शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

"लोकं अडकून पडलेत, मुलांचं शिक्षण रखडलंय"; H1B व्हिसा मुद्द्यावर भारताची अमेरिकेशी चर्चा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 26, 2025 18:41 IST

India on Bangladesh Violence on Hindu: बांगलादेशातील हिंदूंवर होणाऱ्या अत्याचाराच्या भूमिकेवरही मांडली भूमिका

India on Bangladesh Violence on Hindu: सध्या भारतात अनेक विषय गाजत आहेत. बांगलादेशातील हिंदूंवरील हिंसाचार, एच१बी व्हिसा, ऑस्ट्रेलियन दहशतवादी हल्ला आणि कॅनडामध्ये एका भारतीय विद्यार्थ्याच्या मृत्यूवर शुक्रवारी परराष्ट्र मंत्रालयाने प्रतिक्रिया दिली.

रणधीर जयस्वाल यांनी अमेरिकेच्या व्हिसा मुद्द्यावर प्रतिक्रिया देताना म्हटले, "सरकारला देशातील नागरिकांकडून असंख्य तक्रारी आल्या आहेत. त्यांच्या व्हिसा अपॉइंटमेंट्स पुन्हा शेड्यूल करण्यात अडचणी येत आहेत. व्हिसा-संबंधित मुद्दे कोणत्याही देशाच्या सार्वभौम अधिकारक्षेत्रात येतात आणि आम्ही हे मुद्दे आणि आमच्या चिंता अमेरिकेपुढे मांडल्या आहेत. अनेक लोक बऱ्याच काळापासून अडकून पडले आहेत, ज्यामुळे त्यांच्या कुटुंबांना तसेच त्यांच्या मुलांच्या शिक्षणासाठी मोठ्या अडचणी येत आहेत. आपल्या नागरिकांना येणाऱ्या अडचणी कमी करण्यासाठी भारत सरकार अमेरिकेशी संवाद साधत काम करत आहे."

बांगलादेशातील हिंदूंवरील हिंसाचाराबद्दल मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल म्हणाले, "बांगलादेशात अल्पसंख्यांक हिंदूंविरुद्ध जे घडत आहे, तो चिंतेचा विषय आहे. बांगलादेशात अलिकडेच एका हिंदू तरुणाच्या हत्येचा आम्ही निषेध करतो. आम्हाला आशा आहे की या गुन्ह्यातील गुन्हेगारांना शिक्षा होईल. भारत बांगलादेशातील लोकांशी आपले संबंध मजबूत करण्यासाठी वचनबद्ध आहे. आम्हाला बांगलादेशमध्ये शांतता आणि स्थैर्य हवे आहे. आम्ही बांगलादेशमध्ये मुक्त, निष्पक्ष, समावेशक आणि सहभागी निवडणुकांसाठी सातत्याने आवाहन केले आहे."

ऑस्ट्रेलियातील बोंडी बीचवरील दहशतवादी हल्ल्यावर रणधीर जयस्वाल यांनी प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, "या हल्ल्यासाठी जबाबदार असलेल्यांनी जे घडवून आणले, त्यात होरपळलेल्यांची आम्हाला जाणीव आहे. या प्रकरणाबाबत अधिकारी इतर अधिकाऱ्यांशी संपर्कात आहेत. भारतात फरार आणि कायद्याने हवे असलेले गुन्हेगार परत आणण्यासाठी आम्ही पूर्णपणे वचनबद्ध आहोत. या उद्देशाने आम्ही अनेक देशांशी चर्चा करत आहोत आणि ही प्रक्रिया सुरू आहे. कायदेशीर गुंतागुंत आहे, परंतु आम्ही त्यांना भारतात परत आणण्यासाठी वचनबद्ध आहोत," असेही ते म्हणाले.

English
हिंदी सारांश
Web Title : H1B Visa Issues: India Discusses Concerns with the US

Web Summary : India raised concerns with the US regarding H1B visa delays causing hardship for citizens. Other issues discussed included violence against Hindus in Bangladesh, the Australian Bondi Beach attack, and the death of an Indian student in Canada. India seeks resolution and cooperation.
टॅग्स :Visaव्हिसाAmericaअमेरिकाBangladeshबांगलादेशIndiaभारत