सुटाबुटात भारतीय नेते वेटरसारखे दिसतात : स्वामी

By Admin | Updated: June 25, 2016 03:12 IST2016-06-25T03:12:11+5:302016-06-25T03:12:11+5:30

घुराम राजन, अरविंद सुब्रमणियन आणि केंद्रीय वित्त सचिव शक्तिकांत दास यांच्यावर हल्ला चढवणाऱ्या सुब्रमण्यम स्वामी यांनी आता थेट अर्थमंत्री अरुण जेटली यांच्यावर शाब्दिक वार सुरू केले

Indian leaders in the suitbatters look like waiters: Swami | सुटाबुटात भारतीय नेते वेटरसारखे दिसतात : स्वामी

सुटाबुटात भारतीय नेते वेटरसारखे दिसतात : स्वामी

नवी दिल्ली : रघुराम राजन, अरविंद सुब्रमणियन आणि केंद्रीय वित्त सचिव शक्तिकांत दास यांच्यावर हल्ला चढवणाऱ्या सुब्रमण्यम स्वामी यांनी आता थेट अर्थमंत्री अरुण जेटली यांच्यावर शाब्दिक वार सुरू केले असून, भाजपा नेत्यांनी व मंत्र्यांनी विदेशात जाताना भारतीय पेहरावात जावे, टाय व सूट घातलेल्या अवस्थेत ते वेटरसारखे दिसतात, अशी ट्विप्पणी केली आहे.
भाजपाचे नेते असलेले सुब्रमण्यम स्वामी हे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पक्षाध्यक्ष अमित शहा वगळता कोणालाच जुमानत नसून, त्यामुळेच त्यांनी उघडपणे जेटली यांना लक्ष्य केले आहे. नेत्यांनी तोंडाला आवर घालावा आणि शिस्त पाळावी ,असा सूचक इशारा जेटली यांनी स्वामी यांना दिला होता. यावर नाव न घेता, मी तोंड बंद ठेवले, तर अनर्थ ओढवेल, अशी तिखट प्रतिक्रिया स्वामी यांनी व्यक्त केली आहे.
अरुण जेटली गुरुवारी बँक आॅफ चायनाचे अध्यक्ष तिआन गिली यांना बीजिंगमध्ये भेटले. त्यांचे सूट व टायमधील छायाचित्र वृत्तपत्रांमध्ये प्रसिद्ध होताच, स्वामींनी भाजपाच्या नेत्यांनी व केंद्रीय मंत्र्यांनी विदेशात भारतीय पद्धतीचे कपडे घालावेत असे ट्विट केले आणि तेवढ्यावर न
थांबता सूट व टायमध्ये भारतीय नेते वेटर वाटतात असेही म्हटले.
(लोकमत न्यूज नेटवर्क)

Web Title: Indian leaders in the suitbatters look like waiters: Swami