शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

रेल्वे प्रवाशांसाठी मोठी बातमी! तिकीट बुकिंग झालं सोपं, रेल्वेनं सुरू केली 'ही' नवीन सुविधा

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 26, 2021 12:22 IST

Indian Railways:कोरोना काळात भारतीय रेल्वेने प्रवाशांच्या सुरक्षेसाठी अनेक मोठे बदल केले.

नवी दिल्ली:  रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी कामाची बातमी आहे. भारतीय रेल्वेने प्रवाशांसाठी एक नवीन सेवा सुरू केली आहे. कोरोना काळात भारतीय रेल्वेने प्रवाशांच्या सुरक्षेसाठी अनेक मोठे बदल केले. यातच आता रेल्वेने तिकीट बुकिंगसाठी UTS अॅपची सुविधा हिंदीत सुरू केली आहे.

 

रेल्वे मंत्रालयाने दिली माहितीरेल्वे मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, यूटीएस मोबाईल अॅप वापरणारे आता रेल्वे हिंदी भाषेत तिकीट बुक करू शकतात. एएनआय या वृत्तसंस्थेने दिलेल्या रिपोर्टनुसार, भारतीय रेल्वेने विकसित केलेलं हे अॅप लोकांसाठी एक नवीन सुविधा घेऊन आलं आहे. पूर्वी हे अॅप फक्त इंग्रजी भाषेत उपलब्ध होतं. पण आता त्यात हिंदी भाषा जोडली गेली आहे. यामुळे प्रवाशांना आता त्यांच्या भाषेत तिकिटं बुक करता येणार आहेत.

UTS App ची गरज का आहे?

रेल्वे मंत्रालयानं सांगितलं की, सध्या या अॅपचे सुमारे 1.47 कोटी यूझर आहेत. हळूहळू ही संख्या आणखी वाढताना दिसू शकते. कोरोना साथीच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर प्रवाशांना तिकीट काऊंटरवरून तिकिटे मिळवण्यात खूप अडचणी येत होत्या. अशा परिस्थितीत, रेल्वेनं UTS अॅप लाँच केलं होतं. या अॅपद्वारे घरीबसुन तिकीट बुक करता येतं. 

UTS अॅपवर तिकीट बुक कस करायचं ? 1. यूटीएस मोबाईल अॅपद्वारे तिकीट बुक करण्यासाठी, सर्वात आधी अॅप इंस्टॉल करा.

2. यानंतर तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर रजिस्टर करावा लागेल.

3. त्यानंतर तुम्ही तुमचा आयडी इथे तयार करा.

4. या अॅपमध्ये तिकीट बुक करण्यासाठी दोन पर्याय दिसतील.

5. यावर बुक पेपरलेस आणि बुक प्रिंट यापैकी एक पर्याय निवडून तिकीट बुकिंग करता येईल.

6. तुम्ही पेपरलेसचा पर्याय निवडला, तर तुम्हाला स्टेशनवरील तिकीट वेंडिंग मशीनमधून तिकीट काढण्याची गरज नाही. 

टॅग्स :Indian Railwayभारतीय रेल्वे