शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

भारतीयांचं सरासरी वय वाढलं, 1970 मध्ये 47 वर्षांपर्यंत जगायचे लोक, आता झालं एवढं!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 6, 2022 19:09 IST

या अहवालात म्हणण्यात आले आहे, की भारतीयांचे सरासरी वय तर वाढले आहे, पण उपचारांचा खर्च लोकांच्या बजेट बाहेर जात आहे. एकूणच, भारताने आरोग्य सेवेच्या क्षेत्रात मोठे काम केले आहे. मात्र, अजूनही खूप काही करण्याची आवश्यकता आहे.

डब्ल्यूएचओने (WHO) नुकत्याच जारी केलेल्या एका अहवालात दावा करण्यात आला आहे की, भारत आजारांचा सामना करण्यात पूर्वीच्या तुलनेत आता अधिक चांगली कामगिरी करत आहे. याच बरोबर, भारतात आजारांचे प्रकार बदलले असल्याचा दावाही करण्यात आला आहे. इंडिया हेल्थ सिस्टिम रिव्ह्यू (India Health System Review) नावाच्या या अहवालात भारताच्या आरोग्य व्यवस्थेचा लेखाजोखा देण्यात आला आहे.

अहवालात अनेक खुलासे - या अहवालात म्हणण्यात आले आहे, की भारतीयांचे सरासरी वय तर वाढले आहे, पण उपचारांचा खर्च लोकांच्या बजेट बाहेर जात आहे. एकूणच, भारताने आरोग्य सेवेच्या क्षेत्रात मोठे काम केले आहे. मात्र, अजूनही खूप काही करण्याची आवश्यकता आहे.

भारतीयांच्या सरासरी वयात मोठी सुधारणा -भारतात 1970 मध्ये लोक 47 वर्षांपर्यंत जगत होते, आता (2020च्या आकडेवारीनुसार) भारतीयांचे सरासरी वय 70 वर्षं झाले आहे. महिलांचे सरासरी वय 24 वर्षांनी वाढले आहे तर पुरुषांचे वय 20 वर्षांनी वाढले आहे. यानुसार भारतातील महिलांचे सरासरी वय 71 वर्षे आणि पुरुषांचे सरासरी वय 68 वर्षे आहे. श्रीलंकेतील सरासरी वय 74 वर्षे असून चीनमध्ये सरासरी वय 75 वर्षे आहे.  

नवजात बालकांच्या मृत्यूच्या आकडेवारीतही सुधारणा -या अहवालानुसार, 1970 मध्ये 1000 बालकांपैकी 132 बालकांचा जन्माला येताच मृत्यू होत होता. मात्र, आता या आकड्यातही मोठी सुधारणा झाली आहे. 2020 च्या आकडेवारीनुसार, 1000 पैकी 32 नवजात बालकांचा मृत्यू होतो. तसेच, प्रसूतीदरम्यान महिलांच्या मृत्यूच्या घटनांमध्येही घट झाली आहे. 1990 च्या आकडेवारीनुसार 10 हजारांपैकी 556 महिलांचा प्रसूतीदरम्यान मृत्यू झाला होता. मात्र, 2018 पर्यंत हा आकडा कमी होऊन 10 हजारपैकी 113 वर आला आहे.

पब्लिक हेल्थवर कमी खर्च करतो भारत - याचप्रमाणे, भारतात 10 हजार लोकांमागे 9.28 टक्के डॉक्टर आणि 24 परिचारिका आहेत. याच बरोबर 10 हजार लोकांमागे 9 फार्मासिस्ट असल्याचेही अहवालात म्हटले आहे. भारतात सार्वजनिक आरोग्यावर फार कमी खर्च करतो, असेही अहवालात नमूद करण्यात आले आहे.

टॅग्स :World health organisationजागतिक आरोग्य संघटनाIndiaभारतHealthआरोग्यMedicalवैद्यकीय