शहरं
Join us  
Trending Stories
1
सुप्रीम कोर्टाचा निकाल विरोधात जाण्याची भीती?; शिंदेंच्या दिल्लीवारीबाबत असीम सरोदेंचा मोठा दावा
2
मतदार यादीतून वगळलेले ६५ लाख कोण? तीन दिवसांत सादर करा; सर्वोच्च न्यायालयाचा निवडणूक आयोगाला आदेश
3
१ पद, २ विभाग अन् २ आदेश; CM देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्या खात्यांमध्ये नियुक्तीवरून संघर्ष?
4
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये उद्ध्वस्त झालेले मुख्यालय पुन्हा बांधण्यासाठी जैशचा प्रमुख पुन्हा सक्रिय; मसूद अझहरने अनेकांकडे देणग्या मागितल्या
5
नवजात लेकीला कचऱ्याच्या ढिगाऱ्यात फेकलं पण 'त्याने' जीवदान दिलं, शरीराला लागलेले किडे
6
RBI च्या निर्णयानंतर गुंतवणूकदारांना झटका! विप्रोसह 'या' क्षेत्रात मोठी घसरण, कुठे झाली वाढ?
7
“जनभावनेचा आदर करणारे हे सरकार, आम्ही...”; ‘महादेवी’ परतण्याबाबत एकनाथ शिंदेचे मोठे विधान
8
लग्नाचं निमंत्रण दिलं नाही, सहकाऱ्यांनी एचआरकडे केली तरुणीची तक्रार, त्यानंतर घडलं असं काही...
9
"कित्येकांनी बलिदान दिले, शिरांचे ढीग लागले, पण धर्म सोडला नाही"- मोहन भागवत
10
एकनाथ शिंदेंची दिल्लीवारी; अमित शाहांशी बैठकीत काय चर्चा झाली? खुद्द उपमुख्यमंत्री म्हणाले...
11
"डोकं फिरवू नका, मी मंत्री, तुम्ही मलाच न सांगता...", PWD अधिकाऱ्यावर संतापले दयाशंकर सिंह
12
जगाला आपल्या धाकात ठेऊ पाहणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांची संपत्ती किती? उत्पन्नाचा खरा स्रोत कोणता?
13
एकावर एक बोनस शेअर देणार 'ही' कंपनी; सोबत डिविडंडही मिळणार; गुंतवणुकदारांना दुप्पट फायदा
14
आधार ओटीपी वापरून ITRचं ई-व्हेरिफिकेशन करा, अन्यथा रिटर्न अवैध ठरेल; पाहा संपूर्ण प्रोसेस
15
८८२ कोटींचा खर्च, २०२८ मध्ये होणार पूर्ण; ८ ऑगस्टला सीतामातेच्या जानकी मंदिराचे भूमिपूजन
16
'कायद्याच्या कचाट्यात महादेवी हत्तीला अडकवू नका, ... तोपर्यंत लढा सुरूच राहणार'; राजू शेट्टींनी स्पष्टच सांगितलं
17
वॉशिंग मशिन वापरताना ‘ही’ किरकोळ चूक जीवावर बेतली; तरुणाचा मृत्यू; करायला गेला एक आणि..
18
बुकिंग करणाऱ्या ग्राहकांवरच शाओमी उलटली; आता म्हणतेय आठवड्यात पूर्ण पैसे द्या नाहीतर...
19
Wasim Jaffer: वसीम जाफरवर मोठी जबाबदारी, आता विदर्भातील खेळाडूंना शिकवतील फलंदाजीचे धडे!
20
ICC Test Ranking : मियाँ 'मॅजिक'नंतर 'मार मुसंडी' शो! सिराजला ICC कडून मिळालं मोठं गिफ्ट

भारतात मंकीपॉक्सचा रुग्ण आढळला, क्लेड १ बी व्हायरसची लागण, आरोग्य यंत्रणा सतर्क

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 23, 2024 19:32 IST

first MPOX Clade 1 case in Kerala : हा रुग्ण केरळचा रहिवासी आहे, तो नुकताच दुबईहून भारतात आला होता.

first MPOX Clade 1 case in Kerala : नवी दिल्ली : कोरोना महामारीनंतर मंकीपॉक्सच्या साथीने जगातील अनेक देशात थैमान घातले आहे. अनेक देशात मंकीपॉक्सच्या साथीचा उद्रेक झाला असून, भारतातआरोग्य यंत्रणांकडून खबरदारी घेतली जात आहे. दरम्यान, भारतातील तिसऱ्या मंकीपॉक्स रुग्णाचा वैद्यकीय रिपोर्ट समोर आला आहे. याबाबत सोमवारी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने माहिती दिली. हा रुग्ण केरळचा रहिवासी आहे, तो नुकताच दुबईहून भारतात आला होता. त्याला मंकीपॉक्सच्या क्लेड १ बी व्हायरसची लागण झाल्याचे तपासणी अहवालात आढळून आले आहे.

अलीकडेच केरळमधील मलप्पुरममध्ये मंकीपॉक्सचा दुसरा रुग्ण आढळून आला. ही व्यक्ती यूएईमधून भारतात परतली होती. प्राथमिक लक्षणे दिसून आल्यानंतर रुग्णाची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. त्यानंतर त्याला मंकीपॉक्सची लागण झाल्याचे अहवालात स्पष्ट झाले होते. तेव्हा केरळच्या आरोग्यमंत्र्यांनी सांगितले होते की, ज्यांच्याकडे परदेशी प्रवासाचा इतिहास आहे, त्यांना या व्हायरसची लक्षणे दिसल्यास आरोग्य विभागाला कळवावे.

दिल्लीत आढळला होता मंकीपॉक्सचा पहिला रुग्ण याआधी, दिल्लीत पहिला मंकीपॉक्सचा रुग्ण आढळून आला होता, जो परदेश प्रवास करून भारतात परतला होता. प्राथमिक लक्षणे दिसून आल्यानंतर रुग्णाला दिल्लीतील रुग्णालयात विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आले होते. विलगीकरणाच्या वेळी रुग्णाची प्रकृती स्थिर होती. रुग्णाला विलगीकरण कक्षात ठेवल्यानंतर त्याच्यावर डॉक्टर बारकाईने लक्ष ठेवून होते.

WHO कडून आरोग्य आणीबाणी घोषितआफ्रिकेतील मंकीपॉक्सच्या सातत्याने वाढणाऱ्या घटना पाहता जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) काही आठवड्यांपूर्वी आरोग्य आणीबाणी घोषित केली होती. जागतिक आरोग्य संघटनेने म्हटले होते की, दोन वर्षांपूर्वी मंकीपॉक्सचा व्हायरस जगातील अनेक देशांमध्ये पसरला होता. त्यावेळी जगभरात एक लाखाहून अधिक प्रकरणे नोंदवली गेली होती.

मंकीपॉक्सबाबत सरकारही सतर्कमंकीपॉक्सच्या समस्येबाबत केंद्रीय आरोग्य मंत्रालय पूर्णपणे तयार आहे. मंकीपॉक्सबाबत मार्गदर्शक तत्वे सरकारने आधीच जारी केली आहेत. मंकीपॉक्सचे रुग्ण ओळखण्यासाठी सरकारने विमानतळांवर चाचणीही वाढवली आहे. यासोबतच लोकांना काही लक्षणे दिसल्यास त्यांनी तातडीने डॉक्टरांशी संपर्क साधावा, असे आवाहनही करण्यात आले आहे.

पहिल्या रुग्णाबद्दल आरोग्य मंत्रालयाने काय म्हटले होते?आरोग्य मंत्रालयाचे म्हणणे आहे की, भारतात आढळलेला पहिला रुग्णजागतिक आरोग्य संघटनेने नोंदवलेल्या व्हायरसशी संबंधित नाही, कारण या रुग्णामध्ये पश्चिम आफ्रिकन क्लेड २ च्या मंकीपॉक्स व्हायरस आढळून आला होता. तर आता समोर आलेल्या तिसऱ्या रुग्णाला क्लेड १ बी व्हायरसची लागण झाली आहे.

मंकीपॉक्सचा संसर्ग कसा होतो?1) मंकीपॉक्स व्यक्तीशी थेट शारीरिक संपर्क येतांना शरीर द्रव, लैंगिक संपर्क किंवा जखम, घाव यातील स्त्रावाचा संपर्क झाल्यास.२) मंकीपॉक्स बाधित व्यक्तीने वापरलेल्या कपड्यापासून, जास्तीत जास्त वेळ बाधित व्यक्तीच्या संपर्कात आल्यास किंवा त्या व्यक्तीच्या श्वसन मार्गातून बाहेर पडणाऱ्या मोठ्या थेंबावाटे इतर व्यक्तीला संसर्ग होऊ शकतो.3) मंकीपॉक्स बाधित प्राणी चावल्यामुळे किंवा बाधित प्राण्याचे मांस न शिजवता खाण्यामुळेही या आजाराचा संसर्ग होऊ शकतो.

मंकीपॉक्सची लक्षणे काय आहेत?ताप येणे, डोकेदुखी, अंगदुखी, थंडी वाजणे, कानामागील, काखेतील, जांघेतील लसिका ग्रंथींना सूज येणे, घाम येणे, घसा खवखवणे आणि खोकला.

टॅग्स :Healthआरोग्यIndiaभारत