शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या बारामतीतील प्रचाराच्या सांगता सभेत अचानक अजितदादांची एंट्री; नेमकं काय घडलं?
2
चेन्नई सुपर किंग्सने बदलले Point Table चे चित्र; दुसऱ्या फळीच्या गोलंदाजांना घेऊन १११५ दिवसांनी जिंकले
3
"एका पठ्ठ्याने अश्रू काढले, घ्या मी पण रडतो, मला मत द्या", अजित पवारांनी केली नक्कल
4
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
5
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
6
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
7
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
8
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
9
“राज ठाकरे ज्यांच्या प्रचारासाठी जातात तो उमेदवार पडतोच”; ठाकरे गटाचा खोचक टोला
10
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
11
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
12
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
13
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
14
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
15
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
16
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
17
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
18
PHOTOS : पती IPL मध्ये तर पत्नी निवडणुकीत 'बिझी', भाजपसाठी रिवाबा जडेजा 'मैदानात'!
19
६ धावांत ३ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
20
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!

कोरोनाचा अंधकार दूर करण्यासाठी देशाने साजरी केली 9 मिनिटांची दिवाळी, पंतप्रधानांच्या आवाहनाला उत्स्फूर्त प्रतिसाद

By ऑनलाइन लोकमत | Published: April 05, 2020 9:59 PM

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या आवाहनाला देशातील जनतेने उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. रविवारी रात्री बरोबर 9 वाजता 9 मिनिटांसाठी देशातील जनतेने घरातील सर्व लाईट बंद करून दिवे, मेनबत्या आणि टॉर्च लावत कोरोनाच्या लढाईत आम्ही सर्वजण एक आहोत, हे दाखवून दिले आहे.

ठळक मुद्देदेशवासीयांनी पंतप्रधानांच्या आवाहनाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिलाकोरोनाच्या लढाईत देशाने घडवले एकतेचे दर्शनघरा-घरात दिसला दिवे, मेनबत्या आणि टॉर्चचा प्रकाश

मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधाननरेंद्र मोदी यांनी केलेल्या आवाहनाला देशातील जनतेने उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. रविवारी रात्री बरोबर 9 वाजता 9 मिनिटांसाठी देशातील जनतेने घरातील सर्व लाईट बंद करून दिवे, मेनबत्या आणि टॉर्च लावत कोरोनाच्या लढाईत आम्ही सर्वजण एक आहोत, हे दाखवून दिले आहे.

कोरोनाने संपूर्ण जगात थैमान घातले आहे. आता तो आपल्या देशातही वेगाने हातपाय पसरू लागला आहे. त्याचा सामना करण्यासाठी सरकारने संपूर्ण देशातच लॉकडॉऊन केले आहे. या काळात जनतेने आपल्या घरातच राहावे आणि सोशल डिस्टंसिंगचे काटेकोरपणे पालन करावे, असेही सरकारच्या वतीने सांगण्यात आले आहे. एवढेच नाही, तर या कोरोनाचा पराभव करण्यासाठी जनतेने काय करावे आणि काय करून नये यासंदर्भातही वारंवार सरकारकडून सूचना केल्या जात आहे. जनतेकडूनही मोठ्या प्रमाणावर याचे पालन केले जात आहे. आज पंतप्रधानांनी केलेल्या आवाहनाला संपूर्ण देशातील जनतेने उत्स्फूर्त प्रतिसाद देत कोरोनाविरुद्धच्या या लढाईत आम्ही सर्व एक आहोत याचे दर्शन घडवले आहे.

पंतप्रधानांसह या नेत्यांनी आपापल्या निवासस्थानीच प्रज्वलित केले दिवे -खुद्द पंतप्रधान मोदी यांनीही आपल्या निवासस्थानी सर्व लाईट बंद करून समई लावून दीप प्रज्वलित केला. याशिवाय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह, केंद्रीयमंत्री रविशंकर प्रसाद, गृहमंत्री अमित शाह, भाजपा अध्यक्ष जेपी नड्डा, उपराष्ट्रपती वंकय्या नायडू, आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री आदित्यनाथ आदी नेत्यांनी आपापल्या घरी घरातील सर्व लाईट बंद करून दिवे आणि मेनबत्त्या लावल्या आणि कोरोनाला हरवण्याचा संकल्प केला.

राष्ट्रपती रामनाथ यांनी कुटुंबियांसह प्रज्वलित केले दिवे -यावेळी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनीही आपल्या घरातील सर्व लाईट विजवून कुटुंबीयांसह दिवे प्रज्वलित केले आणि कोरोनाच्या लढाईत देशवासीयांबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. याशिवाय उद्योग आणि कला क्षेत्रातील मंडळींनीही पंतप्रधान मोदींच्या आवाहनाला उस्त्फूर्त प्रतिसाद देत, आम्हीही कोरोनाच्या लढाईत सर्व भारतीयांसोबत असल्याचे दाखवून दिले.

सर्वच राज्यांतील जनतेचा मोदींच्या आवाहनाला प्रतिसाद -पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनाला अगदी उत्तेरेपासून ते दक्षिणेपर्यंत आणि पूर्वेपासून ते पश्चिमेपर्यंतच्या सर्वच राज्यांतील जनतेने उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर यांनीही पंतप्रधान मोदींच्या आवाहनाला प्रतिसाद दिला आहे. घोषणांनी दुमदुमले आकाश -यावेळी अनेकांनी घरातील मेनबत्या आणि अगदी दिवाळीच्या पणत्याही काढून ठेवल्या होत्या. अनेक ठिकाणी दिवे सजवून ठेवण्यात आले होते. तर काही ठिकाणी दिव्यांचे डिझाईनही बघायला मिळाले. तसेच या वेळी अनेक घरांतून आणि सोयट्यांमधूनही 'गो कोरोना गो, भारत माता की जय आणि एकतेचा संदेश देणाऱ्या घोषणा ऐकायला मिळाल्या. यावेळी आसमंत दुमदुमून गेला होता

पंतप्रधान मोदींनी शुक्रवारी केले होते आवाहन -पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी सर्व भारतीयांना आवाहन, 'सामूहिक संकल्प' करण्यासाठी पाच एप्रिलला रात्री 9 वाजता 9 मिनिटांसाठी आपापल्या घरातील लाईट बंद करून दिवे मेनबत्ती अथवा मोबाईलच्या टॉर्ट  लावण्याचे आवाहन केले होते. पंतप्रधानांनी केलेल्या या आवाहनानंतर अनेकांनी त्यांच्यावर टीका केली होती. मात्र आज जनतेने मोदींना जो काही प्रतिसाद दिला आणि घराघरात जे दीप उजळले त्यातून आज कोरोनाविरोधातील देशाच्या एकतेचे जगाला दर्शण घडले आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याMumbaiमुंबईIndiaभारतNarendra Modiनरेंद्र मोदीPresidentराष्ट्राध्यक्षprime ministerपंतप्रधानAmit Shahअमित शहाRajnath Singhराजनाथ सिंहRavi Shankar Prasadरविशंकर प्रसादyogi adityanathयोगी आदित्यनाथVenkaiah Naiduव्यंकय्या नायडूRamnath Kovindरामनाथ कोविंद