शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
3
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
4
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
5
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
6
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
7
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
8
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
9
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
10
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
11
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
12
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
13
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
14
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
15
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
16
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
17
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
18
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
19
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
20
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
Daily Top 2Weekly Top 5

2014 नंतर देशाची वाटचाल चुकीच्या दिशेनं- अमर्त्य सेन

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 9, 2018 11:18 IST

नोबेल पुरस्कार विजेते सेन यांचा मोदी सरकारवर निशाणा

नवी दिल्ली: भारताची अर्थव्यवस्था चुकीच्या दिशेनं वाटचाल करत असल्याचं प्रख्यात अर्थतज्ज्ञ अमर्त्य सेन यांनी म्हटलं आहे. भारतीय अर्थव्यवस्थेच्या वाढीचा वेग जगात सर्वाधिक आहे. मात्र 2014 नंतर भारतीय अर्थव्यवस्थेनं चुकीच्या दिशेनं मोठी उडी घेतल्याचं म्हणत सेन यांनी मोदी सरकारच्या आर्थिक धोरणांवर अप्रत्यक्षपणे टीका केली. '2014 पासून आर्थिक आघाडीवरील चित्र अतिशय निराशाजनक आहे. आपली वाटचाल उलट दिशेनं सुरू आहे. सर्वात वेगानं वाढणारी अर्थव्यवस्था अशी आपली ओळख आहे. मात्र आता आपण वेगानं पिछाडीवर जात आहोत,' असं अमर्त्य सेन यांनी म्हटलं. नोबेल पुरस्कारप्राप्त अमर्त्य सेन यांच्या 'भारत और उसके विरोधाभास' या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा काल संपन्न झाला. हे पुस्तक सेन यांच्या 'अॅन अनसर्टन ग्लोरी: इंडिया अॅण्ड इट्स कॉन्ट्रॅडिक्शन' पुस्तकाचा हिंदी अनुवाद आहे. 'शेजारी देशांचा विचार करता वीस वर्षांपूर्वी नेपाळ, पाकिस्तान, बांगलादेश, श्रीलंका आणि भूतान या शेजारी देशांशी तुलना करता भारताची परिस्थिती चांगली होती. सर्वोत्तम अर्थव्यवस्थेत भारताचा क्रमांक त्यावेळी दुसरा होता. मात्र आता भारताची अवस्था अतिशय वाईट आहे. पाकिस्तानची अवस्था अतिशय दयनीय आहे. त्यानंतर आपला क्रमांक लागतो,' असं सेन म्हणाले. असमानता आणि जाती व्यवस्थेकडे सरकारनं दुर्लक्ष केल्याची मोठी किंमत देशाला मोजावी लागत असल्याचं म्हणत त्यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला.  

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपाEconomyअर्थव्यवस्थाIndiaभारत