'भारतीयांनी 'कोरोना'ला घाबरण्याची गरज नाही; आपण त्यावर विजय मिळवतोय'

By ऑनलाइन लोकमत | Published: March 6, 2020 10:55 AM2020-03-06T10:55:13+5:302020-03-06T10:56:41+5:30

कोरोनामुळे तीन हजारहून अधिक लोकांना आपला जीव गमावला आहे. तर 90 हजार लोक या व्हायरसने त्रस्त आहे. त्याचवेळी 53 हजार लोक या आजारातून बरे झाल्याकडे गगनदीप यांनी लक्ष वेधले. 

The Indians need not be afraid of 'Corona'; We are winning over it ' | 'भारतीयांनी 'कोरोना'ला घाबरण्याची गरज नाही; आपण त्यावर विजय मिळवतोय'

'भारतीयांनी 'कोरोना'ला घाबरण्याची गरज नाही; आपण त्यावर विजय मिळवतोय'

Next

नवी दिल्ली - जगभरात पसरलेल्या कोरोना व्हायरसमुळे मागील दोन तीन दिवसांपासून भारतात देखील भीतीचे वातावरण तयार झाले आहे. भारतातकोरोनाग्रस्त पाच पैकी एक रुग्ण स्वत:च ठीक होत आहे. हे पाहता भारतीयांनी कोरोना व्हायरसला घाबरण्याची गरज नसल्याचे भारतीय शास्त्रज्ञ गगनदीप कांग यांनी म्हटले आहे.

गगनदीप कांग म्हणाल्या की, कोरोना व्हायरसचे 30 रुग्ण आढळले आहे. यामध्ये इटलीच्या 16 रुग्णांचा समावेश आहे. तर केरळमधील तीन रुग्ण आहेत. मात्र हे तिन्ही रुग्ण पूर्णपणे ठीक झाले आहेत. गेल्या वर्षी लंडनमधील रॉयल सोसायटीमध्ये फेलो म्हणून निवडण्यात आलेल्या पहिल्या भारतीय महिला गगनदीप यांनी सरकारी दवाखान्यांकडून लोकांमध्ये जागरुकता करण्याची अपेक्षा व्यक्त केली आहे. कोरोना रुग्णापासून दूर राहण्यासाठीची आवश्यक खबरदारी लोकांना घेण्याचे आवाहन सरकार दवाखान्यांनी करावे, अस त्यांनी सांगितले.

काळजी घेणे कोरोनावर पक्का उपाय नाही. मात्र काळजी घेणे आपल्यासाठी उपयोगी पडू शकते. कोरोना व्हायरसचे 5 पैकी चार रुग्ण आपोआप ठीक होतात. कोरोनाच्या रुग्णांना केवळ पॅरासिटोमॉल पुरेशा असतात. तर पाचपैकी एका व्यक्तीला रुग्णालयात दाखल करण्याची आवश्यकता भासू शकते, असं गगनदीप यांनी सांगितले. तसेच श्वास घेताना अडचण आल्यास तातडीने रुग्णालयात दाखल करणे आवश्यक असल्याचे गगनदीप यांनी सांगितले.

कोरोनाविषयी फार काळजी करण्याची आवश्यकता नाही. आम्ही दररोज व्हायरसच्या संपर्कात येतो. केवळ आपले हात स्वच्छ धुवून घ्यावे. फर्चीवर किटकनाशक टाकवे.  तसेच चेहऱ्याला वारंवार हात लावू नये, असंही गगनदीप यांनी सांगितले. दरम्यान कोरोनामुळे तीन हजारहून अधिक लोकांना आपला जीव गमावला आहे. तर 90 हजार लोक या व्हायरसने त्रस्त आहे. त्याचवेळी 53 हजार लोक या आजारातून बरे झाल्याकडे गगनदीप यांनी लक्ष वेधले. 
 

Web Title: The Indians need not be afraid of 'Corona'; We are winning over it '

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.