शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

Army Helicopter Crashed: जम्मू-काश्मीरच्या गुरेज सेक्टरमध्ये सैन्याचे हेलिकॉप्टर कोसळले, बचाव कार्य सुरू

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 11, 2022 15:35 IST

Army Helicopter Crashed: हेलिकॉप्टर कोसळले, त्या भागात जोरदार बर्फवृष्टी होत आहे. त्यामुळे, अपघातस्थळी पायी किंवा हेलिकॉप्टरने पोहोचण्यास अडचणी येत आहेत.

श्रीनगर:जम्मू-काश्मीरमधील(Jammu and Kashmir) गुरेझ सेक्टरमध्ये भारतीय लष्कराचे हेलिकॉप्टर कोसळल्याची माहिती समोर आली आहे. माहिती मिळताच सुरक्षा दलांनी बचाव मोहीम राबवण्याची तयारी सुरू केली. हेलिकॉप्टरमधील कर्मचाऱ्यांना वाचवण्यासाठी बचाव पथक बर्फाळ भागात पोहोचले आहे. वैमानिक आणि सहवैमानिक सुखरूप असल्याचे सांगितले जात आहे, परंतु अद्याप यासंदर्भात कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.

मिळालेल्या माहितीनुसार, जम्मू-काश्मीरमधील गुरेझच्या तुलैल परिसरात नियमित उड्डाण करत असताना भारतीय लष्कराचे चित्ता हेलिकॉप्टर कोसळले. हेलिकॉप्टर हवेत असताना त्यांचा एअर ट्रॅफिक कंट्रोलशी संपर्क तुटला. थोड्यावेळानंतर हेलिकॉप्टर क्रॅश झाल्याची माहिती समोर आली. यानंतर भारतीय लष्कर आणि हवाई दलाने तातडीने एक बचाव पथक गुजरन नाला परिसरात पाठवले.

लष्कराकडे 200 चित्ता हेलिकॉप्टर आहेतचित्ता हे एक इंजिन असलेले हेलिकॉप्टर आहे, ज्यामध्ये मूव्हिंग मॅप डिस्प्ले, ग्राउंड प्रॉक्सिमिटी वॉर्निंग सिस्टम आणि वेदर रडार यासारख्या प्रमुख वैशिष्ट्यांचा अभाव आहे. यात ऑटोपायलट प्रणाली देखील नाही. लष्कराकडे अशाप्रकारचे 200 हेलिकॉप्टर आहेत. गेल्या काही वर्षांत या हेलिकॉप्टरमुळे 30 हून अधिक अपघात झाले असून त्यात 40 हून अधिक अधिकाऱ्यांचा मृत्यू झाला आहे.

नवीन हेलिकॉप्टर आणण्याची योजनासंरक्षण मंत्रालयाच्या महितीनुसार, ऑपरेशनल आवश्यकता लक्षात घेऊन चित्ता आणि चेतक हेलिकॉप्टरसह सुरक्षा दलांच्या विमानांच्या ताफ्याचा वेळोवेळी आढावा घेतला जातो. सरकारने या हेलिकॉप्टरला नेव्हल यूटिलिटी हेलीकॉप्टर, स्वदेशी लाइट यूटिलिटी हेलिकॉप्टर (LUH) सोबत बदलण्याची योजना बनवली आहे. याचे निर्मिती HAL “बाय (इंडियन-आयडीडीएम)” प्रोजेक्ट अंतर्गत केले आहे. तसेच,  रशिया निर्मीत Ka-226T ला “बाय अँड मेक (इंडियन)” द्वारे बनवण्यात आले आहे.

टॅग्स :Jammu Kashmirजम्मू-काश्मीरHelicopter Crashहेलिकॉप्टर दुर्घटनाIndian Armyभारतीय जवान