शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

2019 मध्ये भाजपा जिंकल्यास भारताचा 'हिंदू पाकिस्तान' होईल- थरुर

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 12, 2018 07:28 IST

शशी थरुर यांच्या विधानावर भाजपाची सडकून टीका

तिरुअनंतपुरम : आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपा विजयी झाल्यास देशाचा हिंदू पाकिस्तान होईल, असं काँग्रेसचे वरिष्ठ नेते शशी थरुर यांनी म्हटलं आहे. तिरुअनंतपुरममध्ये आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमात ते बोलत होते. 'भाजपा पुन्हा सत्तेत आल्यास नव्यानं घटना लिहिली जाईल. त्यामुळे भारतामधील परिस्थिती पाकिस्तानसारखी होईल. मग या देशात अल्पसंख्याकांच्या अधिकारांचा कोणताही सन्मान केला जाणार नाही,' असं थरुर म्हणाले.शशी थरुर यांनी कडव्या हिंदुत्वाच्या मुद्यावरुन भाजपाला लक्ष्य केलं. 'ते (भाजपा) पुन्हा लोकसभा निवडणूक जिंकले तर, आपल्या देशातील लोकशाही व्यवस्था संपेल. त्यांच्याकडून घटना उद्ध्वस्त केली जाईल. त्यांची नवी घटना हिंदू राष्ट्राच्या सिद्धांतावर आधारित असेल. त्यामुळे अल्पसंख्याकांचे अधिकार संपुष्टात येतील. देशाचा हिंदू पाकिस्तान होईल. महात्मा गांधी, नेहरु, सरदार पटेल, मौलाना आजाद आणि स्वातंत्र्यासाठी झटलेल्या अनेक महान व्यक्तींनी अशा देशासाठी संघर्ष केला नव्हता,' अशा शब्दांमध्ये थरुर यांनी भाजपाला लक्ष्य केलं. थरुर यांच्या या विधानाचे तीव्र पडसाद उमटले आहेत. थरुर यांच्या विधानाबद्दल काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींनी माफी मागावी, अशी मागणी भाजपानं केली आहे. 'शशी थरुर यांच्या विधानाबद्दल राहुल यांनी माफी मागायला हवी. पाकिस्तानच्या निर्मितीसाठी काँग्रेस पक्ष जबाबदार होता. काँग्रेसकडून हिंदूंची बदनामी केली जात आहे,' असं भाजपाचे प्रवक्ते संबित पात्रा यांनी म्हटलं. पात्रा यांनी ट्विटरवरुनदेखील काँग्रेसवर निशाणा साधला आहे. 'काँग्रेस हिंदूंना बदनाम करण्याची एकही संधी सोडत नाही. 'हिंदू दहशतवाद्यां'पासून 'हिंदू पाकिस्तान'पर्यंत... काँग्रेसची धोरणं ही पाकिस्तानला खूष करणारी आहेत,' असं पात्रा यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.  

टॅग्स :Shashi Tharoorशशी थरूरBJPभाजपाHinduहिंदूPakistanपाकिस्तानMuslimमुस्लीमNarendra Modiनरेंद्र मोदीcongressकाँग्रेस