शहरं
Join us  
Trending Stories
1
शांती चर्चेला खो! इराणने अमेरिकेसमोर अ़डवली गाडी; होर्मुझचा अडथळा दूर झाल्याशिवाय चर्चाच नाही!
2
धार्मिक चालीरितींचे पालन करण्याचा कार्यालयातील तरुणींवर दबाव, नागपुरातील एनजीओ चालकाला अटक
3
मृत्यूनंतर ५० दिवस उलटले, तरी अयातुल्ला अली खामेनेईंच्या अंत्यविधीचा पत्ता नाही; इराण नक्की कशाला घाबरतोय?
4
IPL 2026 : पंतच्या LSG ला पराभूत करत Punjab Kings नं रचला इतिहास; १९ वर्षांत पहिल्यांदाच असं घडलं
5
Bigg Boss Marathi 6 Winner: अंदाज खरा ठरला! तन्वी कोलतेने पटकावली 'बिग बॉस मराठी ६'ची ट्रॉफी; राकेश बापट उपविजेता
6
'...तर इराणचे पॉवर प्लांट नष्ट करू', पाकिस्तानमधील शांतता बैठकीपूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
7
उरुळी कांचनमध्ये अल्पवयीनावर लैंगिक अत्याचार; ग्राफिक्स व्यावसायिकाविरुद्ध गुन्हा
8
Tanvi Kolte: 'बिग बॉस मराठी ६'ची विजेती तन्वी कोलतेचं घराबाहेर जाताना मोठं विधान, म्हणाली- "मी आता एक ब्रँड म्हणून..."
9
एडन मार्करम ते अभिषेक शर्मा! IPL इतिहासात एका षटकात ५ षटकार खाणारे ७ गोलंदाज
10
Video: "घुसखोर निघाला ना, तर तुला इथूनच उचलून घेऊन जाईन", म्हाडाचे उपाध्यक्ष IAS संजीव जयस्वाल यांची रहिवाशाला दमबाजी; व्हिडीओ व्हायरल
11
चाकूर हादरले; गायब दोघा चिमुकल्या भावंडांपैकी एकाचा मृतदेहच आढळला!
12
Bigg Boss Marathi 6: अनुश्री माने गेली घराबाहेर! 'बिग बॉस मराठी ६'चा प्रवास संपला, विशाल रडला
13
शतकासाठी नव्हे आम्ही संघासाठी खेळतो! प्रियांश-कूपर जोडीचा सुपर हिट शो; एका डावात अनेक विक्रम
14
ट्रम्प पाकिस्तानात येणार? इस्लामाबादमध्ये कडेकोट सुरक्षा; अमेरिका-इराण चर्चेच्या पार्श्वभूमीवर ‘लॉकडाऊन’सारखी स्थिती
15
पापणी लवते न लवते तोच... 'खेळ खल्लास!' Dhruv Jurel च्या स्टंपिंगला 'क्रिकेटच्या देवा'नंही दिली दाद
16
Bigg Boss Marathi 6: 'हा' स्पर्धक गेला घराबाहेर! ग्रँड फिनालेच्या सुरुवातीलाच मोठा धक्का
17
फटाक्याच्या कारखान्यात भंयकर स्फोट, १९ कामगारांचा तडफडून मृत्यू, ६ जण होरपळले
18
नातं रक्ताचं नाही तर मनाचं! पत्नीचं दुसऱ्यावर जडलं प्रेम; पतीनेच पुढाकार घेऊन प्रियकरासोबत रवाना केलं!
19
अकोला, वर्धा देशात सर्वाधिक ‘हॉट’; पार ४५ अंश सेल्सिअसवर पारा
20
Solapur Crime: 'तुम्ही येथून निघून जा म्हणायचा', मृतदेह सापडलेल्या मल्हारीचा बहिणीनेच आवळला गळा; हत्येचे बिंग कसे फुटले?
Daily Top 2Weekly Top 5

भारतावर हल्ल्याचा सईदचा पुन्हा कट?

By admin | Updated: December 29, 2016 00:07 IST

लष्कर-ए-तय्यबाचा म्होरक्या आणि मुंबईवर २00८ साली झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा सूत्रधार हाफिज सईद आता पुन्हा भारतावर हल्ला करण्याचा कट रचत आहे.

इस्लामाबाद : लष्कर-ए-तय्यबाचा म्होरक्या आणि मुंबईवर २00८ साली झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा सूत्रधार हाफिज सईद आता पुन्हा भारतावर हल्ला करण्याचा कट रचत आहे. यासाठी त्याने इस्लामिक स्टेट (इसिस)ची मदत मागितली असल्याचे वृत्त आहे. इस्लामिक स्टेटला आपल्या दहशतवादी कारवायांमध्ये सहभागी करून घेण्यासाठी हाफिज सईदची लष्कर-ए-तय्यबा तसेच फलाह-ए-इन्सानियत या दोन्ही संघटना सीरियामध्ये सक्रिय झाल्या आहेत.गुप्तचर यंत्रणांनी दिलेल्या माहितीनुसार, हाफिज सईदची संघटना फलाह-ए-इन्सानियत तेथील लोकांना मदत पुरवण्याचे काम करत आहे. पण मदतीच्या नावाखाली हाफिज सईद प्रत्यक्षात सीरियीमधील इस्लामिक स्टेटच्या दहशतवाद्यांशी संपर्क साधत असल्याची शंका व्यक्त केली जात आहे. फलाह-ए-इन्सानियत संघटनेच्या नावाखाली हाफिज सईद लष्कर-ए-तयब्बाचे दहशतवादी नेटवर्क चालवतो, हे उघड झाले आहे. गुप्तचर यंत्रणांनी दिलेल्या माहितीनुसार हाफिज इस्लामिक स्टेटच्या मदतीने भारतावर हल्ला करण्याचा कट रचत आहे. याशिवाय हाफिज सईदने पाकिस्तान सरकारला भारताशी मैत्री न करण्याचा सल्ला दिला आहे. भारतीय जवान काश्मीरमधील लोकांवर अत्याचार करीत असल्याचा आरोप हाफिज सतत करीत आला आहे. या आरोपांद्वारे तो पाकव्याप्त काश्मीरमधील लोकांची सहानुभूती व आर्थिक मदत मिळवत असतो. काश्मीरमधील लोकांना मदत केली पाहिजे, त्यांच्या समस्या सोडवल्या पाहिजे, अशी मागणी त्याने पाकिस्तान सरकारकडे केली आहे. या वर्षीच्या जानेवारी महिन्यात फलाह-ए-इन्सानियत फाउंडेशनवर बंदी घालण्याची तयारी सरकारने सुरू केली होती. तसेच त्याच्याच जमात उल दवा या संघटनेवरही सरकारने बंदी घालण्याचे ठरवले होते. पण अद्याप या सर्व संघटना पाकिस्तानात, विशेषत: पाकव्याप्त काश्मीरमध्ये कार्यरत आहेत. फलाह-ए-इन्सानियत फाउंडेशनतर्फे अनेक ठिकाणी मोफत दवाखानेही चालविले जातात. (वृत्तसंस्था)फलाह-ए-इन्सानियतविषयीफलाह-ए-इन्सानियत फाउंडेशन ही संस्था गरीब लोकांना अन्नधान्य तसेच अन्य मदत करण्यासाठी हाफिज सईदने स्थापन केली असली तरी त्या मार्गाने लष्कर-ए-तयब्बासाठी अतिरेकी तयार करण्याचा त्याचा प्रयत्न असतो. फलाह-ए-इन्सानियत फाउंडेशनने रक्तदान शिबिरे, वैद्यकीय तपासणी शिबिरे अशी कामे करून पाकव्याप्त काश्मीरमध्ये लोकांची सहानुभूती मिळवली आहे. मात्र या संस्थेच्या कामांचा अंतिम उद्देश अतिरेकी कायवाया आहे, हे पाकिस्तान सरकारलाही माहीत आहे.