Indian Railways Passengers : रेल्वेचा मोठा निर्णय; आता तिकीट बुक करताना प्रवाशांना मिळणार मोठा दिलासा
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 13, 2022 22:50 IST2022-04-13T22:50:44+5:302022-04-13T22:50:44+5:30
Indian Railways Passengers : कोरोनाच्या कालावधीदरम्यान रेल्वेनं हा निर्णय घेतला होता. परंतु आता रेल्वेनं प्रवाशांना दिलासा देण्याचा निर्णय घेतलाय.

Indian Railways Passengers : रेल्वेचा मोठा निर्णय; आता तिकीट बुक करताना प्रवाशांना मिळणार मोठा दिलासा
Indian Railways Passengers : तिकीट बुकिंगबाबत भारतीय रेल्वेने (Indian Railways) बुधवारी मोठा निर्णय घेतला आहे. आता प्रवाशांना रेल्वे तिकीट बुक करताना आपला डेस्टिनेशन अॅड्रेस टाकावा लागणार नाही. कोरोना विषाणूच्या महासाथीमुळे (Coronavirus Pandemic) IRCTC वेबसाइट आणि अॅपवर रेल्वे तिकीट बुक करताना डेस्टिनेशन अॅड्रेस टाकणं अनिवार्य करण्यात आलं होतं.
आता IRCTC प्रवाशांना त्यांचा डेस्टिनेशन अॅड्रेस विचारणार नाही. रेल्वे मंत्रालयाने हा आदेश जारी केला आहे. मंत्रालयाने तिकीट आरक्षणादरम्यान डेस्टिनेशन अॅड्रेस विचारण्याची तरतूद रद्द केली आहे. याच्या माध्यमातून कोरोनाच्या महासाथीदरम्यान रुग्णांच्या शोध घेण्यास मदत होत होती.
कोरोनाची महासाथ सुरू झाल्यानंतर अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले होते. रेल्वेनं अनेक ट्रेन्स काही दिवसांपर्यंत बंद ठेवल्या होत्या. यानंतर जेव्हा ट्रेन्स सुरू करण्यात आल्या तेव्हा अनेक नियम लागू करण्यात आले होते. परंतु आता कोरोनाचे नियम शिथिल केल्यानंतर पुन्हा एकदा रेल्वेमध्ये सुविधा देण्यास सुरुवात झाली आहे.