शहरं
Join us  
Trending Stories
1
सुप्रीम कोर्टाचा निकाल विरोधात जाण्याची भीती?; शिंदेंच्या दिल्लीवारीबाबत असीम सरोदेंचा मोठा दावा
2
मतदार यादीतून वगळलेले ६५ लाख कोण? तीन दिवसांत सादर करा; सर्वोच्च न्यायालयाचा निवडणूक आयोगाला आदेश
3
१ पद, २ विभाग अन् २ आदेश; CM देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्या खात्यांमध्ये नियुक्तीवरून संघर्ष?
4
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये उद्ध्वस्त झालेले मुख्यालय पुन्हा बांधण्यासाठी जैशचा प्रमुख पुन्हा सक्रिय; मसूद अझहरने अनेकांकडे देणग्या मागितल्या
5
नवजात लेकीला कचऱ्याच्या ढिगाऱ्यात फेकलं पण 'त्याने' जीवदान दिलं, शरीराला लागलेले किडे
6
RBI च्या निर्णयानंतर गुंतवणूकदारांना झटका! विप्रोसह 'या' क्षेत्रात मोठी घसरण, कुठे झाली वाढ?
7
“जनभावनेचा आदर करणारे हे सरकार, आम्ही...”; ‘महादेवी’ परतण्याबाबत एकनाथ शिंदेचे मोठे विधान
8
लग्नाचं निमंत्रण दिलं नाही, सहकाऱ्यांनी एचआरकडे केली तरुणीची तक्रार, त्यानंतर घडलं असं काही...
9
"कित्येकांनी बलिदान दिले, शिरांचे ढीग लागले, पण धर्म सोडला नाही"- मोहन भागवत
10
एकनाथ शिंदेंची दिल्लीवारी; अमित शाहांशी बैठकीत काय चर्चा झाली? खुद्द उपमुख्यमंत्री म्हणाले...
11
"डोकं फिरवू नका, मी मंत्री, तुम्ही मलाच न सांगता...", PWD अधिकाऱ्यावर संतापले दयाशंकर सिंह
12
जगाला आपल्या धाकात ठेऊ पाहणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांची संपत्ती किती? उत्पन्नाचा खरा स्रोत कोणता?
13
एकावर एक बोनस शेअर देणार 'ही' कंपनी; सोबत डिविडंडही मिळणार; गुंतवणुकदारांना दुप्पट फायदा
14
आधार ओटीपी वापरून ITRचं ई-व्हेरिफिकेशन करा, अन्यथा रिटर्न अवैध ठरेल; पाहा संपूर्ण प्रोसेस
15
८८२ कोटींचा खर्च, २०२८ मध्ये होणार पूर्ण; ८ ऑगस्टला सीतामातेच्या जानकी मंदिराचे भूमिपूजन
16
'कायद्याच्या कचाट्यात महादेवी हत्तीला अडकवू नका, ... तोपर्यंत लढा सुरूच राहणार'; राजू शेट्टींनी स्पष्टच सांगितलं
17
वॉशिंग मशिन वापरताना ‘ही’ किरकोळ चूक जीवावर बेतली; तरुणाचा मृत्यू; करायला गेला एक आणि..
18
बुकिंग करणाऱ्या ग्राहकांवरच शाओमी उलटली; आता म्हणतेय आठवड्यात पूर्ण पैसे द्या नाहीतर...
19
Wasim Jaffer: वसीम जाफरवर मोठी जबाबदारी, आता विदर्भातील खेळाडूंना शिकवतील फलंदाजीचे धडे!
20
ICC Test Ranking : मियाँ 'मॅजिक'नंतर 'मार मुसंडी' शो! सिराजला ICC कडून मिळालं मोठं गिफ्ट

Agneepath Agneeveer Protest : 'अग्निपथ'वरून जाळपोळ: रेल्वेचं तब्बल २०० कोटी रुपयांचं नुकसान; ५० डबे, ५ इंजिनं जळून खाक

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 18, 2022 19:47 IST

Agneepath Agneeveer Protest : मोदी सरकारच्या अग्निपथ योजनेला देशभरात विरोध सुरूच आहे. हे आंदोलन बिहारमधून सुरू करण्यात आले होते, त्यामुळे सर्वाधिक नुकसान त्याच ठिकाणी झाले आहे.

मोदी सरकारच्या अग्निपथ योजनेला देशभरात विरोध सुरूच आहे. हे आंदोलन बिहारमधून सुरू करण्यात आले होते, त्यामुळे सर्वाधिक नुकसान त्याच ठिकाणी झाले आहे. प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन बिहार सरकारने १५ जिल्ह्यांतील इंटरनेट सेवा बंद केली होती, मात्र परिस्थिती अजूनही तशीच आहे. या आंदोलनात रेल्वेच्या मालमत्तेचे सर्वाधिक नुकसान झाल्याची माहिती रेल्वेकडून देण्यात आली आहे.

“रेल्वे परिसरात झालेल्या तोडफोडीच्या घटनांमध्ये २०० कोटींहून अधिक रुपयांचे नुकसान झाले आहे. आंदोलकांनी रेल्वेचे ५० डबे आणि ५ इंजिने जाळली, ज्यांचं आता पूर्णपणे नुकसान झालं आहे. याशिवाय आंदोलकांनी प्लॅटफॉर्म, कम्प्युटर्स आणि इतर अनेक उपकरणांचे नुकसान केले आगे. या आंदोलनामुळे अनेक गाड्याही रद्द करण्यात आल्या आहेत,” अशी माहिती दानापूर रेल्वे विभागाचे डीआरएम प्रभात कुमार म्हणाले यांनी दिली.

बिहारच्या ट्रेन सेवा रद्दबिहारमधील रेल्वे सेवा शनिवारी रात्री ८ वाजेपर्यंत तसंच रविवारीही पहाटे ४ ते रात्री ८ या वेळेत बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. दुसरीकडे, संपूर्ण देशाबद्दल बोलायचे झाले, तर या आंदोलनामुळे आतापर्यंत ३५० गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. रेल्वे अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, सर्व स्थानकांवर सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे. तसेच तेथे उपस्थित असलेल्या सीसीटीव्हीच्या मदतीने नुकसान करणाऱ्यांचा शोध घेण्यात येत आहे.भाजप, जदयू आमनेसामनेआतापर्यंत बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी अग्निपथ योजनेला स्पष्टपणे विरोध केलेला नाही. परंतु त्यांच्या पक्षातील अनेक नेते केंद्र सरकारकडे योजनेचा पुनर्विचार करण्याची मागणी करत आहेत. शुक्रवारी आंदोलकांनी भाजप प्रदेशाध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री रेणू देवी यांच्या घराची तोडफोड केली. त्यामुळे भाजप आणि जदयूमध्ये संघर्ष सुरू आहे.

टॅग्स :Agneepath Schemeअग्निपथ योजनाIndian Railwayभारतीय रेल्वे