शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रत्येक भारतीयाच्या डोक्यावर १.३२ लाखांचे कर्ज; ...तर कराचा बोजा अधिक वाढेल
2
२७ टक्के ओबीसी आरक्षणासह नव्या प्रभाग रचनेनुसार निवडणुका; पालिका निवडणुकांबाबतच्या दोन याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या
3
PPF नाही, पैसे छापण्याची मशीन! दरवर्षी मिळेल ₹२,८८,८४२ चं जबरदस्त व्याज, पाहा सिक्रेट ट्रिक
4
महिलेचा दोन महिन्यांपूर्वी मृत्यू, मुलगा वापरत होता आईचं युपीआय अन् अचानक खात्यात आले अरबो रुपये!
5
आजचे राशीभविष्य, ०५ ऑगस्ट २०२५: अनपेक्षित यश, अडकलेले पैसे मिळतील; चौफेर लाभ
6
गजलक्ष्मी समसप्तक योगात रक्षाबंधन: १० राशींना लॉटरी, सुख-सुबत्ता; भरभराट-भाग्योदय, वरदान काळ!
7
नोकरीत बिहारींचा पहिला हक्क; नवे ‘डोमिसाइल’ धोरण जाहीर
8
आरोप करणाऱ्या देशांनी आधी स्वतःकडे बघावे! ट्रम्पच्या टॅरिफ धमकीला सरकारचे थेट उत्तर
9
टॉयलेटमध्येही फोन वापरता? मग त्याला किती वेळा स्वच्छ ठेवता? धोका आधीच जाणून घ्या!
10
गरिबांसाठी भिडणाऱ्या, लढणाऱ्या नेत्याची एक्झिट, आदिवासींच्या हक्कांसाठी शिबू सोरेन यांनी दिला लढा
11
भारत अमेरिकेला फसवतोय, युक्रेन युद्धाला मदत करतोय
12
आम्ही दोघे भाऊ २० वर्षांनी एकत्र आलो, तुम्ही का भांडता? राज ठाकरेंनी पहिल्यांदा केले एकत्र येण्यावर भाष्य
13
‘चीन’वरून जुंपली : ‘गलवान’नंतर चीनबाबत सरकारने दिशाभूल केली, काँग्रेसचा हल्लाबोल
14
सच्चे भारतीय असाल, तर असे बोलणार नाहीत; राहुल गांधींना सुप्रीम कोर्टाने सुनावले; दिलासाही दिला
15
टीम इंडियाने दिला नवा मंत्र : BELIEVE...; भारताने ६ धावांनी मिळवलेल्या थरारक विजयाची कारणे, ६ प्रश्नांच्या उत्तरांमध्ये
16
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले
17
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
18
DSP सिराजचा ऑन ड्युटी फॉर्म्युला! सर्वाधिक विकेट्स अन् १००० पेक्षा अधिक चेंडू टाकण्याचा मोठा पराक्रम
19
धक्कादायक! नागपुरात भर रस्त्यावर महिला पोलिसाला मारहाण करत विनयभंग

'बुलेट ट्रेन' प्रकल्पात असं असणार सूरत येथील स्टेशन, रेल्वे मंत्रालयानं शेअर केले फोटो

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2022 18:39 IST

देशात सध्या सर्वसाधारण रुळांवर धावणारी भारतीय रेल्वेला लवकरच बुलेट ट्रेनचा वेग प्राप्त होणार आहे. मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाच्या (Mumbai-Ahmedabad Bullet Train Project) कामानं वेग धरला आहे.

नवी दिल्ली-

देशात सध्या सर्वसाधारण रुळांवर धावणारी भारतीय रेल्वेला लवकरच बुलेट ट्रेनचा वेग प्राप्त होणार आहे. मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाच्या (Mumbai-Ahmedabad Bullet Train Project) कामानं वेग धरला आहे.  यातच रेल्वे मंत्रालयाकडून आता गुजरातच्या सूरत येथे प्रस्ताविक असलेल्या बुलेट ट्रेन प्रकल्पातील स्थानकाचे काही ग्राफिक फोटो शेअर करण्यात आले आहेत. "डायमंड सिटी म्हणून ओळख असलेल्या सूरतमध्ये काम सुरू असलेल्या बुलेट ट्रेन प्रकल्पातील स्टेशनचे हे ग्राफिकल चित्रण आहे. डायमंडच्या डिझाइनमध्ये या स्टेशनची बहुमजली इमारत निर्माण केली जाणार आहे. यात सेंट्रलाइज्ड एसी, स्वयंचलित जिना, बिझनेस लाऊंजसारख्या जागतिक दर्जाच्या सुविधा उपलब्ध करुन दिल्या जाणार आहेत. यातून नव्या भारताचं दर्शन जगाला होईल", असं ट्विट रेल्वे मंत्रालयाकडून करण्यात आलं आहे. 

रेल्वे मंत्रालयाकडून ट्विट करण्यात आलेल्या तीन फोटोंमध्ये एक फोटो सध्या सुरू असलेल्या निर्माण कार्याचा देखील आहे. तर उर्वरित दोन फोटो काम पूर्ण झाल्यानंतर सूरत स्टेशन कसं असेल याची ग्राफिकल मांडणी करण्यात आली आहे. सूरत बुलेट ट्रेन स्टेशनची इमारत बाह्यबाजूनं एखाद्या डायमंडसारखी भासेल असं डिझाइन केलं जाणार आहे. 

२०२४ पर्यंत पूर्ण होणार सूरत स्टेशनचं कामरेल्वे मंत्रालयाकडून ट्विट करण्यात आलेले फोटो पाहता बुलेट ट्रेनच्या मार्गातील स्थानकं एखाद्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या विमानतळासारखी सुसज्ज असणार आहेत इतकं नक्की. माध्यमांमधील बातम्यांनुसार मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन मार्गावरील सूरत स्थानकाचं काम २०२४ सालापर्यंत पूर्ण होण्याची शक्यता आहे. मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्प देशातील पहिला बुलेट ट्रेन प्रकल्प आहे. हा प्रकल्प पूर्ण करण्याची जबाबदारी राष्ट्रीय हायस्पीड रेल्वे कॉर्पोरेशनकडे देण्यात आली आहे. 

५०८ किमी लांबीच्या मार्गावर असणार एकूण १२ स्थानकंमुंबई-अहमदाबाद या एकूण ५०७ किमी लांबीच्या बुलेट ट्रेन मार्गावर एकूण १२ स्थानकं असणार आहेत. यात साबरमती, अहमदाबाद, आणंद, वडोदरा, भरूच, बिलिमोरा, वापी, बोईसर, विरार, ठाणे आणि मुंबई अशी स्थानकं असणार आहेत. या मार्गावर बुलेट ट्रेन तब्बल ३२० किमी प्रतितास वेगानं चालवण्याचा सरकारचा मानस आहे. समोर आलेल्या माहितीनुसार सूरत सोबतच वापी, बिलिमोरा आणि भरूच स्थानकांचंही काम वेगानं सुरू आहे. ही स्थानकं देखील डिसेंबर २०२४ पर्यंत पू्र्ण होतील असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. 

टॅग्स :Bullet Trainबुलेट ट्रेनSuratसूरतIndian Railwayभारतीय रेल्वे