भारतीय हवाई दलानं इस्रायली गिर्यारोहकांचा वाचवला जीव
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 5, 2018 20:33 IST2018-06-05T20:33:31+5:302018-06-05T20:33:31+5:30
भारताच्या सर्वासा हवाई दलाच्या हिमालयन ड्रॅगन युनिटनं सामर्थ्याच्या जोरावर तीन इस्रायली पर्यटकांना सुखरूप वाचवलं.

भारतीय हवाई दलानं इस्रायली गिर्यारोहकांचा वाचवला जीव
नवी दिल्ली- भारताच्या सर्वासा हवाई दलाच्या हिमालयन ड्रॅगन युनिटनं सामर्थ्याच्या जोरावर तीन इस्रायली पर्यटकांना सुखरूप वाचवलं. रोहतंग पास या रस्त्यावरून इस्रायली पर्यटकांची गाडी जात असताना बाजूच्या खोल दरीत कोसळली आणि त्यांना वाचवण्यासाठी हिमालयन ड्रॅगनच्या युनिटनं जिवाची बाजी लावली. तिन्ही गिर्यारोहकांना दरीतून सुखरूप बाहेर काढल्यानंतर त्यांना ध्रुव हेलिकॉप्टरनं कुल्लूहून चंदीगडला हलवण्यात आलं आहे. त्यातील एकाची प्रकृती गंभीर असून, त्यांच्यावर जवळच्याच रुग्णालयात उपचार सुरू आहेत.