ट्रेनचे वेटिंग तिकीट कॅन्सल झाल्यास पैसे कापले जाणार नाहीत? रेल्वे मंत्री म्हणाले ...

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 13, 2024 17:04 IST2024-12-13T17:03:26+5:302024-12-13T17:04:40+5:30

Indian Railways : रेल्वेने कॅन्सल केलेल्या वेटिंग तिकिटावरील हे चार्ज रद्द करण्याचा सरकारचा विचार आहे का, असा सवालही इकरा चौधरी यांनी केला.

indian railways removing cancellation charges irctc waiting ticket what railway minister ashwini vaishnaw said | ट्रेनचे वेटिंग तिकीट कॅन्सल झाल्यास पैसे कापले जाणार नाहीत? रेल्वे मंत्री म्हणाले ...

ट्रेनचे वेटिंग तिकीट कॅन्सल झाल्यास पैसे कापले जाणार नाहीत? रेल्वे मंत्री म्हणाले ...

Indian Railways removing Cancellation Charges IRCTC Waiting Ticket : नवी दिल्ली : समाजवादी पक्षाच्या खासदार इकरा चौधरी यांनी लोकसभेत वेटिंग तिकिटावरील कॅन्सलेशन चार्जचा मुद्दा उपस्थित केला. सीट्स उपलब्ध नसल्यामुळे तिकीट कॅन्सल झाले तरी रेल्वेकडून चार्ज का आकारला जातो, असा सवाल त्यांनी केला.

आयआरसीटीसीच्या वेबसाइटवर (IRCTC website) वेटलिस्टेड तिकीट कॅन्सल झाल्यानंतरही कॅन्सलेशन चार्ज घेतले जातात. मग, ते रेल्वेकडून सीट्स उपलब्ध नसल्यामुळे रद्द झाले असले तरी. याबाबत सरकारला माहिती आहे का? रेल्वेने कॅन्सल केलेल्या वेटिंग तिकिटावरील हे चार्ज रद्द करण्याचा सरकारचा विचार आहे का, असा सवालही इकरा चौधरी यांनी केला.

रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी लोकसभेत एका लेखी उत्तरात सांगितले की, मंत्रालय सर्व वेटलिस्टेड तिकिटांवर क्लर्केज चार्ज (लिपिक शुल्क) आकारते. त्यांनी पुढे स्पष्ट केले की, कॅन्सलेशनमधून मिळणारा महसूल इतर स्त्रोतांसह देखभाल आणि परिचालन खर्चासाठी वापरला जातो.  Railway Passengers (Cancellation of Tickets and Refund of Fare) Rules 2015  नुसार, आयआरसीटीसी वेबसाइटद्वारे कॅन्सल करण्यात आलेल्या सर्व वेटलिस्टेड तिकिटे रद्द केल्यावर क्लर्केज चार्ज आकारला जातो. 

वेटिंग तिकिटे जारी केली जातात जेणेकरून कोणतेही कन्फर्म किंवा आरएसी तिकीट कॅन्सल झाल्यास, अॅडव्हॉन्स रिझर्व्हेशन कालावधी दरम्यान खाली सीट्स भरता येतील. याशिवाय, वेटलिस्टेड तिकीट प्रवाशांजवळ अपग्रेडेशन स्कीम अंतर्गत अपग्रेड होण्याचा किंवा पर्याय योजनेंतर्गत पर्यायी ट्रेनमध्ये जाण्याचा पर्याय देखील आहे. तिकीट कॅन्सल केल्याने मिळणारा महसूल स्वतंत्रपणे ट्रॅक केला जात नाही, असेही रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितले.

Web Title: indian railways removing cancellation charges irctc waiting ticket what railway minister ashwini vaishnaw said

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.