काळ्या पैशाच्या यादीत भारत तिस-या स्थानावर

By Admin | Updated: December 16, 2014 12:31 IST2014-12-16T12:01:31+5:302014-12-16T12:31:51+5:30

संपूर्ण जगात काळ्या पैशाच्या यादीत भारत तिस-या स्थानावर असल्याचे ग्लोबल फायनान्शियल इंटिग्रिटी या आंतरराष्ट्रीय अभ्यास संस्थेने आपल्या अहवालात म्हटले आहे.

India is third in the list of black money | काळ्या पैशाच्या यादीत भारत तिस-या स्थानावर

काळ्या पैशाच्या यादीत भारत तिस-या स्थानावर

ऑनलाइन लोकमत

वॉशिंग्टन, दि. १६ -  संपूर्ण जगात काळ्या पैशाच्या यादीत भारत तिस-या स्थानावर असल्याचे ग्लोबल फायनान्शियल इंटिग्रिटी या आंतरराष्ट्रीय अभ्यास संस्थेने  आपल्या अहवालात म्हटले आहे. या अहवालानुसार २००३ ते २०१२ या काळात भारतातून सुमारे २८ लाख कोटी रुपये परदेशात पाठवण्यात आले आहेत. तर २०१२ साली भारतीयांनी सुमारे सहा लाख कोटी परदेशात दडवून ठेवल्याचे अहवालात म्हटले आहे. थिंक टँकचा हा रिपोर्ट २०१२ सालातील आकड्यांवर आधारित आहे.
भारताआधी या यादीत चीन(२४९.५७ अब्ज डॉलर्स) व  रशिया( १२२.८६ अब्ज डॉलर्स) या दोघांचा क्रमांक लागतो. कर चुकवणे, गुन्हेगारी व भ्रष्टाचाराच्या सहाय्याने परदेशात जो काळै पैसा लपवण्यात आला आहे त्या धनामध्ये भारताचा एकूण १० टक्के हिस्सा आहे.
परदेशातील काळ्या धनाच्या तपासासाठी सर्वोच्च न्यायालयाने एका विशेष तपासणी पथकाची स्थापना केली आहे
 

Web Title: India is third in the list of black money

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.