AI च्या जगात भारतही करणार एन्ट्री! दहा महिन्यात DeepSeek आणि ChatGPT सारखं एआय मॉडेल येणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 30, 2025 15:34 IST2025-01-30T15:32:50+5:302025-01-30T15:34:35+5:30

AI Model : चीन आणि अमेरिकेत एआय मॉडेलवरुन मोठी स्पर्धा सुरू आहे. आता भारतही या स्पर्धेत उतरणार आहे.

India will also enter the world of AI AI models like DeepSeek and ChatGPT will be available in ten months | AI च्या जगात भारतही करणार एन्ट्री! दहा महिन्यात DeepSeek आणि ChatGPT सारखं एआय मॉडेल येणार

AI च्या जगात भारतही करणार एन्ट्री! दहा महिन्यात DeepSeek आणि ChatGPT सारखं एआय मॉडेल येणार

सध्याच युग एआय' चं युग आहे. जगभरात अनेक एआय मॉडेल विकसित होत आहेत. अमेरिकेलीत ओपन एआय या कंपनीने मागील वर्षी ChatGPT सुरू केलं. आतापर्यंत एआयमध्ये अमेरिकेचा बोलबाला होता. दोन दिवसापूर्वी चीनमधील एका कंपनीने डीपसीक नावाचं नवीन एआय मॉडेल लाँच केले आहे. या मॉडेलमुळे अमेरिकेतली टेक कंपन्या टेन्शनमध्ये आल्या आहेत. कारण चीनच्या या नव्या डीपसीकने डाऊनलोडमध्ये सर्वच रेकॉर्ड मोडले आहेत. यामुळे आता चीन आणि अमेरिका या दोन देशात एआय क्षेत्रात मक्तेदारी सुरू झाली आहे. यामुळे आता भारतही एआय क्षेत्रात पाऊल ठेवणार आहे. याबाबत केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी माहिती दिली. 

'त्या' विद्यार्थ्यांचा व्हिसा रद्द होणार! पॅलेस्टाईनच्या समर्थनार्थ घोषणा देणाऱ्यांना ट्रम्प सरकारचा मोठा धक्का

केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी पत्रकार परिषदेत भारताच्या एआय मिशनबद्दल माहिती दिली. भारत स्वतःच्या मोठ्या भाषेच्या मॉडेलवर म्हणजेच एलएलएमवर काम करत आहे आणि ते १० महिन्यांत तयार होईल. अश्विनी वैष्णव म्हणाले की, 'आम्ही फ्रेमवर्क तयार केले आहे आणि ते आज लाँच केले जात आहे. आमचे लक्ष भारतीय संदर्भ आणि संस्कृतीशी संबंधित एआय मॉडेल्स तयार करण्यावर असेल.

DeepSeek एआयला 2000 GPUs सह प्रशिक्षित करण्यात आले होते, ChatGPT ला 25000 GPU सह प्रशिक्षित करण्यात आले होते आणि आमच्याकडे 15,000 हाय-एंड जीपीयू आहेत. भारतात मजबूत संगणकीय सुविधा आहेत. या आपल्या एआय मिशनला चांगला पाठिंबा देतील.

सरकारने 18,000 GPUs असलेली संगणकीय सुविधा तयार केली आहे. ते लवकरच स्टार्टअप्स, संशोधक आणि विकासकांसाठी उपलब्ध करून दिले जाईल, अशी माहिती अश्विनी वैष्णव यांनी दिली. 

GPUs एवढे का महत्वाचे आहे?

कोणत्याही भाषेच्या मॉडेलला प्रशिक्षित करण्यासाठी उच्च दर्जाचे GPUs आवश्यक असतात. मोठ्या भाषा मॉडेल्सना प्रशिक्षण देण्यासाठी GPU म्हणजेच ग्राफिक्स प्रोसेसिंग युनिटचा वापर केला जातो. हे मुळात ग्राफिक्स कार्ड आहेत, पण ते विशेषतः एआयसाठी डिझाइन केलेले आहेत. नॉर्मल GPU नेही हे काम करता येते पण स्पीडने काम करण्यासाठी याचा वापर केला जातो. 

GPUs एकाचवेळी कॉम्पप्लेक्स मेट्रीक ऑपरेशन्स करु शकते. GPUs ची रचना समांतर प्रक्रियेसाठी केली जाते, त्यात एकाच वेळी हजारो कामे करू शकते. कारण LLM कॅलक्युलेशन पॅरेलल केले जातात. मोठ्या भाषेतील मॉडेल्सना प्रशिक्षण देण्यासाठी भरपूर संगणकीय शक्तीची आवश्यकता असते, यामुळे AI मॉडेल्ससाठी GPUs आणखी महत्त्वाचे बनतात. यामुळेच आज NVIDEA इतकी मोठी कंपनी बनली आहे.

भारत एआय मिशन अंतर्गत, तंत्रज्ञानाव्यतिरिक्त इतर क्षेत्रांमध्ये एआयचा वापर केला जाईल. यामध्ये आरोग्यसेवा, शिक्षण, शेती आणि हवामान अंदाज यांचा समावेश आहे.

Web Title: India will also enter the world of AI AI models like DeepSeek and ChatGPT will be available in ten months

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.