दहशतवादाविरोधात भारताची कारवाई कौतुकास्पद - शाहरुख खान

By Admin | Updated: September 29, 2016 20:50 IST2016-09-29T20:06:36+5:302016-09-29T20:50:54+5:30

भारतीय लष्कराच्या आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भूमिकेचं सोशल मीडियावर नेटिझन्सनी तोंडभरून कौतुक करत आहेत.

India's action against terrorism is appreciated - Shahrukh Khan | दहशतवादाविरोधात भारताची कारवाई कौतुकास्पद - शाहरुख खान

दहशतवादाविरोधात भारताची कारवाई कौतुकास्पद - शाहरुख खान

ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 29 - उरी दहशतवादी हल्ल्याच्या प्रत्युत्तरादाखल भारतीय जवानांनी काल मध्यरात्री नियंत्रण रेषा ओलांडून पाकव्याप्त काश्मीरमध्ये सर्जिकल स्ट्राईक्स करुन 35-40 जणांचा खात्मा केला. भारतीय लष्कराच्या आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भूमिकेचं सोशल मीडियावर नेटिझन्सनी तोंडभरून कौतुक करत आहेत. सर्वच स्तरावरुन जवानांवर कौतुकाची थाप पडत आहे. यामध्ये बॉलिवूडचा किंग खान शाहरुखने उडी घेतली आहे.

शाहरुख खानने ट्विट करत जवानांचे कौतुक करताना म्हटले आहे की, भारतीय जवानांनी दहशतवादाविरोधात केलेली कारवाई ही कौतुकास्पद आहे. भारतीय जवानांनी दहशतवादाविरोधात कारवाई केली, त्याबद्दल धन्यवाद ! जवानांच्या कल्याणासाठी आणि आरोग्यासाठी मी प्रार्थना करेन.

 

शाहरुखसह, आशा भोसले, वरुण धवन यांनी देखील भारतीय जवानांचे कौतुक केले आहे.

 

Web Title: India's action against terrorism is appreciated - Shahrukh Khan