भारतीय लष्कराकडून पुन्हा एकदा ड्रोन स्ट्राईक, अनेक अतिरेकी ठार झाल्याचा दावा
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 13, 2025 18:25 IST2025-07-13T18:23:50+5:302025-07-13T18:25:13+5:30
Indian Army Drone Attack on ULFA-I: भारतील सैन्यदलांनी शरिवारी म्यानमारमध्ये मोठी कारवाई करता उल्फा-आय या अतिरेकी संघटनेच्या चार अड्ड्यांवर ड्रोनद्वारे हल्ला केल्याचा दावा करण्यात येत आहे. तसेच या कारवाईसाठी सुमारे १०० ड्रोनचा वापर करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.

भारतीय लष्कराकडून पुन्हा एकदा ड्रोन स्ट्राईक, अनेक अतिरेकी ठार झाल्याचा दावा
भारतील सैन्यदलांनी शरिवारी म्यानमारमध्ये मोठी कारवाई करता उल्फा-आय या अतिरेकी संघटनेच्या चार अड्ड्यांवर ड्रोनद्वारे हल्ला केल्याचा दावा करण्यात येत आहे. तसेच या कारवाईसाठी सुमारे १०० ड्रोनचा वापर करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. तसेच या हल्ल्यात बड्या कमांडरसह उल्फाचे अनेक अतिरेकी ठार झाल्याचं वृत्त आहे.
सीमेपलिकडून होणाऱ्या अतिरेकी कारवायांविरोधात भारताकडून हल्लीच्या वर्षांमध्ये केलेली ही सर्वात मोठी कारवाई असल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र भारत सरकार आणि भारतीय लष्कराकडून या मोहिमेला कुठलाही अधिकृत दुजोरा देण्यात आलेला नाही. मात्र या कारवाईत उल्फाचा एक बडा नेता नयन असोम हा मारला गेल्याचा दावा काही प्रसारमाध्यमांकडून केला जात आहे. नयन असोम हा उल्फाच्या लष्करी विभागाचा लेफ्टिनंट जनरल होता. त्याच्याबरोबरच उल्फा-आयचा सेल्फ स्टाईल्ड कर्नल गणेश लहोन उर्फ गणेश असोम हाही या कारवाईत मारला गेल्याचे सांगण्यात येत आहे.
काही वृत्तांनुसार भारतीय लष्कराकडून या कारवाईला अधिकृत दुजोरा दिला जात नसल्याचे सांगण्यात येत आहे. त्या्मुळे या कारवाईबाबत संभ्रम निर्माण झाला आहे. दरम्यान, सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार लष्कराकडून म्यानमारमधील सागाईंग परिसरातील होयत वस्तीमध्ये असलेलं उल्फा-आयचं पूर्वेकडील मुख्यालय लष्कराच्या निशाण्यावर होतं. त्यामुळे होयत वस्तीवर झालेला हल्ला हा मोठा हल्ला मानला जात आहे.