शहरं
Join us  
Trending Stories
1
शिंदेसेनेला धक्का, पाच उमेदवारी अर्ज बाद; एबी फॉर्मवर खाडाखोड, झेरॉक्स जोडल्याने ठरले अवैध
2
बांगलादेशी खेळाडूंसाठी आयपीएलचे दरवाजे बंद होणार? मुस्तफिजुर रहमानसाठी शाहरुखच्या संघाने ९ कोटी मोजले...
3
टॅरिफमुळे US ची किती कमाई? "टीका करणारे मुर्ख" असं म्हणणारे ट्रम्प प्रत्येकाला $२००० देण्याचं वचन पूर्ण करणार का?
4
२०२६ मध्ये या ५ राज्यात रंगणार सत्तेचा सारीपाट, बाजी कोण मारणार, NDA की ‘INDIA’?
5
ट्रम्प यांच्या निर्णयाचे पडसाद! 'या' दोन देशांनी अमेरिकन नागरिकांच्या प्रवेशावर घातली बंदी
6
जळगावात भाजपाला धक्का, माजी महापौरांचा अर्ज बाद; AB फॉर्ममधील त्रुटीचा उद्धवसेनेलाही फटका
7
Healthy Diet: अन्न तेच पण पद्धत वेगळी! जपानी लोक लठ्ठ का होत नाहीत? त्यामागे आहेत ५ सिक्रेट 
8
कोकण गाजवल्यावर शिंदेचा फायर ब्रँड नेता मुंबईत; ठाकरेंच्या बालेकिल्ल्यात दिली मोठी जबाबदारी
9
“आम्ही दोघं राजा-राणी…” विरुष्काचं प्रेम अन् MS धोनी–साक्षीची ‘राजकुमारी’सोबतची खास फ्रेम चर्चेत
10
भारताची चीनवर कडी...! 'या' उत्पादनातही मागे टाकलं; ड्रॅगनची चिंता वाढली
11
Nashik Municipal Corporation Election : डबल एबी फॉर्म अन् बडगुजरांचा ट्रिपल धमाका; आमदार सीमा हिरेंसह भाजपला धक्का
12
'ठाकरे बंधूंचा वचननामा ४ जानेवारीला प्रसिद्ध करणार, नंतर एवढ्या संयुक्त सभा होणार', संजय राऊत यांनी दिली माहिती 
13
उड्डाणापूर्वी एअर इंडियाचा पायलट दारू प्यायला; अधिकाऱ्यांनी घेतले ताब्यात, DGCA कारवाई करणार
14
रवींद्र चव्हाणांनी शब्द दिला, १०० टक्के भाजपाचं तिकीट तुम्हालाच, मग अचानक रात्री काय घडलं?
15
AI मुळे नोकऱ्या जाणार का? आनंद महिंद्रा यांनी मांडले 'ब्रेन गेन'चे सूत्र; नव्या वर्षात युवकांना दिला यशाचा मंत्र
16
Switzerland Blast: स्वित्झर्लंड हादरलं! न्यू इयर सेलिब्रेशन सुरू असतानाच रिसॉर्टमध्ये भीषण स्फोट; अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
17
'AB फॉर्म'चा झोल केला! भाजपच्या बंडखोर उमेदवाराने पक्षालाच गंडवलं, अमित साटमांचे थेट अधिकाऱ्यालाच पत्र
18
Nashik Municipal Corporation Election : AB फॉर्मच्या घोळात भाजपचे चार अधिकृत झाले अनधिकृत; शहाणे, ढोमसे, पवार, नेरकर गोत्यात
19
ठाण्यात मनसे, उद्धवसेनेचे दोन उमेदवार निवडणुकीतून बाहेर! अधिकाऱ्यांवर गंभीर आरोप, कोणाचे अर्ज झाले रद्द? 
20
'हा देश सर्वांचा; धर्म, जात, भाषा आणि प्रदेशाच्या आधारे भेदभाव होऊ नये'- मोहन भागवत
Daily Top 2Weekly Top 5

भारताने बदला घेतला अन् पाकला ‘औकात’ दाखवली; पहलगामनंतर आतापर्यंत काय घडले? संपूर्ण घटनाक्रम

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 12, 2025 04:15 IST

भारताने ‘ऑपरेशन सिंदूर’चे दिलेले घाव पाकिस्तान कधीही विसरू शकणार नाही. भारत जगातील तिसरी मोठी आर्थिक शक्ती होण्याच्या मार्गावर आणखी ताकदीने घोडदौड करू शकणार आहे.

नवी दिल्ली: भारताने ‘ऑपरेशन सिंदूर’चे दिलेले घाव पाकिस्तान कधीही विसरू शकणार नाही. तसेच पाकिस्तानकडे गमावण्यासारखे काहीच नव्हते, कारण तो आधीच कंगाल होता. तर भारत जगातील तिसरी मोठी आर्थिक शक्ती होण्याच्या मार्गावर आणखी ताकदीने घोडदौड करू शकणार आहे.

पहलगामचा बदला घेतला : जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात २६ जण ज्यात बहुतांश पर्यटक मारले गेले. भारताने या हल्ल्यासाठी पाकिस्तानपुरस्कृत लष्कर-ए-तैयबाला जबाबदार धरले आणि ७ मे रोजी ‘ऑपरेशन सिंदूर’ सुरू केले. कंदहार विमान अपहरण प्रकरणात दोषी ठरलेल्यांसह अनेक दहशतवादी घटनांचे सूत्रधार असलेल्या ५ कुख्यात दहशतवाद्यांचा खात्मा करणे हे या ऑपरेशनचे सर्वात मोठे यश होते.

भारतासाठी कूटनीतिक यश : ‘ऑपरेशन सिंदूर’ राबवून भारताने आपली ताकद दाखवली. ती संपूर्ण जगासाठी एक संदेश होता. या ऑपरेशनला संपूर्ण जगाने पाठिंबा दिला. पाकिस्तानला पाठिंबा देण्यासाठी तुर्की वगळता कोणताही महत्त्वाचा देश पुढे आला नाही. 

पाकला जगाने जागा दाखवली : पाकिस्तान सातत्याने जागतिक नेत्यांकडे युद्ध थांबवण्याची विनंती करत होता. हे पाकिस्तानला त्याची जागा दाखवण्यासारखेच होते. हे १९७१ च्या युद्धानंतर प्रथमच घडले की भारताने पाकिस्तानच्या भूमीत जाऊन हल्ले केले.  यामुळे पाकच्या मर्यादा समोर आल्या.

पाकिस्तानवर वचक कायम राहणार : भारताने दहशतवादी तळांवर हल्ले करून हे स्पष्ट केले की, तो दहशतवाद सहन करणार नाही. हे भविष्यात पाकिस्तानला अशा कारवायांपासून रोखू शकते. यामुळे जी-२० आणि इतर आंतरराष्ट्रीय मंचांवर भारताची स्थिती आणखी मजबूत होणार आहे. सिंधू जल करार स्थगित करणे आणि कूटनीतिकरित्या एकटे पाडणे यामुळे पाकिस्तानवर दीर्घकालीन दबाव निर्माण झाला, जो भारतासाठी एक रणनीतिक विजय आहे.

भारत बनणार आर्थिक महासत्ता : या युद्धात पाकिस्तानकडे गमावण्यासारखे काहीच नव्हते. तर भारत जगातील चौथी मोठी अर्थव्यवस्था बनला आहे. २०२७ पर्यंत भारताला जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनायचे आहे. अशा स्थितीत जर भारताने पाकिस्तानसोबत युद्ध वाढवले असते तर अर्थातच भारताची आर्थिक आघाडीवर पीछेहाट झाली असती. परंतु हा धोका टळला आहे.

पहलगामनंतर आतापर्यंत काय घडले?

- २२ एप्रिल २०२५ - जम्मू-काश्मीरच्या पहलगाममध्ये देशभरातून आलेल्या पर्यटकांवर त्यांची नावे-धर्म विचारून अमानुष गोळीबार केला. यात २६ जण मारले गेले. 

- २३ एप्रिल २०२५ - सिंधू जल करार स्थगित करण्याची घोषणा भारताने केली. पाकिस्तानी नागरिकांचा व्हिसा रद्द केला. त्यांना देश सोडण्यास सांगितले.

- २४ एप्रिल २०२५ - पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांनी  भारत कधीही पाकवर  हल्ला करू शकतो असे म्भाले. भारतीय लष्कराने युद्धअभ्यास सुरू केला.

- २६ एप्रिल २०२५ - संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेने पहलगाम हल्ल्याचा निषेध केला. दोन्ही देशांनी हा वाद आपसात मिटवावा, असा सल्ला अमेरिकेने दिला.

- २७ एप्रिल २०२५ - पाकिस्तानचे रेल्वे मंत्री हनीफ बरळले की, पाकिस्तान भारताकडून होणाऱ्या हल्ल्यासाठी तयार आहे. भारतीय लष्कराचा युद्धसराव सुरू.

- २८ एप्रिल २०२५ - भारताने क्रिकेटपटू शोएब अख्तर यांच्या यूट्युब चॅनेलसह १७ पाकिस्तानी चॅनेल्सवर बंदी घातली. या सर्व चॅनेल्सवर चुकीचे दावे केले जात होते. 

- २९ एप्रिल २०२५ - इंटेलिजन्सने पाकिस्तानचा माजी कमांडो मूसा हाच पहलगाम हल्ल्यामागचा सूत्रधार होता, असे सांगितले. 

- ३० एप्रिल २०२५ - भारताने आपली हवाई हद्द पाकिस्तानसाठी बंद केली. तुर्कियेचे प्रतिनिधी पाकच्या हवाईदलाच्या मुख्यालयाच्या भेटीसाठी आले.

- १ मे २०२५ - पाकिस्तानने सीमेवर चीनकडून घेतलेल्या तोफा तैनात केल्या. पाकिस्तानने आंतरराष्ट्रीय सीमेवर चौक्या आणि झेंडे पुन्हा लावले.

- २ मे २०२५ - महाराष्ट्र सायबर सेलने माहिती दिली की, पहलगाम हल्ल्यानंतर भारतीय यंत्रणांवर तब्बल १० लाखांहून अधिक सायबर हल्ले झाले.

- ३ मे २०२५ - ‘बीएसएफ’ने राजस्थानमध्ये पाकिस्तानी रेंजरला ताब्यात घेतले. पाकिस्तानने आखाती देशांकडे भारताविरोधात मदतीची याचना केली.

- ४ मे २०२५ - भारताने चिनाब नदीचे पाणी रोखले. रशियातील पाकिस्तानने राजदूत मोहम्मद खालीद जमाली यांनी उघडपणे अणुयुद्धाची धमकी दिली.

- ५ मे २०२५ - देशातील जनतेला जे हवे आहे तेच होईल, अशी ग्वाही संरक्षणमंत्र्यांनी दिली. डीआरडीओने मल्टी इन्फ्लुएन्स ग्राउंड माइनची यशस्वी चाचणी केली.

- ६ मे २०२५ - पाकिस्तानी संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांनी पुन्हा एकदा भीती व्यक्त केली की भारताकडून कोणत्याही क्षणी हल्ला केला जाईल.

- ७ मे २०२५ - भारताने  'ऑपरेशन सिंदूर' राबवत पाकमधील दहशतवाद्यांचे ९ तळ हवाई हल्ले करून नेस्तनाबूत केले. यात १००  अतिरेकी मारले गेले. 

- ८ मे २०२५ - पाकिस्तानने १५ शहरांवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. परंतु, भारताच्या एस-४०० या बचाव प्रणालीने सर्व हल्ले परतवून लावले.

- ९ मे २०२५ - पाकिस्तानचे ७ अतिरेकी मारले गेले. पाकिस्तानने ४०० ड्रोन हल्ले केले. यात नागरिकांना लक्ष्य करण्यात आले. घरांचे मोठे नुकसान झाले.

- १० मे २०२५ - अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारत आणि पाकिस्तानने शस्त्रसंधी लागू केल्याचे सांगितले. त्यामुळे संघर्ष कमी झाला.

शस्त्रसंधीनंतर सुरू झाले पोस्टरवॉर

शस्त्रसंधीला लक्ष्य करत, काँग्रेसने पाटण्यातील विविध ठिकाणी पोस्टर्स लावले असून, सध्याच्या केंद्र सरकारच्या नेतृत्वाची तुलना माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या नेतृत्वाशी करत टीका करण्यात येत आहे.

मोदींच्या नेतृत्वात नियम पुन्हा लिहिले गेले : भाजप

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निर्णायक नेतृत्वाखाली अवघ्या ७२ तासांत भारताने पाकिस्तानसोबतच्या संबंधांचे नियम पुन्हा लिहिले आहेत, असे भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते प्रदीप भंडारी यांनी म्हटले आहे.

 

टॅग्स :Operation Sindoorऑपरेशन सिंदूरPahalgam Terror Attackपहलगाम दहशतवादी हल्लाsurgical strikeसर्जिकल स्ट्राइकIndian Air Strikeएअर सर्जिकल स्ट्राईकIndia vs Pakistanभारत विरुद्ध पाकिस्तानJammu Kashmirजम्मू-काश्मीरCentral Governmentकेंद्र सरकारPakistanपाकिस्तान