शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

भारतीय महिलेने केसाने ओढली डबल-डेकर बस

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 5, 2022 06:34 IST

आशा राणी यांच्या मजबूत केसांनी नेटीझन्सला भुरळ घातली आहे. या केसांना मिळालेल्या शक्तीमागे काेणती शक्ती आहे, असा प्रश्नही विचारला आहे.

नवी दिल्ली : विश्वास बसणार नाही; परंतु भारतीय आशा राणी यांनी स्वत:च्या केसांनी डबलडेकर बस ओढून गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड स्थापन केले आहे. या विक्रमाचा व्हिडिओ गिनीज वर्ल्ड रेकॉर्डच्या अधिकृत इन्स्टाग्रामवर पोस्ट झाल्यावर नेटिझन्स अवाक् झाले.

या डबल डेकर बसचे वजन १२ हजार किलोग्रॅम आहे. आशा राणी यांची वेणी घट्टपणे या बसला बांधल्याचे व्हिडिओत दिसते. आशा राणी या बस काळजीपूर्वक ओढताना दिसतात. जागतिक विक्रम स्थापन होताच त्यांच्या डोळ्यांत अश्रू आले. प्रचंड वजनदार वाहन (१२,२१६ किलोग्रॅम) आशा राणी यांनी केसांनी ओढले, असे व्हिडिओसोबत म्हटले.२०१६ मध्ये आशा राणी यांनी अशी कामगिरी केली होती, असे गिनीज वर्ल्ड रेकॉर्डने शेअर केलेल्या ब्लॉगमध्ये म्हटले आहे. 

मजबूत केसांमागे काेणती शक्ती?आशा राणी यांच्या मजबूत केसांनी नेटीझन्सला भुरळ घातली आहे. या केसांना मिळालेल्या शक्तीमागे काेणती शक्ती आहे, असा प्रश्नही विचारला आहे. वजन उचलण्याच्या विलक्षण कौशल्यामुळे आशा राणी यांच्या नावावर सात गिनीज वर्ल्ड रेकॉर्डची नोंद आहे. त्यांनी लंडन डबल डेकर बस इटलीमध्ये ओढली होती. तेव्हाच त्यांना ‘पोलादी राणी’ (आयर्न क्वीन) असे म्हटले गेले होते.