शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
2
मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान होऊ द्या, सहा महिन्यांत पाकव्याप्त काश्मीरही भारताचा भाग झाल्याचे दिसेल- योगी आदित्यनाथ
3
विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस, मुंबईत कशी असणार स्थिती?; असा आहे हवामान अंदाज
4
एक चेंडू छतावर, दुसरा स्टँडवर! Virat Kohli चा नवा विक्रम, पण ज्याची भीती होती तेच झालं
5
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
6
धक्कादायक! पुणे-सोलापूर हायवेवर होर्डिंग कोसळून दोन जण जखमी 
7
परळीत लोकशाही नव्हे तर गुंडाराज?; व्हिडीओ पोस्ट करत रोहित पवारांचा सवाल
8
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
9
अजितचा स्वभाव मला माहीत आहे, तो कधीही...; निवडणुकीच्या अंतिम टप्प्यात पवारांचं मोठं वक्तव्य
10
Rohit Sharma अखेर व्यक्त झाला! मुंबई इंडियन्सच्या अपयशाचं खरं कारण सांगितलं, म्हणाला... 
11
"पाकिस्तानात निघून जा अन् तिथे मुस्लिमांना आरक्षण द्या"; CM सरमा यांचा लालू यादवांवर निशाणा
12
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
13
आधी पाया पडते, पदर पसरते म्हणणारे आता गुरगुरत आहेत; जरांगेंची मुंडे बहीण-भावावर टिका
14
MS Dhoniची फिल्ड प्लेसमेंट, रोहितचा पूल शॉट अन्....; विराटला हवी आहेत ६ खेळाडूंची कौशल्य
15
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
16
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
17
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...
18
PM नरेंद्र मोदींची आज दिल्लीत सभा, १३ देशांचे राजदूत उपस्थित राहणार!
19
"भारतापेक्षा अधिक तेजस्वी, प्रखर लोकशाही जगात कुठेही नाही"; व्हाईट हाऊसने केली स्तुती
20
'राजा हिंदुस्तानी'साठी करिश्मा कपूर नाही तर ऐश्वर्या राय होती पहिली पसंती, या कारणामुळे अभिनेत्रीने नाकारला सिनेमा

अफगाणिस्तानात भारत सैन्य पाठवणार नाही, केंद्रीय संरक्षण मंत्री निर्मला सीतारामन यांनी केलं स्पष्ट

By ऑनलाइन लोकमत | Published: September 26, 2017 5:52 PM

भारत अफगाणिस्तानमध्ये लष्कराची तुकडी पाठवणार नाही, असं संरक्षण मंत्री निर्मला सीतारामन यांनी स्पष्ट केलं आहे. अमेरिकेचे संरक्षण मंत्री जेम्स मॅटिस यांच्यासोबत घेतलेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या.

नवी दिल्ली, दि. 26 - भारत अफगाणिस्तानमध्ये लष्कराची तुकडी पाठवणार नाही, असं संरक्षण मंत्री निर्मला सीतारामन यांनी स्पष्ट केलं आहे. अमेरिकेचे संरक्षण मंत्री जेम्स मॅटिस यांच्यासोबत घेतलेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या. भारतानं अफगाणिस्तानाच्या विकासासाठी अनेक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहेत, गरज पडल्यास त्याचं आम्ही सविस्तर विश्लेषण करू. केंद्रीय संरक्षण मंत्री निर्मला सीतारामन यांनी अमेरिकेच्या समोरच भारत अफगाणिस्तानात सैन्य पाठवणार नसल्याचं सांगितलं आहे.अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी हल्लीच अफगाणिस्तानच्या नव्या रणनीतीची घोषणा केली आहे. या रणनीतीत भारत सर्वाधिक सक्रिय भूमिका निभावेल, अशी आशा व्यक्त केली आहे. याच पार्श्वभूमीवर भारत अफगाणिस्तानमध्ये सैन्य पाठवेल, अशी शक्यताही वर्तवण्यात येत होती. गेल्या 16 वर्षांपासून संघर्षग्रस्त अफगाणिस्तानात भारतीय लष्करानं दखल दिली नव्हती. अमेरिकेच्या अफगाणिस्तान रणनीतीत पाकिस्तानची भूमिका महत्त्वपूर्ण राहिली आहे.निर्मला सीतारामन आणि जेम्स मॅटिस यांनी घेतलेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत पत्रकारांनी पाकिस्तानच्या मुद्द्यावरही छेडले असता, पाकिस्तानचा मुद्दा भारतानं अमेरिकेसमोर उपस्थित केल्याचं सीतारामन यांनी स्पष्ट केलं आहे. तसेच दहशतवाद्यांना प्रोत्साहन देणा-या शक्तींना नेस्तनाबूत करू, असंही या संयुक्त पत्रकार परिषदेत विधान जारी करण्यात आलं आहे. जेम्स मॅटिस म्हणाले, दहशतवाद्यांना सुरक्षितरीत्या आश्रय देणा-यांना सहन केलं जाणार नाही. भारत आणि अमेरिका दहशतवाद संपवण्यासाठी संयुक्तरीत्या काम करेल.भारताच्या परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी संयुक्त राष्ट्र संघाच्या आमसभेत शुक्रवारच्या भाषणात दहशतवादावरून वाभाडे काढले होते. जशास तसे उत्तर देण्याच्या नादात पाकिस्तानने रविवारी स्वत:ची चांगलीच फजिती करून घेतली होती.काश्मीरमध्ये कसे अत्याचार होतात हे दाखवण्याचा खोटा प्रयत्न करताना पाकिस्तानने गाझा हल्ल्याचा फोटो दाखवला असून, त्यामुळे जगभरात नाचक्की झाली होती. पाकिस्तानच्या राष्ट्रसंघातील स्थायी प्रतिनिधी मलिहा लोधी, उत्तर देण्याचा अधिकार बजावत, आमसभेपुढे उभ्या राहिल्या व स्वयंनिर्णयाचा ‘न्याय्य’ हक्क मागणा-या काश्मिरी जनतेवर भारत सरकार लष्कराकरवी कसे अनन्वित अत्याचार करीत आहे, याचे खोटेनाटे आरोप करत त्यांनी एक फोटो दाखविला. सुरक्षा दलांनी पेलेट गनचा मारा केल्याने एका काश्मिरी युवतीच्या चेह-याची कशी चाळण झाली, हे जगासमोर आणण्यासाठी लोधी यांनी फोटो दाखविला होता; परंतु प्रत्यक्षात हा फोटो काश्मिरी युवतीचा नसल्याचे लगेच स्पष्ट झाले. स्वराज यांनी त्यांच्या भाषणात पाकिस्तानला ‘दहशतवादाची निर्यात करणारा प्रमुख कारखाना’ असे संबोधले होते.

टॅग्स :Pakistanपाकिस्तान