रेल्वेची नवी सुविधा; धावत्या ट्रेनमधलं सामान चोरल्यास तात्काळ करता येणार FIR
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 9, 2019 20:02 IST2019-10-09T19:57:05+5:302019-10-09T20:02:21+5:30
भारत सरकारनं कोट्यवधी रेल्वे प्रवाशांना मोठं गिफ्ट दिलं आहे.

रेल्वेची नवी सुविधा; धावत्या ट्रेनमधलं सामान चोरल्यास तात्काळ करता येणार FIR
नवी दिल्लीः भारत सरकारनं कोट्यवधी रेल्वे प्रवाशांना मोठं गिफ्ट दिलं आहे. या रेल्वेतून प्रवासादरम्यान आपलं सामान चोरी झाल्यास तुम्हाला लागलीच एफआयआर दाखल करता येणार आहे. 10 ऑक्टोबरपासून प्रवाशांना या सुविधेचा फायदा उचलता येणार आहे. जीआरपीनं यासाठी एक खास ऍप तयार केलं आहे. धावत्या ट्रेनमध्ये प्रवाशांबरोबर नेहमीच सोनसाखळी चोरी आणि सामान चोरीच्या घटना घडतात. विशेष म्हणजे जेव्हा ट्रेन हळूहळू स्टेशन सोडते तेव्हाच हे प्रकार केले जातात. अशातच पीडित जोपर्यंत चेन खेचतो तोपर्यंत चोर लांब निघून गेलेला असतो. त्यामुळे आता स्टेशनवर उतरून रिपोर्ट दाखल करण्याऐवजी लागलीच रेल्वेमध्येच एफआयआर दाखल करता येणार आहे.
दिल्ली जीआरपीला समजलं प्रवाशांचं दुःख
सरकारी रेल्वे पोलिसां(जीआरपी)नी प्रवासी आणि त्यांचं सामान सुरक्षित ठेवण्यासाठी हा निर्णय घेतला आहे. तेच पाहता जीआरपी सहप्रवाशांच्या नावे एक ऍप लाँच करणार असून, ते 10 ऑक्टोबरपासून वापरता येणार आहे. या ऍपच्या माध्यमातून धावत्या रेल्वेमध्ये एखादा चोरीचा प्रसंग घडल्यास ट्रेन न थांबवता मोबाइल ऍपच्य माध्यमातून एफआयआर दाखल करता येणार आहे. तसेच जीआरपीनं केलेल्या सहकार्याचा अनुभवही प्रवासी या ऍपवर नोंदवू शकतात.
एफआयआर दाखल करण्यासाठी दोन तास थांबवली ट्रेन
शान-ए-पंजाब एक्स्प्रेस ही एफआयआर दाखल करण्यासाठी दोन तास थांबवण्यात आली होती. ट्रेन नवी दिल्लीतल्या रेल्वे स्टेशनवरून निघाली, तसेच प्रवाशानं चेन खेचली. त्यामुळे इतर प्रवासी नाराज झाले असून, प्रवाशांची झालेल्या चोरीचं एफआयआर दाखल केल्यानंतर ट्रेन पुढे सोडण्यात आली. या सर्व प्रकारात ट्रेन दोन तास खोळंबली होती, एफआयआर दाखल केल्यानंतर ती रवाना झाली.