शहरं
Join us  
Trending Stories
1
PM Modi vs Congress: "काँग्रेस म्हणजे भ्रष्टाचाराची जननी, त्यांना विकासाची ABCD माहिती नाही"; पंतप्रधान मोदी विरोधकांवर बरसले!
2
RCB चे अभिनंदन न करता MS Dhoni ड्रेसिंग रुममध्ये का परतला? समोर आलं कारण 
3
राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ; बॅरिकेड्स तोडल्यामुळे चेंगराचेंगरी
4
...तर पक्ष तेव्हाच फुटला असता; शरद पवारांच्या दाव्यावर छगन भुजबळांची पहिली प्रतिक्रिया
5
"प्रेक्षकांचा आवडता संघ नेहमी जिंकेलच असं नाही पण लोकशाहीत...", सचिनचं मतदारांना आवाहन
6
Swati Maliwal Case : दिल्ली पोलिसांनी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानातून सीसीटीव्ही डीव्हीआर जप्त केला
7
Video: धोनी मॅच संपल्यावर RCBच्या खेळाडूंशी जे वागला, त्यावर विश्वासच बसेना! नेटकऱ्यांनीही केली टीका
8
शेतातील ५० लाख झाडांवर कुऱ्हाड! अधिक पिकांसाठी जमीन हवी म्हणून तोडली झाडे - अहवाल 
9
यावेळीही ट्रॉफी जिंकण्याचे RCB चे स्वप्न भंगणार? एक योगायोग अन् चाहत्यांचे टेन्शन वाढले
10
तुमको मिरची लगी तो मैं क्या करू? ठाण्यासाठी ‘करो या मरो’च्या लढाईला सिद्ध व्हा - देवेंद्र फडणवीस 
11
१% ते १००% पर्यंतचा प्रवास! RCB ची गाडी सुस्साट; ५ खेळाडूंमुळे मिळाले प्ले ऑफचे तिकीट
12
नाशिकमध्ये निवडणुकीत कोणाला पाठिंबा देणार? मनोज जरांगे पाटलांनी स्पष्टच सांगितलं
13
नातू प्रज्वल रेवण्णावरील आरोपांवर माजी पंतप्रधान देवेगौडा यांनी मौन सोडले; म्हणाले, दोषी आढळला तर...
14
नॅचरल आईस्क्रीमचे संस्थापक रघुनंदन श्रीनिवास कामथ यांचे निधन; वयाच्या ७० व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास 
15
ते कुणालाच नको होते; एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदाबाबत संजय राऊत यांचा नवा दावा
16
MS Dhoniचा मैदानाबाहेर मारलेला षटकार ठरला CSKच्या पराभवाचे कारण? RCBला मॅच जिंकण्यासाठी झाली मदत
17
पुण्यात आलिशान पोर्शे कारने दोघांना चिरडले; तरुण-तरुणी जागीच ठार
18
४० कोटींची रोकड सापडली, मोजणी अजूनही पूर्ण नाही... बुटांच्या व्यापाऱ्यांची अफाट संपत्ती
19
भाजप आरएसएसला संपवायला निघालाय, उद्धव ठाकरे यांचा मुंबईत संयुक्त पत्रकार परिषदेत आरोप
20
मतदानाची टक्केवारी अचानक कशी वाढते? निवडणूक आयोगाने स्पष्ट केली बाजू

जवान आणखी हँडसम दिसणार; भारतीय लष्कराचा युनिफॉर्म बदलणार?

By ऑनलाइन लोकमत | Published: May 14, 2019 1:18 PM

लष्कराच्या मुख्यालयानं मागवल्या सूचना

नवी दिल्ली: भारतीय लष्कराच्या गणवेशात लवकरच मोठे बदल होण्याची शक्यता आहे. लष्कराचा गणवेश अधिक स्मार्ट आणि सुटसुटीत करण्याची तयारी सुरू झाली आहे. यासाठी लष्कराच्या मुख्यालयानं अधिकाऱ्यांकडून सूचना मागवल्या आहेत. लष्करी मुख्यालयानं देशातल्या जवळपास 11 संचलनालयांना यासाठी पत्र पाठवलं असल्याचं वृत्त इकॉनॉमिक टाईम्सनं सूत्रांच्या हवाल्यानं दिलं आहे. लवकरात लवकर तुमच्या सूचना पाठवा, असं मुख्यालयानं पत्रात म्हटलं आहे. लष्कराचा गणवेश अधिक स्मार्ट आणि सुटसुटीत व्हावा याबद्दल मुख्यालयातल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांमध्ये चर्चा झाली. अनेक देशांच्या लष्कराच्या गणवेशात पँट आणि शर्टचा रंग वेगळा आहे. याच धर्तीवर भारतीय लष्कराच्या गणवेशात बदल केला जाऊ शकतो, अशी सूचना एका वरिष्ठ अधिकाऱ्यानं केली. भारतीय लष्कराच्या अधिकाऱ्यांच्या गणवेशावर एक पट्टी असते. त्यावर लावण्यात आलेल्या स्टार्सवरुन अधिकाऱ्याचं पद कळतं. तर अमेरिका आणि ब्रिटनमध्ये छातीवर लावण्यात आलेल्या चिन्हांवरुन अधिकाऱ्यांचं पद समजतं. ही बाबदेखील गणवेशात बदल करताना लक्षात घेतली जाणार आहे.जवानांच्या बेल्टमध्येही बदल करण्याची सूचना काही अधिकाऱ्यांनी दिली आहे. हा बेल्ट न वापरल्यास गणवेश अधिक स्मार्ट आणि सुटसुटीत होईल, असं काही अधिकाऱ्यांचं मत आहे. गणवेशात बदल करण्याची चर्चा याआधीही अनेकदा झाल्याची माहिती एका अधिकाऱ्यानं दिली. लष्कराच्या गणवेशात अनेकदा लहानसहान बदल झालेले आहेत. आता पुन्हा एकदा गणवेशात बदल करण्यासाठी सूचना मागवण्यात आल्या आहेत. मात्र यासाठी बराच वेळ लागेल, असं अधिकाऱ्यांनी सांगितलं.  

टॅग्स :Indian Armyभारतीय जवान