शहरं
Join us  
Trending Stories
1
मुघलांच्या घोड्यांना संताजी, धनाजी दिसायचे तसे मोदींना ठाकरे, पवार दिसतात; राऊतांची टीका
2
२५०० महिलांचे लैंगिक शोषण करणारा खासदार रेवन्ना परदेशात कसा पळाला? कर्नाटकात खळबळ
3
Amit Shah : "केजरीवालांची जेलमध्ये हत्या होऊ शकते"; AAP च्या आरोपांवर काय म्हणाले अमित शाह?
4
“वर्षानुवर्षे उत्तर मुंबईची सेवा करत राहीन”; पियूष गोयल यांनी व्यक्त केला विश्वास, उमेदवारी अर्ज भरला
5
"भारत महासत्ता बनतोय, आम्ही भीक मागतोय", पाकिस्तानच्या संसदेत भारताचे गोडवे
6
'देवरा' सिनेमात मराठमोळ्या अभिनेत्रीची वर्णी, ज्युनिअर एनटीआरच्या पत्नीची भूमिका साकारणार
7
नाशिक: राऊड घाटात एसटीचा भीषण अपघात; ६ प्रवाशांचा मृत्यू, टायर फुटून ट्रकला धडकली
8
Amit Shah : "हे लोक कन्फ्यूज, यूपी सोडून पळून गेले"; अमित शाह यांचा राहुल-प्रियंका गांधींवर जोरदार हल्लाबोल
9
खासदार बनण्याचे स्वप्न; हरलो तर आमदार आहेच; उदयनराजे लोकसभेत बसणार की राज्यसभेतच राहणार?
10
Ravindra Waikar तिढा सुटला, उमेदवार ठरला! मुंबई उत्तर-पश्चिममध्ये रविंद्र वायकरच महायुतीचे उमेदवार
11
“भाजपा नेत्यांना मराठ्यांचा द्वेष, म्हणूनच PM मोदींना इतक्या सभा घ्याव्या लागतात”: मनोज जरांगे
12
‘कॉलर उडवताना सकाळ आहे की संध्याकाळ हे पाहावं लागतं’, शरद पवारांची उदयनराजेंवर बोचरी टीका 
13
Video - बापमाणूस! घटस्फोटानंतर वडिलांनी वाजत-गाजत लेकीला आणलं आपल्या घरी
14
प्रियांका गांधी लोकसभा निवडणूक लढवणार नाहीत, सूत्रांची माहिती 
15
नवीन गुजरातचा आत्मा महाराष्ट्रात भटकतोय; संजय राऊतांचा भाजपावर पलटवार
16
१३९ दिवस शनी वक्री: ५ राशींना लॉटरी, वरदान काळ; गुंतवणुकीतून लाभ, पदोन्नती, पगारवाढ शक्य!
17
SRK ने लेकाला जोरात पकडलं अन्...! IPL दरम्यान शाहरुख-अबरामचं क्युट भांडण कॅमेऱ्यात कैद
18
इकडे आड, तिकडे विहीर! युद्ध रोखले तर नेतन्याहूंचे सरकार पडणार, नाही रोखले तर...
19
 ‘अमित शाह माझं पार्थिव उचलण्यास आले, तर खूप बरं होईल…’ दिग्विजय सिंह यांचं विधान चर्चेत  
20
पतंजलीला मोठा झटका, दृष्टी आय ड्रॉपसह 14 प्रोडक्ट्सवर बंदी, जाणून घ्या कारण

Coronavirus Update: गेल्या २४ तासांत कोरोनाचे २० हजार नवे रुग्ण; बरे होण्याचा दर ९६ टक्के

By देवेश फडके | Published: January 07, 2021 1:57 PM

गेल्या २४ तासांत देशभरात २० हजार ३४६ नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली असून, २२२ कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच देशात बरे होण्याचा दर वाढून ९६.१६ टक्के झाला आहे.

ठळक मुद्देगेल्या २४ तासांत कोरोनाचे २० हजार ३४६ नवे रुग्णकाल दिवसभरात २२२ कोरोना रुग्णांचा मृत्यूकोरोनाच्या नव्या प्रकाराची लागण झालेल्यांची संख्या ७१ वर

नवी दिल्ली : देशभरात कोरोनाचे संकट अद्याप दूर होताना दिसत नाही. गेल्या काही दिवसांपासून दैनंदिन कोरोना रुग्णांच्या संख्येत चढ-उतार पाहायला मिळत आहे. गेल्या २४ तासांत देशभरात २० हजार ३४६ नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली.  बुधवारी १८ हजार ८८ नवीन कोरोना रुग्ण आढळून आले होते. कोरोनाची लागण होण्याचे प्रमाण वाढताना दिसत आहे. 

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून आज (गुरुवार) सकाळी जारी करण्यात आलेल्या आकड्यांनुसार, गेल्या २४ तासांत कोरोनाची लागण झालेल्या २० हजार ३४६ नवीन रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. यामुळे एकूण कोरोना रुग्णसंख्या १ कोटी ०३ लाख ९५ हजार २७८ वर पोहोचली आहे. काल दिवसभरात २२२ कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यासह कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची एकूण संख्या १ लाख ५० हजार ३३६ झाली आहे. 

गेल्या २४ तासांत १९ हजार ५८७ कोरोना रुग्णांना घरी सोडण्यात आले असून, एकूण बरे झालेल्या रुग्णांची संख्या १ कोटी १६ हजार ८५९ झाली आहे. देशात बरे होण्याचा दर वाढून ९६.१६ टक्के झाला असून, कोरोनाचा मृत्युदर १.४५ टक्के आहे. तसेच देशभरात कोरोनावर उपचार सुरू असलेल्या रुग्णांची संख्या २ लाख २८ हजार ०८३ आहे. ६ जानेवारी २०२१ पर्यंत संपूर्ण देशभरातून १७ कोटी ८४ लाख ९९५ कोरोना चाचण्या करण्यात आल्या. 

दरम्यान, ब्रिटनमध्ये आढळलेल्या कोरोनाच्या नव्या प्रकाराची लागण झालेल्या रुग्णांची संख्या ७१ वर पोहोचली आहे. यापूर्वी ५८ जणांना कोरोनाच्या नव्या प्रकाराची लागण झाल्याचे समोर आले होते. बुधवारी यात नव्या १३ रुग्णांची भर पडून एकूण आकडा ७१ झाला आहे.  या सर्वांना सेल्फ आयसोलेशनमध्ये ठेवण्यात आले आहे. कोरोनामुळे सर्वाधिक मृत्यू अमेरिकेत झालेले आहेत. 

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्याDeathमृत्यूIndiaभारत