शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
6
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
7
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
8
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
9
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
10
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
11
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
12
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
13
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
14
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
15
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
16
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
17
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
18
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
19
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
20
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
Daily Top 2Weekly Top 5

कॅनडामध्ये खलिस्तान्यांकडून इंदिरा गांधींच्या हत्येचा चित्ररथ, भारताची संतप्त प्रतिक्रिया

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 8, 2023 15:18 IST

Indira Gandhi: कॅनडामध्ये खलिस्तान्यांकडून इंदिरा गाधी यांच्या हत्येचा चित्ररथ फिरवण्यात आल्याचा घटनेबाबत भारत सरकारने संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. ही बाब दोन्ही देशांतील संबंधांसाठी चांगली नसल्याचे खडेबोल परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी सुनावले आहेत.

कॅनडामध्ये खलिस्तान्यांकडून इंदिरा गाधी यांच्या हत्येचा चित्ररथ फिरवण्यात आल्याचा घटनेबाबत भारत सरकारने संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. ही बाब दोन्ही देशांतील संबंधांसाठी चांगली नसल्याचे खडेबोल परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी सुनावले आहेत. मला वाटतं की, यामध्ये एका मोठा मुद्दा समाविष्ट आहे, स्पष्टपणे सांगायचं तर व्होटबँकेच्या राजकारणाशिवाय असं कोण कशाला करेल, असा प्रश्न जयशंकर यांनी उपस्थित केला आहे. परराष्ट्रमंत्री जयशंकर म्हणाले की, मला वाटतं की, हा एक मोठा अंतर्निहित मुद्दा आहे. त्या स्थानाबाबत जे फुटिरतावादी, कट्टरतावादी, हिंसाचाराचं समर्थन करणारे यांना दिलं जातं. मला वाटतं की,हे दोन देशांच्या संबंधांसाठी चांगलं नाही आहे. तसेच कॅनडासाठीही चांगलं नाही आहे.

यादरम्यान, काँग्रेसने कॅनडामध्ये माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या हत्येचा प्रसंग दाखवत काढलेल्या कथित चित्ररथाच्या घटनेचा निषेध करत भारत सरकारने हा मुद्दा कॅनडासमोर सक्षमपणे मांडावा, अशी मागणी केली. काँग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश यांनी ट्विट करून एस. जयशंकर यांच्याकडे ही मागणी केली आहे.

प्रसारमाध्यमांमध्ये येत असलेल्या वृत्तानुसार कॅनडामधील बेम्पटन येथे खलिस्तान समर्थकांनी हल्लीच इंदिरा गांधी यांच्या हत्येचा प्रसंग दाखवणारा चित्ररथ फिरवला होता. त्याचा व्हिडीओ शेअर करत काँग्रेसचे नेते मिलिंद देवरा यांनी ट्निट केलं की, कॅनडाच्या ब्रेम्पटन येथे पाच किलोमीटर लांबीची रॅली काढण्यात आली, ज्यात इंदिरा गांधी यांच्या हत्येचा चित्ररथ दाखवण्यात आला, हे पाहून एक भारतीय म्हणून मला वेदना झाल्या. हा कुणाची बाजू घेणयाचा विषय नाही आहे. तर राष्ट्राचा इतिहास आणि माजी पंतप्रधानांच्या हत्येमुळे झालेल्या वेदनेच्या सन्मानाची बाब आहे.

देवरा पुढे म्हणाले की, कट्टरतावादाचा सार्वत्रिकपणे निषेध केला गेला पाहिजे. तसेच त्याचा मिळून सामना केला पाहिजे. देवरा यांचं हे ट्विट रीट्विट करत जयराम रमेश यांनी या विधानाशी मी पूर्णपणे सहमत असल्याचे सांगितले. तसेच कॅनडासमोर हा मुद्दा सक्षमपणे मांडला जावा, अशी मी जयशंकर यांच्याकडे मागणी करतो, असेही रमेश म्हणाले.  

टॅग्स :Indira Gandhiइंदिरा गांधीIndiaभारतCanadaकॅनडाS. Jaishankarएस. जयशंकर