शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी एकाकी, कुणी ऐकत नाही, LPG मुद्द्यावर पक्षातच उभी फूट; नेते करतायत मोदींचे कौतुक
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
5
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात लागला बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
6
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
7
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
8
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
9
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
10
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
11
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
12
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
13
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
14
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
15
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
16
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
17
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
18
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
19
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
20
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
Daily Top 2Weekly Top 5

पाकिस्तानी तुरुंगातील भारतीय नागरिकाची उद्या होणार सुटका

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 17, 2018 15:52 IST

मध्यवर्ती तुरुंगात असलेल्या हमीद अन्सारी यांची उद्या मुक्तता होणार

नवी दिल्ली: पाकिस्तानच्या मध्यवर्ती तुरुंगात असलेल्या भारतीय नागरिकाची उद्या सुटका होणार आहे. हमीद अन्सारी असं या व्यक्तीचं नाव आहे. कोणत्याही कागदपत्रांशिवाय पाकिस्तानात घुसखोरी करुन हेरगिरी केल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला होता. त्यानंतर त्यांच्यावर खटलादेखील चालवण्यात आला. मात्र काही दिवसांपूर्वीच पेशावर उच्च न्यायालयानं त्यांच्या सुटकेचे आदेश दिले. हमीद यांची महिन्याभरात तुरुंगातून मुक्तता करा, असं न्यायालयानं आदेशात म्हटलं. या पार्श्वभूमीवर उद्या हमीद यांची सुटका होणार असल्याचं वृत्त एएनआय या वृत्तसंस्थेनं दिलं आहे. हमीद अन्सारी सध्या पेशावरमधील मध्यवर्ती तुरुंगात आहेत. मूळचे मुंबईचे रहिवासी असलेल्या हमीद अन्सारी यांना नोव्हेंबर 2012 मध्ये पाकिस्तानी अधिकाऱ्यांनी ताब्यात घेतलं. अवैध कागदपत्रांच्या आधारे पाकिस्तानात घुसखोरी केल्याच्या आरोपाखाली त्यांना अटक करण्यात आली. यानंतर त्यांना तीन वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली. मात्र शिक्षा पूर्ण केल्यानंतरही पाकिस्तान सरकारनं अन्सारी यांची सुटका केली नाही. त्यामुळे त्यांच्या वकिलांनी पेशावर उच्च न्यायालयाच धाव घेतली. न्यायालयानं अन्सारी यांच्या बाजूनं निकाल दिल्यानं आता त्यांची घरवापसी होणार आहे. 2012 मध्ये अन्सारी यांची सोशल मीडियाच्या माध्यमातून एका मुलीशी मैत्री झाली होती. तिला भेटण्यासाठी ते अवैधपणे पाकिस्तानला गेले. अफगाणिस्तान मार्गे ते पाकिस्तानमध्ये पोहोचले होते. त्यानंतर कोहट जिल्ह्यात त्यांना पाकिस्तानच्या गुप्तहेर खात्यातील अधिकाऱ्यांनी ताब्यात घेतलं. हमीद अन्सारी यांनी 'हमजा' नावानं खोटी कागदपत्रं तयार करुन पाकिस्तानात घुसखोरी केल्याचा दावा अधिकाऱ्यांनी केला. पाकिस्तानी विरोधी कारवाया केल्याचा, हेरगिरी केल्याचा आरोपदेखील त्यांच्यावर ठेवण्यात आला. मात्र अन्सारी यांनी हे आरोप न्यायालयात फेटाळून लावले होते.  

टॅग्स :IndiaभारतPakistanपाकिस्तानjailतुरुंग