विदेशी विद्यार्थ्यांत भारतीय अव्वल

By Admin | Updated: April 4, 2016 23:57 IST2016-04-04T23:57:51+5:302016-04-04T23:57:51+5:30

अमेरिकेत १.३२ लाख भारतीय विद्यार्थी शिक्षण घेत असून विदेशी विद्यार्थ्यांची संख्या पाहता त्यांचा क्रमांक दुसरा लागतो, अशी माहिती अमेरिकेचे मुंबईतील

Indian toppers among foreign students | विदेशी विद्यार्थ्यांत भारतीय अव्वल

विदेशी विद्यार्थ्यांत भारतीय अव्वल

बडोदा : अमेरिकेत १.३२ लाख भारतीय विद्यार्थी शिक्षण घेत असून विदेशी विद्यार्थ्यांची संख्या पाहता त्यांचा क्रमांक दुसरा लागतो, अशी माहिती अमेरिकेचे मुंबईतील वाणिज्यदूत डस्टीन डॉकीविक्स यांनी येथे दिली आहे.
भारतीय विद्यार्थी अमेरिकेतील शिक्षणसंस्थांमध्ये प्रवेशाला पसंती देत असून त्यांची संख्या वाढतच आहे, असे ते रविवारी येथे एका कार्यक्रमात म्हणाले. विदेशी विद्यार्थ्यांच्या तुलनेत भारतीय विद्यार्थ्यांचे प्रमाण १३ टक्के आहे. भारतातील सुमारे ७८ टक्के विद्यार्थी विज्ञान, तंत्रज्ञान, गणित आणि अभियांत्रिकी या विषयांना पसंती दर्शवितात.

Web Title: Indian toppers among foreign students