भारताने वाचवले ३४ हजार कोटी रुपये! सौरऊर्जेद्वारे वीजनिर्मिती करून इंधन खर्चात केली मोठी बचत
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 11, 2022 07:27 IST2022-11-11T07:27:07+5:302022-11-11T07:27:25+5:30
ऊर्जाक्षेत्रात काम करणाऱ्या तीन संस्थांनी तयार केलेल्या अहवालात ही माहिती देण्यात आली आहे.

भारताने वाचवले ३४ हजार कोटी रुपये! सौरऊर्जेद्वारे वीजनिर्मिती करून इंधन खर्चात केली मोठी बचत
नवी दिल्ली :
सौरशक्तीद्वारे वीजनिर्मिती करून भारताने यंदाच्या वर्षी जानेवारी ते जून या कालावधीत इंधनावरील खर्चात ३४ हजार कोटी रुपयांची, तसेच १९.४ कोटी टन कोळशाची बचत केली आहे. ऊर्जाक्षेत्रात काम करणाऱ्या तीन संस्थांनी तयार केलेल्या अहवालात ही माहिती देण्यात आली आहे.
जगभरातील दहा महत्त्वाच्या देशांपैकी भारत, जपान, चीन, दक्षिण कोरिया, व्हिएतनाम हे पाच देश आशिया खंडात आहेत. सौरशक्तीच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर वीजनिर्मिती करणाऱ्या सात आशियाई देशांमध्ये भारत, चीन, जपान, दक्षिण कोरिया, व्हिएतनाम, फिलीपिन्स, थायलंड या देशांचा समावेश होतो. त्यांनी यंदाच्या वर्षी जानेवारी ते जून महिन्याच्या कालावधीत सौरशक्तीव्दारे वीजनिर्मिती करून जीवाश्म इंधनांवरील खर्चात २७ लाख कोटी रुपयांची बचत केली आहे.
चीन आहे आघाडीवर
nभारतासह ज्या सात देशांनी सौरशक्तीव्दारे वीजनिर्मिती करून इंधनावरील खर्चात जी बचत केली त्यामध्ये चीनचा सर्वाधिक वाटा आहे.
nचीनमध्ये विजेच्या एकूण मागणीपैकी ५ टक्के वीज सौरशक्तीव्दारे तयार केली जाते. त्यामुळे कोळसा व वायूवर होणाऱ्या खर्चात यंदा चीनने १ लाख ७१ हजार कोटी रुपयांची बचत केली. त्यानंतर सौरऊर्जेच्या माध्यमातून इंधन खर्चात कपात करण्यात जपानने दुसरा क्रमांक पटकाविला आहे.
खर्चात बचत केलेले देश
१३००० कोटी- व्हिएतनाम
६३७ कोटी- फिलीपिन्स
१२००० कोटी- दक्षिण कोरिया