भारतीय राज्यघटना म्हणजे खरा आंबेडकरवाद
By Admin | Updated: February 14, 2015 23:52 IST2015-02-14T23:52:15+5:302015-02-14T23:52:15+5:30
भारतीय राज्यघटना म्हणजे खरा आंबेडकरवाद

भारतीय राज्यघटना म्हणजे खरा आंबेडकरवाद
भ रतीय राज्यघटना म्हणजे खरा आंबेडकरवादज़ वि़ पवार : आंबेडकरवादी साहित्य संमेलनाचे उद्घाटनसोलापूर : स्वातंत्र्यपूर्व काळात हजारो वर्षांपासून अन्याय, अत्याचाराच्या खाईत लोटलेल्या दलित समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी, माणसाला माणूसपण देऊन समता प्रस्थापित करण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी लोकशाही राज्यनिर्मितीवर भर दिला. जगात आदर्श ठरलेली भारतीय राज्यघटना म्हणजेच खरा आंबेडकरवाद आहे, असे प्रतिपादन १३ व्या अखिल भारतीय आंबेडकरवादी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष विचारवंत ज. वि. पवार यांनी शनिवारी व्यक्त केले. हुतात्मा स्मृती मंदिर येथे आयोजित आंबेडकरवादी साहित्य संमेलनाच्या उद्घाटनाप्रसंगी ते बोलत होते. विचारपीठावर आमदार प्रणिती शिंदे, माजी खासदार रणजितसिंह मोहिते-पाटील, महापौर प्रा. सुशीला आबुटे आदी उपस्थित होते. पवार म्हणाले, ज्यांनी विचारांना कृतीची आणि संघर्षाला लढ्याची जोड दिली त्या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या आंबेडकरी साहित्याचा विचार होणे आवश्यक आहे. आंबेडकरवाद म्हणजे वर्चस्ववादाविरुद्धचा लढा. भारताचा इतिहास हा या सगळ्या प्रकारच्या वर्चस्ववादाचा इतिहास आहे. या सर्वस्तरीय वर्चस्ववाद संपुष्टात आणण्यासाठी ब्रेन आणि पेन (मेंदू आणि लेखणी) यांचा पुकार केला. ब्रेन आणि पेनचा ठेका ज्यांनी घेतला आहे त्यांनी इतरांना आपले गुलाम केले. या गुलामांना आपल्या गुलामाची जाणीवही होऊ नये म्हणून त्यांनी अपौरूषेयतेचा कोलदांडा घातला. वेद अपौरूषेय ठरवून या वेदांनी भेद निर्माण केला. हा भेदाभेदच मग व्यवस्थेचा स्थायीभाव ठरला. हा स्थायीभाव नष्ट करावा म्हणून बाबासाहेबांनी पेनचा आधार घेतला, असे पवार म्हणाले. संमेलनास पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष राजा इंगळे, रिपाइंचे प्रदेश सरचिटणीस राजा सरवदे, दत्ता गायकवाड, कामगार नेते अशोक जानराव, चेतन नरोटे आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़फोटो १४ सोलापूर- आर युजर डॅटमध्ये कॉपी केला आहे. आंबेडकरवादी साहित्य संमेलनाचे शनिवारी उद्घाटन करताना आमदार प्रणिती शिंदे. समवेत श्रीकांत मोरे, माजी खासदार रणजितसिंह मोहिते-पाटील, ज. वि. पवार आदी.