नेहरूंच्या परराष्ट्र नीतीवर आता दिसणार पटेलांची छाप, सरकारनं बनवला हा प्लान
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 4, 2019 15:58 IST2019-07-04T14:49:47+5:302019-07-04T15:58:23+5:30
आता मोदी सरकार सरदार पटेलांचा वारसा पुढे घेऊन जाण्यास उत्सुक आहे.

नेहरूंच्या परराष्ट्र नीतीवर आता दिसणार पटेलांची छाप, सरकारनं बनवला हा प्लान
नवी दिल्लीः भारताच्या परराष्ट्र नीतीवर नेहरू आणि त्यांच्या विचारधारेचा प्रभाव नेहमीच पाहायला मिळतो. परंतु आता मोदी सरकार सरदार पटेलांचा वारसा पुढे घेऊन जाण्यास उत्सुक आहे. आता परराष्ट्र सेवेतील उच्चाधिकारी भारताचे बिस्मार्क समजल्या जाणाऱ्या पटेलांना श्रद्धांजली वाहताना दिसतील. त्यासाठी नर्मदेच्या किनारी उभारण्यात आलेल्या सरदार पटेलांच्या मूर्तीजवळ परराष्ट्र मंत्रालयाच्या वार्षिक प्रमुख मिशनसाठी होणाऱ्या परिषदेचं आयोजन करण्यात येणार आहे.
आधी ही परिषद लोकसभा निवडणुकीच्या कारणास्तव रद्द करण्यात आली होती. आता सप्टेंबर रोजी याचं आयोजन होणार आहे. या परिषदेत सर्व भारतीय राजदूत आणि उच्चायुक्त सहभागी होणार आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, या परिषदेसाठी जगातल्या सर्वात उंच मूर्तीजवळ टेंट सिटी तयार करण्यात येणार आहे. या परिषदेचं उद्घाटन परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर करणार असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी या परिषदेला संबोधित करणार आहेत.
या परिषदेत ट्रम्प प्रशासनाचा आक्रमक पवित्रा, अमेरिकेबरोबरचे व्यापार संबंध, चीन आणि रशियाबरोबरचे संबंध, दहशतवादाविरोधातील रणनीती, परराष्ट्र गुंतवणूक वाढवण्याची योजना, काऊन्सलर, प्रवाशांच्या मुद्द्यावर चर्चा होणार आहे. गेल्या काही दिवसांपूर्वीही राज्यसभेत संबोधित करताना मोदी म्हणाले की, सरदार पटेल देशाचे पहिले पंतप्रधान झाले असते, तर जम्मू-काश्मीरच्या समस्येला तोंड द्यावं लागलं नसतं.