शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
4
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
5
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
6
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
7
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
8
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
9
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
10
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
11
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
12
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
13
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
14
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
15
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
16
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
17
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
18
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
19
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
20
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
Daily Top 2Weekly Top 5

Pulwama Attack: पाकिस्तानची वाट लागणार; 'मोस्ट फेवर्ड नेशन'चा दर्जा काढल्यावर 'बाजार उठणार'!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 15, 2019 13:01 IST

पुलवामामधील हल्ल्यानंतर भारताचं कठोर पाऊल

मुंबई: जम्मू-काश्मीरमधील पुलवामामधील दहशतवादी हल्ल्यानंतर मोदी सरकारनं कठोर पावलं उचलण्यास सुरुवात केली आहे. पाकिस्तानला देण्यात आलेला मोस्ट फेवर्ड राष्ट्राचा दर्जा भारताकडून काढण्यात आल्याची घोषणा करण्यात आली. गुरुवार पुलवामातील अवंतीपुरामध्ये सीआरपीएफच्या ताफ्यावर दहशतवादी हल्ला झाला. त्यामध्ये 37 जवान शहीद झाले, तर अनेक जवान गंभीर जखमी झाले. संपूर्ण देशभरातून या हल्ल्याबद्दल तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. पुलवामा हल्ल्याची जबाबदारी जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेनं स्वीकारली आहे. ही संघटना पाकिस्तानमधील आहे. या संघटनेचा म्होरक्या मसूद अजहर पाकिस्तानातून संपूर्ण कारवायांची सूत्रं हलवतो. त्यामुळे दहशतवादी हल्ल्यानंतर भारतानं पाकिस्तानचा तीव्र निषेध केला. आज भारतानं पाकिस्तानला देण्यात आलेला मोस्ट फेवर्ड नेशनचा दर्जा काढून घेत असल्याची घोषणा केली. या प्रकारचा दर्जा दिल्यावर समोरच्या देशाला व्यापार करताना विशेष सूट दिली जाते. जागतिक व्यापार संघटना आणि आंतरराष्ट्रीय व्यापाऱ्यांच्या नियमांनुसार मोस्ट फेवर्ड नेशनचा दिला जातो. ज्या देशाला मोस्ट फेवर्ड नेशनचा दर्जा दिला जातो, तो देश दुसऱ्या देशांच्या तुलनेत तोट्यात राहू शकत नाही. ज्यावेळी एका देशाला असा दर्जा दिला जातो, त्यावेळी त्यानं व्यापार शुल्क कमी करावं अशी अपेक्षा असते. दोन देश एकमेकांना मोस्ट फेवर्ड नेशनचा दर्जा देऊ शकतात. असा दर्जा दिल्यावर संबंधित देश कोणत्याही आयात आणि निर्यात शुल्काशिवाय व्यापार करु शकतात. भारतानं 1996 मध्ये पाकिस्तानला मोस्ट फेवर्ड नेशनचा दर्जा दिला. मात्र पाकिस्ताननं अद्याप भारताला असा दर्जा दिलेला नाही. मोस्ट फेवर्ड नेशनचा दर्जा मिळाल्यावर काय फायदा होतो?ज्या देशाला मोस्ट फेवर्ड नेशनचा दर्जा दिला जातो, त्या देशाला व्यापारात अधिक प्राधान्य दिलं जातं. असा दर्जा देण्यात आल्यावर आयात-निर्यातीत विशेष सूट मिळते. मोस्ट फेवर्ड नेशनचा दर्जा मिळालेला देश कमीत कमी आयात शुल्क भरुन व्यापार करु शकतो. भारतानं पाकिस्तानला असा दर्जा दिला होता. त्यामुळे भारताशी व्यापार करताना पाकिस्तानला मोठा फायदा व्हायचा. कधी मागे घेतला जाऊ शकतो मोस्ट फेवर्ड नेशनचा दर्जा?जागतिक व्यापार संघटनेनं कलम 21बी मध्ये मोस्ट फेवर्ड नेशनचा दर्जा कधी मागे घेतला जाऊ शकतो, याबद्दलची माहिती दिली आहे. त्यानुसार दोन्ही देशांमध्ये सुरक्षेसंबंधी वाद निर्माण झाल्यास असा दर्जा काढून घेतला जाऊ शकतो. मात्र यासाठी काही अटींची पूर्तता करणं गरजेचं असतं.  

टॅग्स :pulwama attackपुलवामा दहशतवादी हल्लाIndiaभारतPakistanपाकिस्तानTerror Attackदहशतवादी हल्लाterroristदहशतवादीbusinessव्यवसाय