म्हणाले, काबुल शहरातील पवित्र गुरुद्वाऱ्यावर हल्ल्याच्या वृत्तानंतर आम्ही चिंतीत आहोत. तर परराष्ट्रमंत्री सुब्रमण्यम जयशंकर म्हणाले, गुरुद्वारा कार्त-ए-परवान वर झालेल्या भ्याड हल्ल्याचा सर्वांनी तीव्र शब्दात निशेद करायला हवा. हल्ल्याची माहिती मिळाल्यापासून आम्ही घटनाक्रमावर बारकाईने लक्ष ठेवून आहोत.

टॅग्स :Afghanistanअफगाणिस्तानAmit Shahअमित शाहTerror Attackदहशतवादी हल्लाsikhशीखHinduहिंदू