भारतीयांना मिळणार प्रभावी कोरोना लस; केंद्रीय आरोग्यमंत्र्याचं जनतेला आश्वासन

By ऑनलाइन लोकमत | Published: December 1, 2020 03:36 AM2020-12-01T03:36:49+5:302020-12-01T07:52:25+5:30

या संसर्गातून बरे झालेल्यांचा आकडा ८८,४७,६०० झाला असून, त्यांचे प्रमाण ९३.८१ टक्के झाले आहे.

Indians will get effective corona vaccine; Union Health Minister's assurance to the people | भारतीयांना मिळणार प्रभावी कोरोना लस; केंद्रीय आरोग्यमंत्र्याचं जनतेला आश्वासन

भारतीयांना मिळणार प्रभावी कोरोना लस; केंद्रीय आरोग्यमंत्र्याचं जनतेला आश्वासन

Next

नवी दिल्ली : येत्या काही महिन्यांत भारतीयांसाठी अत्यंत सुरक्षित, प्रभावी कोरोना प्रतिबंधक लस उपलब्ध होईल असे केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी सांगितले. ते म्हणाले, येत्या जून-जुलै महिन्यापर्यंत भारतातील ३० कोटी नागरिकांना कोरोना लस टोचली जाणार आहे.
देशात सोमवारी कोरोनाचे ३८,७७२ नवे रुग्ण आढळून आले असून, एकूण रुग्णसंख्या ९४,३१,६९१ झाली आहे. एका दिवसात ४० हजारांहून कमी रुग्ण आढळण्याची घटना गेल्या महिनाभरात सात वेळा घडली आहे.

या संसर्गातून बरे झालेल्यांचा आकडा ८८,४७,६०० झाला असून, त्यांचे प्रमाण ९३.८१ टक्के झाले आहे. सोमवारी आणखी ४४३ जण मरण पावले असून, बळींची एकूण संख्या १,३७,१३९ झाली आहे. कोरोना रुग्णांचा मृत्यूदर अवघा १.४५ टक्के आहे. केंद्रीय आरोग्य खात्याने दिलेल्या माहितीनुसार, देशात ४,४६,९५२ सक्रिय रुग्ण आहेत. जगभरात कोरोनाचे ६ कोटी ३१ लाख रुग्ण असून, त्यातील ४ लाख ३५ हजार जण बरे झाले. अमेरिकेत कोरोना रुग्णांचा आकडा १ कोटी ३७ लाख झाला असून, त्यातील ८१ लाख लोक बरे झाले.

महाराष्ट्रासह पाच राज्यांमध्ये सक्रिय रुग्णांत घट
महाराष्ट्र, केरळ, तामिळनाडू, आंध्र प्रदेश, कर्नाटक या पाच राज्यांमध्ये गेल्या महिनाभरात सक्रिय रुग्णांच्या संख्येत लक्षणीय घट झाली आहे. देशात कोरोना चाचण्यांनी १४ कोटींचा पल्ला पार केला आहे.

Web Title: Indians will get effective corona vaccine; Union Health Minister's assurance to the people

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.