भारतीय रेल्वेने तत्काळ तिकीट बुकिंग प्रणाली अधिक पारदर्शक आणि सुरक्षित करण्याच्या दृष्टीने मोठे पाऊल उचलले आहे. ऑनलाइन तत्काळ तिकिटांच्या नियमांमध्ये बदल केल्यानंतर, आता आरक्षण खिडकीवरून तत्काळ तिकीट बुक करण्याच्या नियमांमध्येही महत्त्वाचा बदल करण्यात येणार आहे.
रेल्वेच्या नव्या नियमानुसार, आता आरक्षण खिडकीवरून तत्काळ तिकीट बुक करताना प्रवाशाच्या नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावर वन टाइम पासवर्ड म्हणजेच ओटीपी पाठवला जाईल. प्रवाशाने योग्य ओटीपी काउंटरवरील कर्मचाऱ्याला सांगितल्यानंतरच त्याचे तिकीट निश्चित केले जाईल. पुढील काही दिवसांत हा नवीन नियम लागू होण्याची शक्यता आहे. यामुळे तत्काळ तिकिटांचा गैरवापर थांबेल आणि खरोखर गरजू असलेल्या प्रवाशांना तिकीट मिळणे अधिक सोपे होईल, असे रेल्वे मंत्रालयाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.
रेल्वे मंत्रालयाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, रेल्वे ही नवीन प्रणाली आता इतर सर्व गाड्यांमध्येही लागू करत आहे. रेल्वे तिकिटांची प्रक्रिया अधिक पारदर्शक, सुरक्षित आणि सोयीस्कर बनवण्याच्या दिशेने हे एक महत्त्वाचे पाऊल आहे. यापूर्वी जुलै २०२५ मध्ये रेल्वेने प्रथम ऑनलाइन तत्काळ तिकिटांसाठी आधार-आधारित पडताळणी सुरू केली. त्यानंतर ऑक्टोबर महिन्यात ऑनलाइन जनरल तिकिटांसाठी पहिल्या दिवसाच्या बुकिंगसाठी ओटीपी प्रणाली लागू करण्यात आली. या दोन्ही प्रणाली प्रवाशांनी चांगल्या प्रकारे स्वीकारल्या असून, यामुळे बुकिंगमध्ये मोठ्या प्रमाणात पारदर्शकता वाढली आहे. आता आरक्षण काउंटरवरील तत्काळ तिकिटांसाठीही ओटीपी प्रणाली लागू झाल्याने रेल्वे बुकिंग अधिक सुरक्षित होईल.
Web Summary : Indian Railways to introduce OTP verification for Tatkal tickets booked at counters. This aims to curb misuse and ensure genuine passengers get tickets. The new rule, expected soon, follows successful OTP implementation for online tickets, enhancing transparency and security in railway bookings.
Web Summary : भारतीय रेलवे काउंटर पर तत्काल टिकट बुकिंग के लिए OTP सत्यापन शुरू करेगा। इसका उद्देश्य दुरुपयोग को रोकना और वास्तविक यात्रियों को टिकट सुनिश्चित करना है। यह नया नियम, जल्द ही आने वाला है, ऑनलाइन टिकटों के लिए सफल OTP कार्यान्वयन के बाद, रेलवे बुकिंग में पारदर्शिता और सुरक्षा बढ़ाता है।