तीन वर्षात भारताला मिळणार 18 अब्ज डॉलरचे कर्ज

By Admin | Updated: July 25, 2014 00:54 IST2014-07-25T00:54:10+5:302014-07-25T00:54:10+5:30

जागतिक बँकेने आगामी तीन वर्षात भारताला 15 ते 18 अब्ज डॉलरचे कर्ज देण्याचे आश्वासन दिले आहे.

India will get $ 18 billion loan in three years | तीन वर्षात भारताला मिळणार 18 अब्ज डॉलरचे कर्ज

तीन वर्षात भारताला मिळणार 18 अब्ज डॉलरचे कर्ज

नवी दिल्ली : जागतिक बँकेने आगामी तीन वर्षात भारताला 15 ते 18 अब्ज डॉलरचे कर्ज देण्याचे आश्वासन दिले आहे. भारताच्या आर्थिक वाढीचा दर 9 टक्के करण्यासाठी बँकेद्वारे हे अर्थबळ पुरविले जाणार आहे.
जागतिक बँक समूहाचे अध्यक्ष जिम योंग किम यांनी सांगितले की, ‘आम्ही कर्जाशी संबंधित विशिष्ट प्रकरणांवर चर्चा केली नाही. आगामी तीन वर्षात आम्ही शासकीय योजनांसाठी भारताला 15 ते 18 अब्ज डॉलरचे कर्ज देणार आहोत. खासगी प्रकल्पांसाठीही कमीत कमी 3.5 अब्ज डॉलर उपलब्ध करून दिले जातील.’ बँक समूहाचा सदस्य आंतरराष्ट्रीय वित्त महामंडळ अर्थात आयएफसीद्वारे विकसनशील देशांत खासगी क्षेत्रतील उपक्रम व प्रकल्पांसाठी कर्ज व सल्ला दिला जातो.
भारत जागतिक बँक समूहाचा सर्वात मोठा ग्राहक आहे. गेल्या आर्थिक वर्षात भारताला 5.2 अब्ज डॉलर एवढे कर्ज मिळाले होते. जागतिक बँक समूहाकडून गेल्या तीन वर्षात प्राप्त झालेल्या कर्जाचा आकडा 9.8 अब्ज डॉलरवर जातो.
नव्या सरकारचे विकासविषयक प्राधान्यक्रम जाणून घेण्याकरता जिम योंग किम हे तीन दिवसांच्या भारत दौ:यावर आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी व अर्थमंत्री अरुण जेटली यांच्याशी झालेल्या भेटीत देशाच्या वाढीला कशी चालना देता येईल व लोकसंख्या व्यवस्थापनावर चर्चा झाली. (लोकमत न्यूज नेटवर्क)
 
4किम यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी व अर्थमंत्री अरुण जेटली यांची नवी दिल्लीत भेट घेतली. यावेळी उभय नेत्यांनी किम यांना आर्थिक वृद्धीचे आश्वासन दिले. यासाठी शक्य ती माहिती व आर्थिक साहाय्य पुरवण्याचे आश्वासन किम यांनी पंतप्रधानांना दिले. नवीन सरकार आर्थिक वाढीचा दर 9 टक्के करण्यासाठी प्रयत्नशील असून याला आमचा पाठिंबा असल्याचे किम यांनी सांगितले.

 

Web Title: India will get $ 18 billion loan in three years

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.