शहरं
Join us  
Trending Stories
1
सतर्क राहा: कोकण, पश्चिम महाराष्ट्रात १८-१९ ऑगस्टला मुसळधार पाऊस; कुठे-कुठे 'रेड अलर्ट'?
2
अहिल्यानगरमध्ये फर्निचरच्या दुकानात अग्नितांडव; अख्खं कुटुंब संपलं, दोन चिमुकल्यांसह पाच जणांचा मृत्यू
3
Apple नं ट्रम्प आणि चीनला दाखवला ठेंगा; भारतात आणखी एका प्रकल्पातून सुरू केलं iPhone चं उत्पादन
4
जन्माष्टमीच्या मिरवणुकीतील रथ विजेच्या तारांना चिकटला, शॉक लागून ५ जणांचा मृत्यू, केंद्रीय मंत्र्यांचा सुरक्षा रक्षकही जखमी 
5
दरमहा १२,५०० रुपये गुंतवा आणि ४० लाख रुपये मिळवा! पोस्ट ऑफिसची ही योजना देते करमुक्त परतावा
6
शेतकऱ्यांवर चिनी संकट! महत्त्वाच्या खनिजांवरील निर्यात कमी, रोखला खतांचाही पुरवठा
7
Stock Market Today: शेअर बाजारात तुफान तेजी, ७१८ अंकांच्या तेजीसह बाजार उघडला; Midcap आणि बँकिंग शेअर्समध्ये खरेदी
8
'महाभारत'ची कुंती 'बिग बॉस'मध्ये येणार! 'हत्यारे की बहन' म्हणून बोलवायचे लोक, कोण आहे ती?
9
दुचाकीला धडक देऊन ट्रक ड्रायव्हर पळाला, पण AIने केली कमाल, पोलिसांनी ३६ तासांत पकडला
10
मुंबईची वर्षभराची तहान भागणार, मुसळधार पावसाने सातही जलाशये जवळपास फुल्ल
11
बेस्ट पतपेढीच्या निवडणुकीआधी मतदारांच्या घरी पोहोचले पैसे; महायुतीच्या पॅनलवर मनसेचा गंभीर आरोप
12
'जय मल्हार'मध्ये खंडोबाची भूमिका साकारली, आता जेजुरीच्या पायथ्याशी देवदत्त नागे बांधतोय घर
13
४२ वर्षांच्या लढ्यानंतर कोल्हापूर सर्किट बेंच झाले आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या: सरन्यायाधीश
14
'या' सरकारी बँकेत जमा करा ₹१,००,००० आणि मिळेल ₹१४,६६३ चं फिक्स्ड व्याज; पाहा कोणती आहे स्कीम
15
बेस्ट पतपेढी कोणाच्या ताब्यात? आज मतदान, उद्या फैसला! ठाकरे बंधूंच्या युतीची पहिली कसोटी
16
RTIच्या सराईतांचा खेळ आता खल्लास! १० हजार अपील फेटाळले; राज्य माहिती आयोगाचा चाप
17
लंडनमध्ये आज ‘लोकमत ग्लोबल इकॉनॉमिक कन्व्हेन्शन’! भारतीय अर्थव्यवस्थेच्या लक्ष्यावर मंथन
18
पुन्हा निळ्या ड्रमाची दहशत, ड्रममध्ये सापडला तरुणाचा मृतदेह, पत्नी आणि तीन मुले बेपत्ता  
19
PF मधून १, २ की ३, किती वेळा काढू शकता पैसे? सतत काढण्यापूर्वी पाहा हा महत्त्वाचा नियम
20
‘कबुतर आ आ...’ कधी करावे? दाणे टाकण्यासंदर्भात पालिकेने मागवल्या सूचना; ई-मेल आयडीही दिला

भारतीय आहे, भारतातच मरेन !

By admin | Updated: January 14, 2016 01:47 IST

मी ज्यू आहे, पण सर्वार्थाने भारतीय आहे आणि भारतातच मला मृत्यू येईल,’ असे ठणकावून सांगणाऱ्या आणि १९७१ च्या भारत-पाकिस्तान युद्धात महत्त्वाची कामगिरी बजावणाऱ्या

नवी दिल्ली : ‘मी ज्यू आहे, पण सर्वार्थाने भारतीय आहे आणि भारतातच मला मृत्यू येईल,’ असे ठणकावून सांगणाऱ्या आणि १९७१ च्या भारत-पाकिस्तान युद्धात महत्त्वाची कामगिरी बजावणाऱ्या ले. जे.(नि़) जेएफआर जेकब यांनी आज वयाच्या ९३व्या वर्षी नवी दिल्ली येथे अखेरचा श्वास घेतला. दुसरे महायुद्ध, १९६५ आणि १९७१च्या युद्धात जेकब यांनी आपले युद्धकौशल्य सर्व जगाला दाखवून दिले होेते.३६ वर्षांच्या लष्करी कारकिर्दीमुळे, अतुलनीय पराक्रमी व्यक्तिमत्त्वामुळे त्यांची ओळख होतीच; त्याहून निवृत्तीनंतर त्यांनी गोवा आणि पंजाब या राज्यांचे राज्यपालपद भूषविल्यामुळे ते विशेष प्रसिद्ध होते. जेकब यांचे पूर्ण नाव जेकब फर्ज राफेल जेकब असे होते. त्यांचा जन्म १९२३ साली कोलकात्यातील एका बगदादी ज्यू कुटुंबात झाला. त्यांचे शालेय शिक्षण दार्जिलिंग येथील शाळेत झाले. लहानपणापासूनच त्यांच्यावर सिगफ्राइड ससून, विल्फेड ओवेन, ज्युलियन ग्रेनफेल अशा कवींचा प्रभाव होता. दुसऱ्या महायुद्धाच्या काळात हिटलर आणि नाझी फौजांनी ज्यूंवर केलेल्या अत्याचाराच्या व होलोकास्टच्या भयानक कथा त्यांच्या कानावर पडत होत्या. त्यामुळे बालपणातच नाझींविरोधात लढण्याचा जेकब यांनी निश्चय केला होता. ‘जोय बांगला’ 1971 साली बांगलादेशला स्वातंत्र्य मिळवून देण्यात सिंहाचा वाटा उचलणाऱ्या जेएफआर जेकब यांचा २०१२ साली बांगलादेशने कृतज्ञतापूर्वक सन्मान केला. बांगलादेशचे पंतप्रधान शेख हसिना वाजेद यांच्या हस्ते पुरस्कार स्वीकारल्यावर त्यांनी बांगला नागरिकांकडे पाहून हात उंचावून 'जोय बांगला' अशी घोषणा दिली. आणि खचाखच भरलेल्या वंगबंधू इंटरनॅशनल कॉन्फरन्स सेंटरमधील नागरिकांनी क्षणार्धात उच्चरवात 'जोय बांगला' अशीच घोषणा करून त्यांना प्रतिसाद दिला.लष्करी कारकीर्द ! १९४२ साली जेकब यांनी महू येथील आफीसर्स ट्रेनिंग स्कूलमधून लष्करी शिक्षण पूर्ण केले. तसेच अमेरिका व इंग्लंड येथेही त्यांनी लष्करी शिक्षण घेतले होते. त्यानंतर त्यांनी इराक तसेच ब्रह्मदेश, सुमात्रा येथे लष्करी मोहिमांमध्ये सहभाग घेतला. १९६३ साली ते ब्रिगेडीयर झाले, तर १९६७ साली त्यांना मेजर जनरलपदी पदोन्नती मिळाली. १९६५ च्या युद्धात त्यांनी राजस्थान येथे उत्तम कामगिरी बजावली होती. १९६९ साली त्यांची जनरल सॅम माणेकशा यांनी ईस्टर्न कमांडच्या चिफ आॅफ आर्मी स्टाफपदी नियुक्ती केली. मणिपूर, नागालँडमधील बंडखोरांशी लढण्यामध्येही त्यांचा सहभाग होता. भारत सरकारने त्यांचा परमविशिष्ट सेवा पदकाने गौरव केला होता.बांगलादेश युद्ध...जेकब यांच्या कारकीर्दीचा उच्चबिंदू म्हणजे बांगलादेश युद्धातील त्यांची कामगिरी. या युद्धामुळेच जेकब यांना विशेष ओळख मिळाली. युद्धकौशल्याच्या जोरावर केवळ तीन हजार भारतीय सैनिकांच्या मदतीने त्यांनी ढाक्याला स्वतंत्र केले. पाकिस्तानचे त्याच शहरात २६, ४०० सैनिक उपस्थित असूनही हा विजय त्यांनी मिळविल्यामुळे सर्व जगाने आश्चर्य व्यक्त केले होते. त्यानंतर पाकिस्तानचे ए.ए.के. नियाझी यांनी शरणागती पत्करली आणि पाकिस्तानचे ९०,००० सैनिकही शरण आले. (जेकब यांनी आपल्याला ब्लॅकमेल केले, असा आरोपही नियाझी यांनी नंतर केला.)भारत आणि इस्रायल यांच्यामधील संबंध अधिक दृढ व्हावेत यासाठी जेकब प्रयत्नशील होते. त्यांचे बांगलादेश युद्धावरील ‘बांगलादेश स्ट्रगल- अ‍ॅन ओडेसी इन वॉर पीस, सरेंडर अ‍ॅट ढाका’ ही पुस्तके प्रसिद्ध आहेत. १९९८ ते १९९९ या वर्षभराच्या कालावधीसाठी ते गोव्याचे व त्यानंतर २००३ पर्यंत ते पंजाबचे राज्यपाल होते. फिल्ड मार्शल सॅम माणेकशा, ले. ज. जगजीतसिंह अरोरा आणि आता ले. जे. जेएफआर जेकब यांच्या निधनामुळे १९७१ सालच्या युद्धात पराक्रम गाजविणाऱ्या आणखी एका महान सेनानीस भारत मुकला आहे, असे म्हणावे लागेल.