Indian Railways: आता ट्रेनमध्ये आरामात झोपा, तुमचे स्टेशन सुटणार नाही; रेल्वेने सुरू केली नवीन सुविधा
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 6, 2022 17:56 IST2022-06-06T17:56:42+5:302022-06-06T17:56:42+5:30
Indian Railways: भारतीय रेल्वे आपल्या प्रवाशांच्या सोयीची विशेष काळजी घेते. गेल्या काही वर्षांत प्रवाशांच्या आरामदायी प्रवासासाठी रेल्वेने बरेच बदल केले आहेत.

Indian Railways: आता ट्रेनमध्ये आरामात झोपा, तुमचे स्टेशन सुटणार नाही; रेल्वेने सुरू केली नवीन सुविधा
Indian Railways: भारतीय रेल्वे आपल्या प्रवाशांच्या सोयीची विशेष काळजी घेते. आता रेल्वे फक्त प्रवासापुरती मर्यादित नाही, तर गेल्या काही वर्षांत प्रवाशांच्या आरामदायी प्रवासासाठी रेल्वेने बरेच बदल केले आहेत. ऑनलाईन तिकिटांपासून इतर अनेक सेवा प्रवाशांसाठी उपलब्ध आहेत. यातच आता प्रवाशांचा प्रवास अधिक सुखकर करण्यासाठी रेल्वेने आणखी एक नवीन सुविधा सुरू केली आहे.
रेल्वेकडून अलर्ट मिळणार
'डेस्टिनेशन अलर्ट' असे या नव्या सेवेचे नाव आहे. रात्री प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी ही सुविधा सुरू झाली आहे. या सेवेचा वापर करणाऱ्या प्रवाशांना गंतव्य स्थानकावर पोहोचण्याच्या 20 मिनिटे आधी रेल्वेकडून एसएमएस आणि रिमाइंडर कॉल मिळेल. सध्या ही सेवा फक्त लांब पल्ल्याच्या ट्रेनसाठी सुरू करण्यात आली आहे.
अशा प्रकारे या सेवेचा लाभ घ्या
तुम्हाला तुमच्या मोबाईलवरून 139 डायल करावा लागेल आणि नंतर गंतव्य अलर्ट सेट करावा लागेल. त्यानंतर तुमच्या सोयीनुसार भाषा निवडा. यानंतर तुम्हाला IVR मुख्य मेनूमध्ये 7 क्रमांकाचा पर्याय निवडावा लागेल. यानंतर, डेस्टिनेशन अलर्ट पर्यायासाठी क्रमांक 2 दाबा.
यानंतर तुमचा 10 अंकी पीएनआर क्रमांक टाका आणि 1 दाबून पुष्टी करा. वर नमूद केलेल्या सर्व पायऱ्या पूर्ण केल्यानंतर, तुमच्या प्रवासासाठी गंतव्य सूचना सुरू केली जाईल आणि तुम्हाला एसएमएस आणि कॉल मिळेल.