Indian Railways Rule: विना तिकीट करता येणार ट्रेनने प्रवास, जाणून घ्या रेल्वेचा 'हा' खास नियम
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 23, 2022 20:06 IST2022-01-23T20:06:25+5:302022-01-23T20:06:38+5:30
Indian Railways Rule: तुमच्याकडे रिझर्वेशन नसतानाही तुम्ही आता ट्रेनने प्रवास करू शकता. यासाटी रेल्वे विभागानेच एक नियम बनवला आहे.

Indian Railways Rule: विना तिकीट करता येणार ट्रेनने प्रवास, जाणून घ्या रेल्वेचा 'हा' खास नियम
नवी दिल्ली: रेल्वेने प्रवास करणाऱ्यांसाठी एक महत्वाची बातमी आहे. जर तुम्हाला अचानक ट्रेनने कुठे जावं लागलं आणि तुमच्याकडे तिकीट नसेल, तर आता घाबरण्याची गरज नाही. तुम्ही आरक्षण नियमांशिवाय म्हणजे रिझर्वेशन नसतानाही ट्रेनने प्रवास करू शकता. यापूर्वी, यासाठी तात्काळ तिकीट बुकिंग नियमाचा पर्याय होता. त्यातही तिकीट मिळणे सोपे नव्हते. पण, आता रेल्वे तुम्हाला अशी सुविधा देत आहे, ज्याअंतर्गत तुम्ही आता आरक्षणाशिवाय प्रवास करू शकता.
प्लॅटफॉर्म तिकिटावर प्रवास
जर तुमच्याकडे आरक्षण(रिझर्वेशन) नसेल आणि तुम्हाला ट्रेनने कुठे जायचे असेल तर तुम्ही प्लॅटफॉर्म तिकीट घेऊनच ट्रेनमध्ये चढू शकता. ट्रेनमध्ये चढल्यानंतर टीटीकडे जाऊन तुम्ही अगदी सहज तिकिट मिळवू शकता. हा नियम रेल्वेनेच बनवला आहे. यासाठी तुम्हाला प्लॅटफॉर्म तिकीट घेऊन लगेच टीटीशी संपर्क साधावा लागेल. त्यानंतर टीटी तुम्हाला तिकीट देईल.
जागा रिकामी नसली तरी पर्याय आहे
ट्रेनमध्ये सीट रिकामी नसल्यास टीटी तुम्हाला रिझर्व्ह सीट देण्यास नकार देऊ शकतो. पण, प्रवास थांबवू शकत नाही. जर तुमच्याकडे आरक्षण नसेल, तर अशा परिस्थितीत प्रवासी 250 रुपये दंडासह प्रवासाचे एकूण भाडे भरुन तिकीट काढू शकतो. रेल्वेचे हे महत्त्वाचे नियम जे तुम्हाला माहित असणे आवश्यक आहे.
प्लॅटफॉर्म तिकीटने प्रवास
प्लॅटफॉर्म तिकीट प्रवाशांना ट्रेनमध्ये चढण्याचा अधिकार देते. त्यामुळे प्रवाशाने ज्या स्थानकातून प्लॅटफॉर्म तिकीट काढले आहे त्याच स्थानकावरुन भाडे भरावे लागणार आहे. सर्वात मोठी गोष्ट म्हणजे तुम्ही ज्या कोचमधून प्रवास करणार आहात त्याच कोचचे भाडे देखील तुम्हाला द्यावे लागेल.