हैदराबादेत भारतीय हवाई दलाचं प्रशिक्षणार्थी विमान कोसळलं, कोणतीही जीवितहानी नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 28, 2017 17:02 IST2017-09-28T17:02:32+5:302017-09-28T17:02:44+5:30

हैदराबादेत आज हवाई दलाचं प्रशिक्षणार्थी विमान कोसळल्याची दुर्घटना घडलीय. हैदराबादेतील मेस्कलमधील किसारा गावात अचानकपणे भारतीय हवाई दलाचं हे विमान कोसळलं.

Indian Air Force's trainee flight collapses in Hyderabad, no survivors | हैदराबादेत भारतीय हवाई दलाचं प्रशिक्षणार्थी विमान कोसळलं, कोणतीही जीवितहानी नाही

हैदराबादेत भारतीय हवाई दलाचं प्रशिक्षणार्थी विमान कोसळलं, कोणतीही जीवितहानी नाही

नवी दिल्ली- हैदराबादेत आज हवाई दलाचं प्रशिक्षणार्थी विमान कोसळल्याची दुर्घटना घडलीय. हैदराबादेतील मेस्कलमधील किसारा गावात अचानकपणे भारतीय हवाई दलाचं हे विमान कोसळलं. विमान दुर्घटनाग्रस्त झालं त्यावेळी वैमानिकासह तीन जण होते. मात्र तीनही जण सुखरूप असल्याची माहिती समोर आली आहे.

गुरुवारी सकाळी 11 वाजून 45 मिनिटांनी हे विमान दुर्घटनाग्रस्त झालं आहे. हे प्रशिक्षणार्थी विमान हैदराबादच्या हकीमपेट एअरफोर्स स्टेशनवरून निघाले असताना ते अपघातग्रस्त झालं आहे. या अपघाताचा शोध हवाई दलाचे कर्नल करणार असल्याची माहिती समोर आली आहे. गेल्या काही दिवसांपूर्वीही भारतीय हवाई दलाचं जग्वार विमान सरावादरम्यान राजस्थानमधल्या पोखरणमध्ये कोसळलं होतं. त्यावेळी विमानातील दोन्ही पायलट्स सुरक्षित होते.

भारतीय हवाई दलाच्या या जग्वार विमानाचा नेहमीप्रमाणे सराव सुरू होता. त्याचवेळी इंडो-पाक सीमेजवळच्या भागात हे विमान कोसळलं होतं, अशी माहिती लष्कराचे प्रवक्ते मनीष ओझा यांनी दिली होती. कोर्टानं या विमान दुर्घनटेच्या प्रकाराच्या चौकशीचे आदेश दिल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली होती.


Web Title: Indian Air Force's trainee flight collapses in Hyderabad, no survivors

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.