India banned 16 Pakistani YouTube Channels: पहलगाममधील हल्ल्यानंतर भारताविरोधात गरळ ओकणाऱ्या १६ पाकिस्तानी युट्यूब चॅनेल्सना केंद्र सरकारने दणका दिला. भारताने या चॅनेल्सवर बंदी घालण्याच्या निर्णय घेतला आहे. यात काही युट्यूबर्स तर काही वृत्त वाहिन्यांच्या चॅनेल्सचा समावेश आहे.
२२ एप्रिल रोजी पहलगाममधील बैसरन पठारावर निशस्त्र पर्यटकांवर दहशतवाद्यांनी हल्ला केला. पाकिस्तानातील दहशतवादी संघटनांचा या हल्ल्यामध्ये सहभाग असून, केंद्र सरकारकडून पाकिस्तानला कोंडीत पकडण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
भारताविरोधात चुकीच्या माहितीचा प्रसार
पहलगाममधील हल्ल्यानंतर दहशतवाद्यांविरोधात धडक मोहीम हाती घेण्यात आली असून, सीमेवर तणाव वाढला आहे. अशात काही पाकिस्तानी युट्यूब चॅनेल्सच्या माध्यमातून भारताविरोधात गरळ ओकण्याचे काम होत आहे. त्या चॅनेल्सवर भारताने आता बंदी घातली आहे. बंदी घालण्यात आलेल्या चॅनेल्समध्ये १६ चॅनेल्सचा समावेश आहे.
बातमी अपडेट केली जात आहे