श्रीनगर - जम्मू काश्मीरमध्ये वंदे भारत ट्रेन धावण्याचं स्वप्न अखेर पूर्ण होत आहे. शनिवारी २५ जानेवारीला भारतीय रेल्वेने ही यशस्वी चाचणी घेतली आहे. सकाळी ८ वाजता कटरा स्टेशनहून वंदे भारत ट्रेन रवाना झाली ती अवघ्या ३ तासांत श्रीनगरला पोहचली. यावेळी रेल्वे स्टेशन परिसर भारत माता की जय या घोषणेनं दुमदुमला. १६० किमी प्रति वेगाने आरामदायक आणि वेगवान प्रवास पूर्ण केला. जम्मू काश्मीरमधील थंड वातावरण पाहता विशेष काळजी घेण्यात आली होती.
मायनस १० डिग्री तापमानात धावली ट्रेन
ही ट्रेन काश्मीरच्या थंडगार वातावरण प्रवास करण्यास सक्षम आहे. यातील कोच आणि बाथरूम इथं हिटर लावण्यात आले आहेत. ट्रेनच्या ड्रायव्हर केबिनमध्ये ट्रिपल एअर विंडशील्ड लावण्यात आली आहे. ज्यात मायनस तापमानातही विजिबिलिटी चांगली राहील. हिटिंग सिस्टमने पाण्याची टाकी आणि बायो टॉयलेट बसवले गेलेत. त्याशिवाय ट्रेनच्या इंजिनमध्ये बर्फ जमा होण्याची शक्यता नाही. हायटेक ट्रेन काश्मीरच्या बर्फाळ प्रदेशातून सहजपणे प्रवास करू शकेल.
प्रवाशांसाठी उत्तम सुविधा
वंदे भारत ट्रेनमध्ये प्रवाशांसाठी अत्याधुनिक उत्तम सुविधा देण्यात आल्या आहेत. त्यात बायो वॅक्यूम टॉयलेट, सेंसर वॉटर टॅप, फोल्डेबल स्नॅक टेबल यांचा समावेश आहे. ट्रेनमध्ये ३६० डिग्री फिरणाऱ्या खुर्च्या, चार्जिंग पाँईट दिलेत. स्वयंचलित दरवाजे, अपग्रेडेड लगेज रॅक प्रवाशांना आरामदायी प्रवासाचा अनुभव देतील. तसेच झिरो डिस्चार्ज टॉयलेट पर्यावरणाला सुरक्षित ठेवण्यात मदत करतील. ही ट्रेन फक्त वेगवान नाही तर त्यात विमान प्रवासासारख्या सुविधा देण्यात आल्या आहेत.
काश्मीर रेल्वे नेटवर्कचं स्वप्न पूर्ण
वंदे भारत ट्रेन जम्मू श्रीनगर रेल्वे लिंक प्रकल्पाचा महत्त्वाचा भाग आहे. हा प्रकल्प जम्मू काश्मीरातील लोकांसाठी नवं पर्व सुरू करणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते फेब्रुवारी महिन्यात त्याचे उद्घाटन होईल. हा प्रकल्प पूर्ण झाल्यानं जम्मू काश्मीरचे लोक देशातील अन्य भागात सहजपणे पोहचवू शकतो. या रेल्वे नेटवर्कमुळे काश्मीरच्या विकासाला नवी गती मिळणार आहे.