भारतीय ‘राईस बकेट चॅलेंज’

By Admin | Updated: August 26, 2014 00:28 IST2014-08-26T00:28:43+5:302014-08-26T00:28:43+5:30

मंजूलथा कलानिधी या हैदराबादेतील पत्रकार महिलेने ही अभिनव कल्पना मांडली आहे़

Indian 'Rice Bucket Challenge' | भारतीय ‘राईस बकेट चॅलेंज’

भारतीय ‘राईस बकेट चॅलेंज’

हैदराबाद : मज्जासंस्थेच्या आजाराने ग्रस्त रुग्णाला आर्थिक मदत करण्यासाठी अमेरिकेतील कोरे ग्रिफीन याने सोशल मीडियाद्वारे मांडलेली ‘आइस बकेट चॅलेंज’ नावाच्या धाडसी कल्पनेच्या धर्तीवर येथील एका महिलेने गरिबांच्या मदतीसाठी ‘राईस बकेट चॅलेंज’ ही कल्पना मांडली आहे़
मंजूलथा कलानिधी या हैदराबादेतील पत्रकार महिलेने ही अभिनव कल्पना मांडली आहे़ आईस बकेट चॅलेंजमध्ये आईस बकेट डोक्यावर ओतावी लागते़ मंजूलथा हिच्या राईस बकेट चॅलेंजमध्ये मात्र केवळ एक बकेट तांदूळ गरजूंसाठी दान करायचे असतात़
‘इंडियन व्हर्जन आॅफ इंडियन नीड’ अशा शब्दांत तिने ही संकल्पना फेसबुक पेजवर मांडली आहे़ रविवारी एक बकेट तांदूळ दान करून ‘राईस बकेट चॅलेंज’चा शुभारंभ झाला़ ‘आईस बकेट चॅलेंज’ च्या धर्तीवर ‘राईस बकेट चॅलेंज’लाही अमाप प्रतिसाद मिळेल अशी आशा आहे.

Web Title: Indian 'Rice Bucket Challenge'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.